ताज्याघडामोडी

पाच राज्यांतील निवडणुकांचे बिगुल वाजले; सात टप्प्यांमध्ये होणार निवडणुका

देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखांचे बिगूल अखेर वाजले असून या निवडणुका सात टप्प्यांमध्ये घेण्यात येणार आहे, असे निडवणूक आयोगाने जाहीर केले आहे.

तर, मतमोजणी 10 मार्च रोजी होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रॅलींना 15 जानेवारीपरर्यंत बंदी घालण्यात आली आहे. तसचे रोड शो आणि बाईक शो वर देखील बंदी घालण्यात आली आहे. निवडणुकांच्या काळात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची माहिती जाहीर करावी लागणार असल्याचे आयोगाकडून यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.या वर्षी मतदान केंद्राची संख्या 2 लाख 15 हजार 368 आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

कोणत्या राज्यात कधी मतदान?

उत्तर प्रदेशात सात टप्प्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यानुसार पहिला टप्प्यात 10 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. दुसरा टप्पा 14 फेब्रुवारी, तिसरा टप्पा 20 फेब्रुवारी, चौथा टप्पा 23 फेब्रुवारी, पाचवा टप्पा 27 फेब्रुवारी, सहावा टप्पा 3 मार्च रोजी, तर सातवा टप्पा 7 मार्च 2022 पार पडणार आहे. पंजाब, उत्तराखंड, गोवा या तीन राज्यांमध्ये 14 फेब्रुवारी 2022 रोजी एका टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तर मणिपूरमध्ये 27 फेब्रुवारी आणि 3 मार्च 2022 रोजी दोन टप्प्यांत मतदान पार पडणार आहे.

सुविधा अॅपच्या माध्यमातून दाखल करता येणार अर्ज

निवडणुकीपूर्वी राज्य सरकार आणि केंद्र सरकारसोबत चर्चा केल्याचे आयोगाकडून यावेळी सांगण्यात आले. निवडणुकांच्या काळात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची माहिती जाहीर करावी लागणार असल्याचे आयोगाकडून यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, यावेळी कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे निवडणुका घेणे आवानात्मक असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी सुशील चंद्रा यांनी यावेळी सांगितले. 690 विधानसभांच्या जागांवर निवडणुका होणार असून, 24.9 लाख मतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या वर्षी सुविधा अॅपच्या माध्यमातून उमेदवारांना ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची सोय करण्यात आली आहे.

प्रत्येक केंद्रावर असणार मास्क आणि सॅनिटायझर

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांमध्ये 24.9 लाख नागरिक पहिल्यांदाच मतदाराचा अधिकार बजावणार असून एकूण 18 कोटी 30 लाख मतदार मतदानाचा हक्क बजाणावणार आहेत. दरम्यान प्रतेयेक मतदान केंद्रावर मास्क आणि सॅनिटायझरची सोय करण्यात येणार आहे.

80 पेक्षा जास्त वय असणारे, दिव्यांग आणि कोरोनाबाधित असणाऱ्यांसाठी पोस्टल बॅलेट वोटिंगची सोय देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशसह ऊर्वरित चारही राज्यांमध्ये आजपासून निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *