आई आपल्या प्रेम प्रकरणावरुन सतत टोचत असल्याच्या रागातून अल्पवयीन मुलीने तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलीने आपल्या प्रियकराच्या मदतीने धारदार शस्त्राने वार करुन आईचा खून केल्याचा आरोप आहे. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा शहरात हा प्रकार घडला आहे. हत्येनंतर मुलगी आणि तिचा प्रियकर हे दोघेही जण पसार झाले आहेत. मुंब्रा पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा […]
ताज्याघडामोडी
मोबाईलचा हप्ता चुकल्याने वसुली एजंटकडून तरुणास मारहाण
बँकेचे हप्ते थकल्यावर वसुलीसाठी गुंड येतात हे अनेक वेळा काही जणांनी अनुभवले. मात्र हा हप्ता मोबाईलचा असेल तर,पण हे खरे आहे. मोबाईलचा हफ्ता भरला नाही म्हणून फायनान्स कंपनीचा गुंड आणि त्याच्या आठ ते दहा साथीदारांनी दोन भावंडांना भरबाजारात दांडे आणि कमरेच्या बेल्टने मारहाण केली. यातील एक जण या मारहाणीत बेशुद्ध पडला तर दुसरा दयेची भीक […]
पोटात दुखतं म्हणून मुलीला डॉक्टरांकडे नेलं; X-RAY पाहून कुटुंबीय हादरले!
अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचं अचानक पोट दुखू लागल्याने आईने तिला डॉक्टरांकडे नेले. या मुलीची तपासणी करताच डॉक्टरांना धक्काच बसला.१४ वर्षीय मुलगी आठ महिन्यांची गर्भवती असल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं.डॉक्टरांनी याची माहिती आईला सांगताच, आईच्या पायाखालची जमीनच सरकली. याबाबत मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, गावातील एका तरुणाने आपल्यावर […]
वाढदिवशीच मामाने भाच्याला भोसकून मारलं, धक्कादायक कारण
औरंगाबादमध्ये गुन्हेगारीच्या प्रकरणात मोठी वाढ झाली आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी भर चौकात खून केल्याची घटना ताजी असताना पुन्हा एक धक्कादाय घटना समोर आली आहे. वाढदिवसावरून मामा आणि भाचे यांच्यात मोठा वाद झाल्याने मामाने चक्क चाकुने भोसकले आहे. ही घटना औरंगाबाद शहरातील किराडपुरात भागात घडली आहे. सय्यद साजिद माजीद असे मृताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाढदिवस […]
मूल होत नसल्याने पतीने पत्नीचा तोडला हात आणि पाय, महिलेची प्रकृती चिंताजनक
अपत्य नसल्याच्या कारणावरून पतीने पत्नीवर अंदाधुंद हल्ला केल्याची घटना कुरनूल जिल्ह्यातील चानुगोंडल, डॉन मंडल येथे मंगळवारी घडली. या घटनेत गंभीर दुखापत झाल्याने पालकांनी बेशुद्ध झालेल्या महिलेला पत्तीकोंडा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. कुर्नूल जिल्ह्यातील पत्तीकोंडा मंडलातील चांदोली गावातील लालप्पा आणि आदिलक्ष्मी यांची मुलगी भवानी यांचा विवाह डॉन मंडलच्या चानुगोंडला गावातील राम याच्याशी तीन वर्षांपूर्वी झाला […]
हैदराबाद आणि बालाजी संस्थान येथून कर्ज मिळवून देतो म्हणून फसवणूक
पोलीस ठाणे पंढरपूर ग्रामीण येथे गुन्हा दाखल आरोपी अमोल बाळकृष्ण कौलगे रा. पिराची किरोली ता. पंढरपूर यास अटक गरजूंना बालाजी संस्थान आणी हैदराबाद येथून कर्ज मिळवून देतो असे सांगुन फसवणूक केल्याबाबत ज्ञानेश्वर दत्तात्रय रासकर रा. नानगाव ता. दौंड, जि. पुणे यांची 23 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केली म्हणुन पोलीस ठाणे पंढरपूर ग्रामीण येथे तक्रार […]
रात्रभर ड्युटी, सकाळी कुटुंबासोबतचा नाश्ता ठरला अखेरचा, हेड कॉन्स्टेबलचा शोकाकुल अंत
रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यात कर्तव्य बजावत असताना पोलीस हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. संदीप गुजर यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ते ४८ वर्षांचे होते. संदीप गुजर यांनी तब्बल तेवीस वर्षे सेवा बजावली होती. मंडणगड पोलीस ठाणे अंमलदार म्हणून त्यांनी रात्रभर ड्युटी केली होती. ड्युटी संपवून सकाळी ८ वाजताच्या सुमारास ते […]
मीठा पान खाताच तरुण बेशुद्ध, पान शॉपच्या बाहेरच कोसळला; प्रकारामुळे खळबळ
उल्हासनगर कॅम्प नंबर ५ मधील सिद्धार्थ नगरमध्ये वास्तव्यास असलेला २८ वर्षांचा अब्दुल कलीम अहमद शेख रविवारी रात्री साडेबारा वाजता डीजी पान शॉपवर गेला होता. शेखनं मीठा पान खाल्लं आणि पान शॉपसमोरच कोसळला. अब्दुल पान खाऊन बेशुद्ध पडल्याचं काहींनी त्यांच्या भावांना सांगितलं. त्यानंतर भावंडांनी पान शॉपजवळ धाव घेतली. भावांनी अब्दुलला उल्हासनगरमधील सेंट्रल रुग्णालयात दाखल केलं. तिथे […]
तारीख ठरली, पण साखरपुड्याच्या आठवडाभरापूर्वीच तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड शहरात एक धक्कादायक घटना समोर आली असून, एका 23 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कन्नड शहरातील जवाहर कॉलनीत राहणाऱ्या प्रियंका बारकू वायडे (वय 23) या तरुणीने राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली. ही घटना मंगळवारी दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान घडली आहे. विशेष म्हणजे […]
सुसाइड नोटमध्ये भाजप नेत्यांची नावे लिहून एकाची आत्महत्या, दोघांवर FIR
सुसाइड नोटमध्ये भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांची नावे लिहून एकाने आत्महत्या केली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे आणि कामगार आघाडीचे पदाधिकारी विक्रम नागरे असे गुन्हा दाखल झालेल्या दोन पदाधिकाऱ्यांची नावे आहेत. या घटनेमुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एका गुन्ह्यात संशयित असलेल्या आरोपीने घोटी येथील भरवीरमध्ये आत्महत्या केली आहे. […]











