सार्थ ज्ञानेश्वरी चे प्रकाशक ह.भ.प.भानुदास महाराज यादव यांच्या अस्थी चे चंद्रभागेत विर्सजन आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते अस्थी पुजन पंढरपूर (प्रतिनिधी) : आमदार परिचारक यांच्या वाड्यासमोरील श्रीगुरू रामचंद्र महाराज यादव यांच्या वैष्णव सदनातील सार्थ ज्ञानेश्वरी, विचार सागर,सार्थ अमृतानुभव, सार्थ ज्ञानेश्वरी अभंग गाथा, संत एकनाथ गाथा, आदि ग्रंथाचे प्रकाशक व वारकरी साप्रदायाच्या अनेक दिंडी चे मार्गदर्शक […]
ताज्याघडामोडी
शेतकर्यांच्या जनसंघर्षाला पहिले यश प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी घेतली बैठक; 16 हजार शेतकर्यांच्या आशा पल्लवीत
शेतकर्यांच्या जनसंघर्षाला पहिले यश प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी घेतली बैठक; 16 हजार शेतकर्यांच्या आशा पल्लवीत । पंढरपूर, प्रतिनिधी गेल्या 30 वर्षांपासून पंढरपूर तालुक्यात उजनी उजवा कालवा वितरिकेवरील भूसंपादन प्रश्न रेंगाळला असून या प्रश्नाचा कायमचा निपटारा करण्यासाठी व नव्याने पीक पाणी नोंदी धरून, नव्या रेडीरेकनर कायद्यानुसार वाढीव मोबदला मिळण्यासाठी शेतकर्यांच्या सुशिक्षित मुलांनी जन संघर्षाचा लढा उभा […]
मतदार संघातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार आवताडे यांनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट
*मतदार संघातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार आवताडे यांनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट* प्रतिनिधी : पंढरपूर – मंगळवेढा पोटनिवडणुकीमध्ये परिवर्तनाची नांदी देत आवताडे हे आमदार झाले यावेळी मतदारसंघातील जनतेला विकासासाठी दिलेली वचने पूर्ण करण्यासाठी निकालाच्या दुसऱ्या दिवशीपासूनच कोणताही बडेजाव न करता कामास प्रारंभ केला. त्याचाच एक भाग म्हणून आ. समाधान आवताडे हे विकासासाठी दिल्ली दरबारी पोहचून […]
पोहोरगाव येथे अवैध वाळू उपशावर पंढरपूर तालुका पोलिसांची कारवाई
पंढरपुर तालुक्यातील पोहरगाव येथील भीमा नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा व वाहतूक केली जात असल्याचे समजताच पंढरपुर तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यानी केलेल्या कारवाईत डम्पिंग ट्रेलर व वाळूसह ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आला असून या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात 1) महेश दादाराव पाटील व 2) आकाश भारत गायकवाड दोघे रा. पोहोरगाव ,ता पंढरपुर यांच्या विरोधात भादवि 379, 34 […]
अन्न विभागाने कारवाई करूनही गुरुकृपा डेअरी चालक जुमानेना
अन्न विभागाकडून निर्धारित परवाना प्राप्त न करता पंढरपूर शहरातील छत्रपती शिवाजी चौक येथील गुरुकृपा डेअरी चालकाकडून दुग्धजन्य व अन्न पदार्थ विक्री केली जात असल्याची माहिती मिळताच सह.अन्न आयुक्त प्रदीप राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न निरीक्षक प्रशांत कुचेकर यांनी १५ जुलै २०२१ रोजी कारवाई करीत सदर गुरुकृपा डेअरी हि आस्थापना बंद ठेवण्यास सांगितले होते.या कारवाईची पंढरपुर शहरात […]
फेरफार नोंदीसाठी ५ हजराच्या लाचेची मागणी
शेतीचा फेरफार नोंदीसाठी 5 हजार रुपयांची लाच मागितल्याची घटना कालगाव येथे घडली आहे. याप्रकरणी तलाठी अनंदा नारायण गायकवाड यांच्याविरुध्द लाच लुचपत प्रतिबंधक खात्याने आज 26 जुलै रोजी कारवाई केली. एका तक्रारदाराने 8 जुलै रोजी समक्ष एक तक्रार दाखल करीत विकत घेतलेल्या शेतीचा फेर लावून देण्यासाठी संबंधित तलाठी अनंदा गायकवाड यांनी पाच हजार रुपयांची मागणी केल्याचे […]
राणे केंद्रात मंत्री झाले आणि कोकणावर संकट आले म्हणजे राणेच पांढऱ्या पायाचे आहेत !
मुसळधार पाऊस, महापूर आणि दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये कोकणातील चिपळूण, खेड, महाड तालुक्यात कधीही न भरुन येणारं नुकसान झालं आहे. याच नुकसानाची पाहणी करण्यासाठी नेतेमंडळींचे दौरे सुरु आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही चिपळूणमधील पूरस्थिती आणि झालेल्या नुकसानाची पाहणी केली. त्यावेळी बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]
बाप-लेकाला बसला विजेचा धक्का; पाळीव कुत्र्याने तार खेचून वाचविण्याचा केला प्रयत्न, पण.
जीव लावला तर पाळीव प्राणी आपल्या मालकासाठी काहीही करण्यास तयार असतात, हे आपण अनेक गोष्टींतून ऐकलं आहे. त्यातही पाळीव कुत्रा तर सर्वात इमानी प्राणी म्हणून ओळखला जातो. अशीच काहीशी घटना पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात घडली. येथे एका पाळीव कुत्र्याने मालकाला वाचविण्यासाठी आपला जीव दिल्याचं समोर आलं आहे. शेतातील पिकांवर फवारणी करण्यासाठी गेलेल्या शेतकरी पिता-पुत्राला वीजेच्या […]
सर्वोच्च न्यायालयाचे महामार्गावरील दारूच्या दुकानासंदर्भात महत्त्वपूर्ण आदेश
सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील दारुच्या दुकानांसाठी महत्त्वाचा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने महामार्गाच्या ५०० मीटर अंतरातील दुकानांना परवाना देणे बंद करा, असे आदेश दिले आहेत. पण २० हजार किंवा त्यापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या स्थानिक संस्थांच्या कार्यक्षेत्रातील हे अंतर २२० मीटर एवढे असणार आहे. केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकार […]
आ. भास्कर जाधव यांनी अरेरावी केली नाही, आमचे गेल्या अनेक वर्षांपासून घरगुती संबंध आहेत
चिपळूण येथे पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आणि पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेले असताना एका महिलेने मुख्यमंत्र्यांना मदत मागितली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत असलेल्या भास्कर जाधव यांनी महिलेला उलट उत्तर दिले. भास्कर जाधव यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर चहुबाजूंनी टीका झाली होती. परंतु आता खुद्द त्या महिलेने यावर भाष्य करत आपलं मत व्यक्त केल […]











