केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गट हाच अधिकृत शिवसेना पक्ष असल्याचा निकाल दिल्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाले होते. गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे विरुद्ध शिंदे गटात सुरु असलेल्या संघर्षात हा शिंदे गटाला मिळालेला मोठा विजय मानला जात आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह मिळवण्याची लढाई जिंकल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी आणखी एक मोठे पाऊल […]
ताज्याघडामोडी
प्रियकराने बोलणे थांबवले, संतापलेल्या तरुणीने आईचा गळाच घोटला, पण सुदैवाने…
प्रियकराने बोलणं बंद केल्याने चिडलेल्या अल्पवयीन मुलीने आईला दोषी धरत जन्मदात्या आईचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला आहे. सुदैवाने शेजाऱ्यांनी वेळीच धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना औरंगाबाद शहरातील पुंडलिकनगर भागात समोर आली असून दामिनी पथकाच्या मदतीने तरुणीवर मानसोपचार तज्ज्ञांमार्फत उपचार सुरू आहेत. प्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की, १७ वर्षीय राणी (नाव बदलेले) ही […]
ठाकरेंनी दावा केला ६ खासदारांचा; मात्र, आयोगाकडे गेले चारच; ‘ते’ दोन खासदार गेले कुठे?
शिवसेना कोणाची? या प्रश्नांवर गेले सात-आठ महिने सुरू असलेला लढाईत अखेर शिंदे गटाने बाजी मारली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव व चिन्हे शिंदे गटाला देण्याचा निर्णय जाहीर केला. उद्धव यांच्या गटाला या निर्णयाचा जबर हादरा बसला आहे. दरम्यान, ठाकरे गटाने लोकसभेतील ६ खासदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता. मात्र, निवडणूक आयोगाच्या कागदपत्रांवरुन चारच खासदार […]
ठाकरे गटाचे मशाल चिन्हही येणार धोक्यात?
शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने शुक्रवारी (ता. १७) महत्त्वाचा निर्णय दिला आहे. शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाकडून एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला देण्यात आले आहे. ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिल्यामुळे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मशाल या चिन्हाचा वापर करावा […]
ब्यूटी स्पामध्ये मसाज घेण्याच्या बहाण्याने गेले पोलीस, आतमध्ये जाताच हादरले; ५ मुलींची सुटका…
पिंपळे- सौदागर येथील काटेवस्तीत असलेल्या ‘एज लाइन टच द ब्यूटी’ या स्पा सेंटरवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने छापा मारून कारवाई केली आहे. यात मिझोराम राज्यातील एक आणि महाराष्ट्रातील चार अशा ५ तरुणींची वेश्याव्यवसायातून सुटका करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या स्पाचा […]
आजारी गिरीश बापट व्हिलचेअरवर बसून भाजपाच्या प्रचारासाठी मैदानात, शरद पवार म्हणाले, “त्यांच्या यातना.”
खासदार गिरीश बापट यांची प्रकृती खराब असतानाही ते पुण्यातील पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत.पार्श्वभूमीवर विरोधकांकडून भाजपा गिरीश बापट यांच्या जीवाशी खेळ करत असल्याचा आरोप होत आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना याबाबत विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते शुक्रवारी (१७ फेब्रुवारी) पुण्यात माध्यमांशी बोलत होते. शरद पवार म्हणाले, “गिरीश बापट यांना खरंच […]
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, शिवसेना नावासह धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला!
गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेला पक्षचिन्हाचा वाद निवडणूक आयोगाने निकाली काढला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतलेला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आहे. धनुष्यबाण चिन्ह आपल्याला मिळावं यासाठी दोन्हीही गट गेली दोन महिने कागदोपत्री पुरावे सादर करण्यात व्यस्त होते. तीच कागदपत्रं पाहून निवडणूक आयोगानं शिंदे गटाला […]
पोलीस भरतीदरम्यान तरुणाचा मृत्यू, १६०० मीटर धावला अन् खाली कोसळला
मुंबई पोलीस दलामध्ये सध्या भरतीची प्रक्रिया सुरू आहे. सांताक्रुझच्या कलिना येथील मुंबई विद्यापीठाच्या मैदानावर एका उमेदवाराचा आज सकाळी मृत्यू झाला. मैदानी चाचणीत धावताना चक्कर आल्याने हा तरुण कोसळला. २७ वर्षाचा हा तरुण वाशिमचा असल्याची माहीती आहे. गणेश उगले, असे या तरुणाचे नाव आहे. आणि त्याने १६०० मीटर धावण्याची चाचणी पूर्ण केली आणि तो खाली कोसळला. […]
माझ्या बाळाला भेटायचंय, मित्राला फोन करुन रडला; विहिरीजवळ चप्पल दिसताच सर्वांना धस्स झालं!
घरी कुणालाही काही एक न सांगता निघालेल्या तरुणाचा शेतातील एका विहिरीत मृतदेह आढळून आला आहे. बुधवारी दुपारी जळगाव जिल्ह्यातील यावल शहरात ही घटना उघडकीस आली आहे. आवेद गबु तडवी (वय २५ वर्ष, रा. न्यू व्यास नगर, यावल) असे मयत तरुणाचे नाव आहे. मोबाईलवरुन मित्राला फोन केला, आपल्या एका वर्षाच्या मुलाला भेटण्याची इच्छा बोलून दाखवत अन् […]
हा टॅटू कोणाचा? नव्या नवरीला प्रश्न केला, पतीचा जीव गेला; निष्प्राण देह दोन दिवस पेटत होता
मध्य प्रदेशच्या भिंडमध्ये विवाहबाह्य संबंधातून धक्कादायक घटना घडली आहे. एका प्रियकरानं त्याच्या प्रेयसीच्या पतीची हत्या केली. यानंतर चंबळच्या बिहडमध्ये दोन दिवस त्याचा मृतदेह जाळला. भिंडच्या गोहद चौक परिसरात ही घटना घडली. गोरमी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या मोनू सिंहचा विवाह सहा महिन्यांपूर्वी भिंडच्या रेखा तोमरशी झाला. लग्नानंतर रेखा सासरी आली. तिच्या हातावर प्रियकराच्या नावाच्या आद्याक्षराचा टॅटू […]










