ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगडच्या सुरज राऊतची तीन कंपनीत मुलाखतीतून निवड

अंतिम वर्षांत शिक्षण घेत असतानाच सिंहगड मधुन प्लेसमेंट

पंढरपूर: प्रतिनिधी 

अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांना नामंकित कंपनीत प्लेसमेंट होणे तितकेच महत्वाचे आहे. गेल्या अनेक वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रातील यशस्वी वाटचालीतून पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग महाविद्यालयाने अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात नावलौकिक संपादित केला आहे. कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागात अंतिम वर्षात शिक्षण घेत असतानाच काॅग्निझंट, विप्रो आणि सिन्टेल आदी ३ कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असून या निवडीबद्दल सुरज राऊत चा सर्व अभिनंदन होत आहे.

पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधुन विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच प्लेसमेंटसाठी लागणाऱ्या सर्वच गोष्टीचे अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांकडून प्रशिक्षण देण्यात येत असते. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटसाठी खुप मोठा फायदा होत आहे. महाविद्यालयातील अंतिम वर्षात म्हणजे २०२१ मध्ये इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागातून अभियांत्रिकीची पदवी प्राप्त करणाऱ्या कुमार सुरज पांडुरंग राऊत यांनी महाविद्यालयात कोरोना कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन कॅम्पस ड्राईव्ह मधून विविध नामांकित कंपनीत मुलाखती दिल्या होत्या. या पैकी “काॅग्निझंट वार्षिक पॅकेज (४ लाख), विप्रो (३.५०) आणि सिन्टेल (३.४०)” आदी ३ कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली आहे.

ह्या कंपन्या आयटी, कारपोरेशन क्षेत्रात कार्यरत असुन अशा या कंपनीत पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अंतिम वर्षात शिक्षण घेत असताना नोकरी मिळत असल्याने पालक वर्गातून आनंद व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *