ताज्याघडामोडी

महसूल विभागाने वाळूचे दर वाढविले ;आता ६०० रुपये ब्रासने मिळणार वाळू 

गौण खनिजाच्या स्वामित्वधनाच्या दरात सुधारणा करण्यात आली आहे. येत्या 1 जुलै 2021 पासून नवीन दर लागू होणार असल्याचे महसूल व वन विभागाने कळविले आहे. बांधकाम साहित्य म्हणून वापरण्यात येणारा चुना तयार करण्यासाठी भट्ट्यांमध्ये वापरण्यात येणारी चुनखडी व शिंपल्यापासून केलेल्या चुन्याचा दर आता 600 रुपये प्रति ब्रास असणार आहे. उत्खननाद्वारे किंवा गोळा करुन काढलेले सर्व दगड […]

ताज्याघडामोडी

शिवसेनेच्या आमदाराने रिक्षा चालकाला शिकविला धडा

   आज औरंगाबाद शहरातील गर्दीचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रांती चौकात ट्राफिकजॅम झाली होती. त्यावेळी आमदार अंबादास दानवे यांनी वाहतूक नियोजनासाठी शिवससैनिकांन सोबत घेऊन वाहतूक पोलिसांची मदत करत होते असे त्यांनी सांगितले. यावर अधिक माहिती अशी कि, वाहतूक कोंडी झाल्यामुळे अंबादास दानवे वाहतूक नियोजन लावत असताना अचानक एक रिक्षावाला रस्त्याच्या विरुद्ध बाजूने जातो आणि दानवे […]

ताज्याघडामोडी

28 जून ते 4 जुलैपर्यंत देहू आणि आसपासच्या 6 गावांमध्ये संचारबंदी लागू

देहू, आळंदी : अवघ्या महाराष्ट्राचा धार्मिक सोहळा अर्थात आषाढी वारी सोहळा येत्या 1 जुलैला जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानाने सुरू होतोय…! पण यंदा ही कोरोनामुळे हा सोहळा मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थित होणार आहे. भागवतांच्या संभाव्य गर्दीमुळे पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालायकडून देहू आणि आळंदीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आलीये. त्याच पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी 28 जून ते 4 जुलै […]

ताज्याघडामोडी

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लागू

  मुंबई : जेव्हा महाराष्ट्रात दिवसाला सरासरी 25 हजार रुग्ण निघत होते, तेव्हा महाराष्ट्रात अनलॉक मोहिम राबवली गेली, मात्र आता रुग्णसंख्या 10 हजारांच्या आत येऊनही, संपूर्ण राज्य पुन्हा निर्बंधांच्या फेऱ्यात अडकलंय. रुग्ण घटल्यानंतरही निर्बंध लादल्यामागचं पहिलं कारणं म्हणजे कोरोनााच डेल्टा प्लस व्हेरियंट. आणि दुसरं सर्वात प्रमुख कारण म्हणजे दुसऱ्या लाटेवेळी अमरावती जिल्ह्यानं शिकवलेला धडा. जानेवारी […]

ताज्याघडामोडी

मॅनेज झाल्याच्या आरोपांना संभाजीराजेंचं सडेतोड उत्तर; मोर्चा काढणाऱ्यांनाही दिला सल्ला!

कोल्हापूर : ‘मी छत्रपती आहे, मी कसा मॅनेज होईन’ असा सवाल करत संभाजीराजे छत्रपती यांनी आरक्षणाच्या लढाईसाठी स्टंटबाजी करण्याची गरज नसल्याचा टोला लगावला आहे. आंदोलन करताना, मोर्चा काढताना जरा आजुबाजूला करोनाची काय स्थिती आहे, याचे भान ठेवा असा सल्लाही त्यांनी मराठा आरक्षणाप्रश्नी ठोक मोर्चा काढण्याचा इशारा दिलेल्या संघटनांना दिला आहे. खासदार संभाजीराजे यांनी मराठा समाजाच्या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

शेतीच्या वादातून बाप-लेकांवर लाठ्या-काठ्या आणि शस्त्राने हल्ला; तीन जण गंभीर जखमी, मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

बुलढाणा शेतातील धुऱ्याच्या वादावरून सोळंके परिवारावर खरात कुटुंबियाने सशस्त्र हल्ला केल्याने यामध्ये तीन जण गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना सिंदखेड राजा तालुक्यातील डावरगाव येथे घडली आहे. या प्रकरणी सिंदखेड राजा पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले असून जखमींवर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंदा सोळंके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, डावरगाव येथील खरात व सोळंके परिवारात गेल्या १० […]

ताज्याघडामोडी

‘मला रोज धमक्यांचे फोन येत आहेत’

लोणावळा, 27 जून: ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ओबीसी समाजाच्या मागण्या आणि राजकीय आरक्षणाच्या संदर्भात लोणावळ्यात ओबीसी महासंघाने ओबीसी परिषद भरवली होती. या परिषदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी सहभाग घेतला. या ओबीसी परिषदेत मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाषणा दरम्यान केलेल्या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे. वडेट्टीवारांना धमकावणारे […]

ताज्याघडामोडी

आपत्तीजनक परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे प्रांताधिकारी ढोले यांच्या सूचना

  आपत्तीजनक परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे प्रांताधिकारी ढोले यांच्या सूचना पंढरपूर (दि.27):- संभाव्य अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या आपत्तीजनक परिस्थितीचा सामना करण्यासाठी तालुक्यातील सर्व यंत्रणांनी पूर्वनियोजन करून तसेच समन्वय ठेवून सतर्क राहावे ,अशा सूचना प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या.     गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीने  तसेच पूर परिस्थितीमुळे तालुक्यातील शेत पिकांची व […]

ताज्याघडामोडी

माजी गृहमंत्री देशमुखांच्या मुलाच्या संस्थेला कोलकत्ता येथील कंपनीकडून सव्वातीन कोटी रुपयांची देणगी

 महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री यांची सध्या ईडीकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीदरम्यान ईडीने गंभीर असा आरोप केला आहे की, निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याने अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरुन डिसेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीमध्ये मुंबईच्या काही पब्स, बारच्या मालकांकडून चार कोटीहून अधिक वसुली केली. ईडीच्या म्हणण्यानुसार वाझेने देशमुखांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांना […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

झोपलेल्या दाम्पत्याची डोक्यात फावडे घालून निर्घृण हत्या

शिर्डी जवळील को-हाळे शिवारात चांगलेमळा येथील दांम्पत्याच्या हत्येने परिसरात एकच खळबळ उडाली. रात्रीच्या सुमारास दांम्पत्य गाढ झोपेत असताना फावडे डोक्यात घालून दोघांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. शशिकांत चांगले ( वय 55 ) आणि सिंधू चांगले ( वय 50 ) असे हत्या झालेल्या पती – पत्नीच नाव आहे. शशिकांत आणि सिंधु […]