गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

स्त्री रोग तज्ञ् डॉक्टर असलेल्या भाजप पदाधिकाऱ्या विरोधात विनयभंगाची तक्रार

 

बीड जिल्ह्यातील धारूरचे भाजपचे नगराध्यक्ष डॉ स्वरूपसिंह हजारीयांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. याप्रकारने राजकीय आणि आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.नगराध्यक्ष डॉ स्वरूपसिंह हजारी  यांच्या विरोधात  गुन्हा दाखल झाल्याचे समजताच असोसिएशनच्या सर्व डॉक्टरांनी आपले हॉस्पिटल बंद ठेवत निषेध नोंदवला आहे.तर व्यापारी संघटनेने बाजारपेठ कडकडीत बंद ठेऊन  तात्काळ गुन्हा मागे घेण्याची मागणी केली आहे. यामुळे बीड जिल्ह्यात राजकीय वर्तुळात वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

19 वर्षाची गर्भवती काल दुपारी  तपासणीसाठी आली. तिला सोनोग्राफी करायची असा कारण सांगून सोनोग्राफी सेंटरमध्ये अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. तसेच जातीवाचक बोललाअसा तरुणीचा आरोप आहे.हा प्रकार नातेवाईकांना सांगून गर्भवती थेट धारूर ठाण्यात पोहचली. तक्रार दिल्यानंतर डॉ. हजारी विरोधात विनयभंग व अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *