ताज्याघडामोडी

बाप-लेकाला बसला विजेचा धक्का; पाळीव कुत्र्याने तार खेचून वाचविण्याचा केला प्रयत्न, पण.

जीव लावला तर पाळीव प्राणी आपल्या मालकासाठी काहीही करण्यास तयार असतात, हे आपण अनेक गोष्टींतून ऐकलं आहे. त्यातही पाळीव कुत्रा तर सर्वात इमानी प्राणी म्हणून ओळखला जातो. अशीच काहीशी घटना पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात घडली. येथे एका पाळीव कुत्र्याने मालकाला वाचविण्यासाठी आपला जीव दिल्याचं समोर आलं आहे.

शेतातील पिकांवर फवारणी करण्यासाठी गेलेल्या शेतकरी पिता-पुत्राला वीजेच्या तुटलेल्या तारेचा धक्का बसला. ही घटना घडत असताना पाळीव कुत्र्याने वीजेचा तार तोंडात धरून ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकरी पित्रा-पुत्रासह कुत्र्याचा जागीच मृत्यू झाला.

जुन्नर तालुक्यातील बोरी खुर्द गावातील पटाडेमळा येथील ही घटना आहे.येथे दोन दिवसापूर्वी झालेल्या वादळात विजेचा सिमेंट पोल शेतात पडला होता. शेतात पडलेल्या विजेच्या तारांमध्ये वीजप्रवाह होता. या तारेला स्पर्श झाल्यामुळे यादव भिमाजी पटाडे (वय वर्ष 65 वर्षे) व त्यांचा मुलगा श्रीकांत यादव पटाडे (वय 35) या दोघा पिता पुत्रांचा करुण अंत झाला. त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या कुत्र्याचाही मृत्यू झाला.

दरम्यान महावितरणने वेळेत कामं केली नाही. त्यामुळेच शेतकरी पिता-पुत्राला प्राणाला मुकावे लागले असा आरोप येथील गावकऱ्यांनी केला आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *