गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

स्त्री रोग तज्ञ् डॉक्टर असलेल्या भाजप पदाधिकाऱ्या विरोधात विनयभंगाची तक्रार

  बीड जिल्ह्यातील धारूरचे भाजपचे नगराध्यक्ष डॉ स्वरूपसिंह हजारीयांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. याप्रकारने राजकीय आणि आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.नगराध्यक्ष डॉ स्वरूपसिंह हजारी  यांच्या विरोधात  गुन्हा दाखल झाल्याचे समजताच असोसिएशनच्या सर्व डॉक्टरांनी आपले हॉस्पिटल बंद ठेवत निषेध नोंदवला आहे.तर व्यापारी संघटनेने बाजारपेठ कडकडीत बंद ठेऊन  तात्काळ गुन्हा मागे घेण्याची मागणी केली आहे. यामुळे बीड […]

ताज्याघडामोडी

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेडमधील घरावर दगडफेक

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या घरावर अज्ञातांकडून दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. अशोक चव्हाणांच्या नांदेड येथील घरावर ही दगडफेक झाली आहे. एका अनोळखी महिलने ही दगडफेक केली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या घरावर अज्ञात महिलेने दगडफेक केली आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली […]

ताज्याघडामोडी

लसीकरणात भारताचा नवा विक्रम, एका दिवसात तब्बल 1.32 कोटी नागरिकांना डोस

  कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या धोक्यात, लसीकरणातून एक चांगली बातमी आली आहे.कोरोना लसीकरणाबाबत भारतात एक नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. भारताने एका दिवसात 1 कोटी 32 लाखांहून अधिक लसीचे डोस देऊन स्वतःचा जुना विक्रम मोडला. 31 ऑगस्ट रोजी एका दिवसात 1 कोटी 32 लाख 45 हजार 266 डोस दिले गेले. यामध्ये 1 कोटी 35 हजार 652 […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

वाळू चोरीची वाट अडवणाऱ्या शेतकऱ्यास ग्रामपंचायतीसमोर बोलवून बेदम मारहाण

पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात १० जणांविरोधात गुन्हा दाखल  नदीकाठी शेती असणारा शेतकरी म्हणजे मळई रानाचा नशीबवान मालक म्हणून ओळखला जातो.पण पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीकाठावरील काही गावांमध्ये वाळू चोरांनी घातलेला हैदोस नदीकाठची शेती असलेल्या अनेक शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरला असून अनेक गावातील मुजोर वाळूचोर वाळूची वाहने नदीपात्रातून वर काढण्यासाठी बेधडकपणे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून रस्ता काढत असल्याचे अनेक वेळा […]

ताज्याघडामोडी

24 तासांत राज्यभर मुसळधार पावसाचा इशारा; 6 जिल्ह्यांना अधिक धोका

  गेली दोन दिवस राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. विदर्भासह मराठवाडा, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रालाही मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे. आजही राज्यात पावसाची स्थिती कायम आहे. आज दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून (IMD) देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील चोवीस तासांत राज्यात अनेक ठिकाणी […]

ताज्याघडामोडी

सातत्याने तक्रार येणा-या हाॅस्पिटलवर यापुढे गुन्हे दाखल करण्यात येणार

जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने आता पर्यंत २२ हजार पेक्षा अधिक कोरोना रुग्णांच्या बिलांचे ऑडिट करून तब्बल १७ कोटी ३४ लाख रुपये कमी केले आहेत. यापुढे सातत्याने तक्रार येणा-या हाॅस्पिटलवर यापुढे गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी दिला आहे. जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेमुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनाकाळात रुग्णालयांनी आकारलेल्या आवास्तव बिलांच्याविरोधात […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं

कल्याण तहसील कार्यालयात 1 लाख २० हजारांची लाच घेताना तहसीलदार व त्यांच्या शिपायाला लाच लुचपत विभागाच्या पथकाने अटक केली होती. ही घटना ताजी असतानाच नगर जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात जमिनीची मोजणी करून देण्याच्या मोबदल्यात लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला लाचलुचपत विभागाने बेड्या ठोकल्या. जमिनीची मोजणी करून देण्याच्या मोबदल्यात पाच हजाराची लाच स्वीकारताना शिरुर येथील […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

खाजगी सावकाराच्या तगाद्याला कंटाळून व्यवसायिकाची आत्महत्या

  कोरोनामुळे व्यापारी वर्गाला मोठा फटका बसला आहे. अनेकांचे व्यवसाय डबघाईस आले, परिणामी या व्यावसायिकांना नवीन व्यवसाय उभा करण्यासाठी सावकारांच्या दारात जावे लागले. खाजगी सावकारांनी कर्ज दिले मात्र मात्र कर्ज वसुलीसाठी ते सारखे तगादा लावत आहेत. तगादा असह्य झाल्याने व्यापाऱ्यांचे मानसिक संतुलन ढासळत चालेले आहे आणि त्यातूनच आत्महत्त्यासारखे प्रकार घडत आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील वडगाव परिसरात […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने ठाण्याच्या  सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध

महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समिती व पंढरपूर नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने ठाण्याच्या  सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून निदर्शने करण्यात येऊन काम बंद आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समिती व पंढरपूर नगर परिषद कामगार संघटनेच्यावतीने ठाण्याच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून […]

ताज्याघडामोडी

दहा पेक्षा अधिक रुग्ण वाढल्याने  तालुक्यातील सात गावांत कडक निर्बंध प्रांताधिकारी गुरव यांची माहिती

दहा पेक्षा अधिक रुग्ण वाढल्याने  तालुक्यातील सात गावांत कडक निर्बंध प्रांताधिकारी गुरव यांची माहिती                पंढरपूर दि. 31 :-  तालुक्यातील ग्रामीण भागातील कोरोना संसर्गाचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी  तसेच आवश्यक प्रतिबधात्मक उपाययोजना करण्यासाठी  ज्या गावांत 10 किंवा 10 पेक्षा अधिक कोरोना बाधित रुग्ण असतील ते संपूर्ण गांव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला […]