ताज्याघडामोडी

स्वेरीच्या पूजा काटे यांची ‘अल्टीमेट्रीक इंडिया प्रा. लिमिटेड’ या कंपनीत निवड

पंढरपूरः पुणे येथील ‘अल्टीमेट्रीक इंडिया प्रा.लिमिटेड’ या बहुराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या निवड प्रक्रियेतून गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील पूजा अशोक काटे या विद्यार्थीनीची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली. ‘अल्टीमेट्रीक इंडिया प्रा. लिमिटेड’ या कंपनीच्या निवड […]

ताज्याघडामोडी

शाळेत खिडकीतून चिमुकलीच्या हातावरच सापाने उडी मारुन केला दंश

कणकवली तालुक्यातील वागदे केंद्रशाळेमधील दुसरी इयत्तेत शिकणाऱ्या सात वर्षीय विद्यार्थिनीला मण्यार जातीच्या सर्पाचा दंश झाला. स्वरा संतोष घाडीगावकर(रा.वागदे, सावरवाडी) असे तिचे नाव आहे. ही बाब शाळेतील शिक्षकांच्या लक्षात येताच त्या विद्यार्थिनीला तत्काळ कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच जिल्हापरिषदेच्या माजी अध्यक्षा संजना सावंत, भाजपाचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे ,युवा सेनेचे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

रुग्णवाहिकेतील कम्पाऊंडरनेच लांबवली जखमीची पावणेदोन लाख रुपये किंमतीची चेन

महामार्गावर दुचाकी-चारचाकीमध्ये धडक झाल्यानंतर जखमीला रुग्णवाहिकेत हलवत असतानाच रुग्णवाहिकेतील कम्पाऊंडरनेच जखमीची पावणेदोन लाख रुपये किंमतीची चेन लांबवली. धक्कादायक घटना बुधवारी रात्री साडेनऊ वाजता घडली. बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला अटक केली. राजीव मोतीराम सुरवाडे (44, सात नंबर पोलिस चौकीमागे, नालंदा नगर भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. दरम्यान, या अपघात प्रकरणी स्वीप्ट (एम.एच.19 बी.यु.1766) […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगडच्या सुरज राऊतची तीन कंपनीत मुलाखतीतून निवड

अंतिम वर्षांत शिक्षण घेत असतानाच सिंहगड मधुन प्लेसमेंट पंढरपूर: प्रतिनिधी  अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांना नामंकित कंपनीत प्लेसमेंट होणे तितकेच महत्वाचे आहे. गेल्या अनेक वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रातील यशस्वी वाटचालीतून पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग महाविद्यालयाने अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात नावलौकिक संपादित केला आहे. कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागात अंतिम वर्षात शिक्षण घेत […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

तरुणीसोबत धक्कादायक प्रकार ; मिरची पावडर आणि दारुचा वापर करून अत्याचार

पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. सतत कोणत्या न कोणत्या कारणाने हत्या, अपहरण अशा घटना घडत असतात. अशीच एक संतापजनक घटना पुण्यातील निगडी येथील गंगानगर येथे घडला आहे. एका तरुणीचा पाठलाग करत चार जणांनी मिळून तिला पकडत तिच्या तोंडात मिरची पावडर कोंबली. तिच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली. तसेच तिच्या सर्व कपड्यांवर आणि गुप्तांगावर दारु ओतून तिच्या […]

ताज्याघडामोडी

पत्नीला घाबरवण्याच्या नादात पतीला लागला गळफास

विरार मध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीला घाबरवण्याच्या नादात पतीला गळफास लागला आहे. यामध्ये पतीचा जागीच मृत्यू झाला आहे. विरार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विरार पूर्वेतील वीर सावरकर मार्ग परिसरातील लक्ष्मीनिवास या ठिकाणी सात दिवसांपूर्वीच मयत भगवान रामजी शर्मा वय वर्ष 35 आणि त्याची पत्नी चांदणी देवी वय वर्ष 25 हे राहायला आले होते. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

चौकीतच २० हजाराची लाच घेताना पोलिसाला पकडले

एका पोलीस नाईकाला २० हजार रुपयांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत विभागाच्या पथकाने पोलीस चौकीत रंगेहात पकडले. ही घटना मुंबई-नाशिक महार्गावरील भिवंडी तालुक्यातील तळवली नाका पोलीसचौकी नजीक घडली आहे. या घटनेमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून लाचखोराला बेड्या ठोकल्या आहेत. भरत शरद जगदाळे असे अटक केलेल्या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

प्रियकरासोबत कट रचून पत्नीने चिरला पतीचा गळा, 24 तासात पोलिसांनी असा लावला छडा

दशरथ नागनाथ नारायणकर या व्यक्तीचा खून 21 सप्टेंबर रोजी झाला होता. क्राईम ब्रँचने या खुनाचा छडा लावत 24 तासांत गुन्हा उघडकीस आणला आहे. 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता गुन्हे शाखेने याबाबत अधिकृत माहिती दिली. मयत दशरथ नारायणकर याची पत्नी अरुणा नारायणकर व तिचा प्रियकर बाबासो जालिंदर बाळशंकर या दोन संशयीतांना ताब्यात घेतले आहे. या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

वर्गमित्राच्या त्रासाला कंटाळून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

नांदेडमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वर्गमित्राच्या त्रासाला कंटाळून या विद्यार्थिनीने आपली जीवन यात्रा संपवली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गीता कदम असे मयत तरुणीचे नाव आहे. ती उस्मानाबादची रहिवाशी होती. नांदेडच्या श्री गोबिंदसिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालयात बीई यांत्रिकी शाखेत तिसऱ्या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पत्नीने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्याचा राग, पतीचा दोन चिमुकल्यांवर कोयत्याने हल्ला

पत्नीने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्याच्या रागातून पतीने आपल्या ५ आणि ६ वर्षे वयाच्या चिमुकल्यांवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना कराड तालुक्यातील गोटे या  गावातून समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी रामदास बाबासो वायदंडे (रा. गोटे, ता. कराड) या निर्दयी बापाला अटक केली आहे. पत्नीने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्याच्या रागातून पतीने आपल्या ५ आणि ६ वर्षे वयाच्या चिमुकल्यांवर […]