गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

महिला इन्स्पेक्टरची दादागिरी! ऑन ड्यूटी दाबून घेतले पाय

उत्तर प्रदेशातील संभलमध्ये तैनात असलेल्या महिला इन्स्पेक्टरचा असा फोटो व्हायरल होत असून, त्यामुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. वास्तविक, व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये महिला इन्स्पेक्टर ड्युटीदरम्यान एका व्यक्तीकडून पाय दाबून घेताना दिसत आहे. हा व्हायरल फोटो एसपींच्या निदर्शनास येताच महिला इन्स्पेक्टरला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले. यासोबतच एसपी चक्रेश मिश्रा यांनी पिंक चौकीच्या प्रभारी पदी या […]

ताज्याघडामोडी

दिलासादायक! जिम, ब्युटी सलून चालू राहणार; सरकारचे सुधारित आदेश

जिमला जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून महाराष्ट्र सरकारने जिम सुरू ठेवायला परवानगी दिली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे काल (8 जानेवारी) सरकारने नवीन निर्बंध लागू केले आहे. निर्बंध लागू करत असताना जिम आणि ब्युटी सलून पूर्णतः बंद करण्याचे निर्देश दिले होते. मात्र आज (9 जानेवारी) सरकारने सुधारित आदेश काढत ब्युटी सलून आणि जिम चालू ठेवायला परवानगी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पत्नीला आधी दिला करंट पण जीव गेला नाही म्हणून कुर्‍हाडीने वार

चंद्रपूरमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पती, पत्नीत झालेल्या वादाचे रूपांतर क्रूर घटनेत झाले. रागाच्या भरात पतीने आपल्या पत्नीला विद्युत करंट देऊन मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, विद्युत करंटने पत्नीचा मृत्यू झाला नाही हे लक्षात येताच पतीने कुऱ्हाडीने सपासप वार करून पत्नीला ठार केले. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे यानंतर पतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना […]

ताज्याघडामोडी

राज्यात पुन्हा कठोर निर्बंध; दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू

कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. रविवारी मध्यरात्री बारा वाजेपासून कठोर निर्बंध लागू करण्यात येत आहेत. रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येणार असून दिवसा पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांचा जमाव करण्यास मनाई असेल. शाळा महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. याशिवाय, मैदाने, उद्याने, पर्यटनस्थळांसह स्विमिंग […]

ताज्याघडामोडी

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर फेरविचार याचिका; १२ जानेवारीला सुनावणी

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा सुप्रीम कोर्टात गेलाय. कारण मराठा आरक्षणासाठी लढा देणारे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. त्यावर १२ जानेवारीला सुनावणी होण्याची शक्यता असल्याचं विनोद पाटील यांनी सांगितलं आहे. यावर बोलताना पाटील म्हणाले की, मराठा आरक्षण नाकारताना नवे प्रवर्ग निर्माण करण्याचा अधिकार राज्यांना नाही, असं सुप्रीम कोर्टाने […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

जमिनीच्या वादातून मुलानेच काढला बापाचा काटा, बहिणीच्या मुलांनाच दिली होती सुपारी

जालना तालुक्यातील मौजे पुणेगाव येथे एका वृद्धाचा जमिनीच्या वादातून मुलानेच काटा काढला. धक्कादायक म्हणजे चुलत बहिणीच्या मुलांनाच या नराधम मुलाने वडिलांच्या हत्येची सुपारी दिली. या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या दोन दिवसात तपास लावला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाऊसाहेब चव्हाण असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 5 जानेवारीला शेतात झोपायला गेल्यावर अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर चाकूने वार करून आणि […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

सावधान! WhatsApp वरुन चोरी होऊ शकतात तुमचे बँक डिटेल्स, असा होतोय Fraud

ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार सतत वाढत आहेत. इंटरनेट स्कॅमर्स फ्रॉडसाठी दररोज नव्या पद्धतींचा वापर करत आहेत. त्यामुळे युजरची छोटीशी चूकही मोठं नुकसान करू शकते. काही दिवसांपूर्वी फेक पेटीएमद्वारे फसवणुकीचे प्रकार समोर आले होते. कधी KYC च्या नावे, तर कधी एटीएम किंवा क्रेटिड कार्ड अपडेट करण्याच्या नावाने लोकांची फसवणूक झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे ऑनलाइन […]

ताज्याघडामोडी

पाच राज्यांतील निवडणुकांचे बिगुल वाजले; सात टप्प्यांमध्ये होणार निवडणुका

देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखांचे बिगूल अखेर वाजले असून या निवडणुका सात टप्प्यांमध्ये घेण्यात येणार आहे, असे निडवणूक आयोगाने जाहीर केले आहे. तर, मतमोजणी 10 मार्च रोजी होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रॅलींना 15 जानेवारीपरर्यंत बंदी घालण्यात आली आहे. तसचे रोड शो आणि बाईक शो वर देखील बंदी घालण्यात आली आहे. निवडणुकांच्या काळात गुन्हेगारी पार्श्वभूमी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

रात्री गाडी अडवल्याचा राग, शिवसेना पदाधिकाऱ्याची सकाळी तरुणाला रॉडने मारहाण

अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने एका तरुणाला रॉडने मारहाण केल्याची घटना घडली आहे. जुन्या अंबरनाथ गाव परिसरात घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. रात्री गाडी अडवल्याने पदाधिकाऱ्याने सकाळी तरुणाला मारहाण केल्याचा आरोप आहे. काय आहे प्रकरण? अंबरनाथच्या पालेगाव-जुन्या अंबरनाथ गाव परिसरात राज देशेकर हा वास्तव्याला आहे. राज हा याच परिसरातील मनसे शहर उपाध्यक्ष अजय पाटील […]

ताज्याघडामोडी

राज्यात आजपासून पुन्हा पावसाचा अंदाज; या शहरांना यलो अ‌लर्ट

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात काही ठिकाणी पहाटेपासूनच हलक्या पावसाच्या सरी पाहायला मिळाल्या आहेत. मुंबईसह ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी पहाटे रिमझिम पाऊस झाला आहे. राज्यात पुढील चार ते पाच दिवस अवकाळी पावसासोबतच गारपिटीची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. 7 ते 10 जानेवारीदरम्यान राज्यातील विविध भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर, 9 जानेवारीला विदर्भातील […]