ताज्याघडामोडी

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग

 सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पंढरपूर तालुक्यासह ५ तालुक्यात कडक लॉकडाऊनची अमंलबजावणी करत अत्यावश्यक सेवेशिवाय इतर व्यवसायिकास आपल्या आस्थापना उघडण्यास परवानगी नाकारली आहे व जर या आदेशाचा भंग केला तर गुन्हे दाखल केले जातील असा इशाराही दिला आहे. पंढरपुर शहरात लागू करण्यात आलेल्या आदेशा विरोधात शहरातील काही व्यापारी आणि दुकानदार यांनी विरोध दर्शविला.तर राजकीय पातळीवरूनही […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पत्नीने पतिवर केले कात्रीने वार

पिऊन रोज घरी येणे आणि पत्नीला मारहाण करणे, पतीला चांगलेच महागात पडले आहे. यामुळे वैतागलेल्या पत्नीने तिच्या पतीवर कात्रीने जीवघेणा हल्ला केला आहे. रस्त्याच्या मध्यभागी या पती-पत्नीमध्ये झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. अकोला शहरातील ही घटना आहे. पत्नीने हल्ला करुन पतीला जखमी केले आहे. स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी केल्याने मोठा अनर्थ टळला. […]

ताज्याघडामोडी

पुण्यातून देशातील 21 शहरांसाठी विमानसेवा; 20 ऑगस्टपासून प्रारंभ

पुण्यातून आता देशातील 21 शहरांसाठी विमान सेवा सुरु होणार आहे. इंडिगो या विमान वाहतूक कंपनीकडून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार दर सोमवारी आणि शुक्रवारी पुण्याहून अमृतसरसाठी विमान सुटेल. अमृतसरसाठी 20ऑगस्टपासून तर रांची आणि तिरुअनंतपुरमसाठी 21 ऑगस्टपासून पुण्यातील लोहगाव विमानतळावरून विमानसेवा सुरू होईल. तर दुसरीकडे कोल्हापूर ते नागपूर या विमानसेवेचाही प्रारंभ होणार आहे. याशिवाय, […]

ताज्याघडामोडी

तर नाईलाजाने लाॅकडाऊन पुन्हा लागू शकतो

गेल्या दीड वर्षापासून करोनाचं संकट आहे आणि त्यातून मुक्त होण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. १६ ऑगस्टपासून राज्यातील काही बंधनं शिथिल करतो आहोत. पण करोनाचं संकट अजूनही टळलेलं नाही. शिथिलतेमध्ये आवश्यक असलेले निर्बंध पाळावे लागतील. कारण ऑक्सिजनचा पुरवठा त्या मर्यादेच्या पुढे गेला, तर कदाचित आपल्याला लॉकडाऊन पुन्हा लावावा लागू शकतो, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.मुख्यमंत्री […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

संजय राठोडांचा पाय खोलात, तक्रारदार महिला पोहचली पोलीस ठाण्यात

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे मंत्रीपद गमवावे लागलेले शिवसेना नेते आणि माजी मंत्री संजय राठोड यांच्या मागे लागलेली शुक्लकाष्ठ संपता संपत नाहीयेत. एका महिलेने संजय राठोड यांनी आपल्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप केल्याने संजय राठोड पुन्हा अडचणीत आले आहेत. ही महिला आज शनिवारी घाटंजी पोलीस ठाण्यात जबाब नोंदवण्यासाठी आली होती. संबधित महिलेने यवतमाळ येथील पोलीस अधिक्षकांना […]

ताज्याघडामोडी

मुख्यमंत्र्यांचे पीए आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनाक अज्ञाताकडून व्हॉट्सअपवर धमकी

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पीएला धमकीचा फोन आल्याचं समोर आला आहे. मिलिंद नार्वेकर यांना एका अज्ञात व्यक्तीकडून व्हॉट्सअपवर धमकी देण्यात आली आहे. या अज्ञात व्यक्तीने काही मागण्या केल्या असून त्या पूर्ण न केल्यास त्यांच्या मागे ईडी, एनआयए आणि सीबीआयची चौकशी करायला लावू अशी धमकी देण्यात आली आहे. या अज्ञात व्यक्तीने मिलिंद नार्वेकर यांच्याकडे अनेक […]

ताज्याघडामोडी

…तर मंत्रालय,मातोश्रीवर तलवार अन् दंडुके मोर्चा काढणार

राज्यातील विद्यमान व पूर्वीच्या दाेन्ही सरकारने मराठा अारक्षणाचा वापर केला अाहे. अाताचे सरकार तीन पक्षांचे अाहे. तिघांच्या जाहीरनाम्यात मराठा अारक्षणाचे अाश्वासन हाेते, परंतु अाता केंद्राकडे अाणि न्यायालयाकडे बाेट दाखवले जात आहे. सरकारला जर मूक माेर्चाची भाषा समजत नसेल तर अाक्रमक भूमिका घ्यावी लागेल. याबाबत येत्या २५ राेजी पुणे येथील बैठकीत निर्णय घेण्यात येणार असून अाता […]

ताज्याघडामोडी

महाराष्ट्रात एंट्रीसाठी दोन्ही ‘डोस’ आवश्यक, RTPCR रिपोर्ट नसेल तर 14 दिवस राहावे लागेल ‘क्वारंटाइन’

 महाराष्ट्र सरकारने कोरोनादरम्यान बाहेरून येणार्‍या प्रवाशांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यात जर कुणी प्रवाशी प्रवेश करत असेल तर त्याने कोरोना व्हॅक्सीनचे दोन्ही डोस घेतलेले असणे आवश्यक आहे. पुरावा म्हणून त्यांना व्हॅक्सीन सर्टिफिकेट सुद्धा सोबत ठेवावे लागेल. जर व्हॅक्सीन घेतलेली नसेल तर निगेटिव्ह आरटीपीसीआर रिपोर्ट दाखवणे आवश्यक राहील. हा रिपोर्ट 72 तासांमधील असावा. जर या […]

ताज्याघडामोडी

एसटी महामंडळाने सुरू केली इलेक्ट्रिक बस

सोलापूर:डिझेलची बचत व्हावी आणि प्रदूषण कमी व्हावे या हेतूने एसटी महामंडळाने इलेक्ट्रिक बस सुरू करण्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. नियत तयार करा, अशा प्रकारचे आदेश महामंडळाने सर्व जिल्ह्यांतील विभाग नियंत्रकांना पाठवले आहेत. यात राज्यातील महत्त्वाच्या ३२ विभागांचा समावेश करण्यात आला आहे. या नव्या विचाराने प्रवासी सुखावणार असून डिझेल महागाईच्या दृष्टीने बचत आणि विजेवर चालणारी […]

ताज्याघडामोडी

पवारांनी जातीचं विष पेरलं, राज ठाकरेंच्या दाव्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक

राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर राज्यात जातीय अस्मितेचा मुद्दा पुढे आला, असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. त्यावर राष्ट्रवादीने पलटवार केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शाहू – फुले – आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष आहे. त्यांच्या ठरलेल्या धोरणानुसार आम्ही राजकारण करतो. मात्र राज ठाकरे यांना हे माहीत नसावे किंवा जातीव्यवस्थेचा इतिहास माहित नसावा म्हणून ते अशाप्रकारचे वक्तव्य करत […]