पोलीस हवालदार इकबाल अब्दुल रशीद शेख सोलापूर ग्रामीण यांनी गुन्हे अभिलेख केंद्र नवी दिल्ली यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या सीसीटीएनएस व आयसीजेएस या विषयावरील राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभाग घेवून वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरी करून राष्ट्रीय पारितोषिक मिळविले आहे त्याबद्दल दिनांक 04 फेब्रुवारी 2021 रोजी पोलीस महासंचालक कार्यालय, महाराष्ट्र राज्य मुंबई येथे मा. हेमंत नागराळे, नूतन पोलीस महासंचालक, […]
ताज्याघडामोडी
मुलगा हवा यासाठी पत्नीला डांबून मारहाण
बीड : खळबळजनक बातमी बीडमधून. मुलगा व्हावा म्हणून पतीने पत्नीला बेदमपणे मारहाण करत रात्रभर बांधून ठेवले. त्यामध्ये पत्नीचा मृत्यू झाला. मुलाच्या हव्यासापोटी स्वत:च्या पत्नीला डांबूने रात्रभर बेदम मारहाण केल्याने अती रक्तस्त्राव होवून पत्नीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औरंगपूर शिवारात घडली. या घटनेने संताप व्यक्त होत आहे. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या पत्नीला आता मुल होणार नाही. […]
अजित पवार यांच्या ”त्या” वक्तव्याने पंढरपूर तालुक्यातील पक्ष प्रवाशांना रेड सिग्नल
२०१९ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या उमेद्वारा विरोधात काम केलेला नेता मग तो कोण आहे याची फिकीर न करता त्याला पक्षात प्रवेश दिला जाणार नाही असे विधान राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते,उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.इंदापूर येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या तालुका कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना अजित पवार यांनी तुफान टोलेबाजी केली. […]
वाहन चालवण्याच्या परवान्यासाठी ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची अट काढून टाकणार !
ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठीचं अवघड काम आता सोपं होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केलेल्या तरतूदीनुसार, वाहन चालवण्याच्या परवाण्यासाठी आता कोणालाही ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज नाही. या खास योजनेवर काम सुरू असून मंत्रालयाने यासाठी अधिसूचनाही जारी केल्या असल्याची माहिती देण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार, ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटरमधून गाडी शिकत असल्यास ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आता टेस्टची गरज […]
त्याला जागेवरच चोपायला पाहिजे होते,काय चाललंय राज्यात
आजचा हिंदू समाज पूर्णपणे सडलेला आहे, आता मुस्लिमांना मारण्यासाठी काही कारण नको, मुस्लीम आहात हे कारण पुरेसे आहे,’ असं वक्तव्य विद्यार्थी नेता म्हणून चर्चेत असलेल्या शरजील उस्मानी यानं केलं आहे. शर्जील उस्मानीच्या या वक्तव्यानं वादंग निर्माण झाला आहे.याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर राज्य सरकारने देखील शर्जीलवर कारवाई करणार असल्याचे म्हटले. पुण्यातील एल्गार परिषदेत […]
गुन्हा दाखल झाला नाही तर पंढरपूर बंदचा शिवसेनेचा इशारा
भाजपचे माजी उपजिल्हाध्यक्ष शिरीष कटेकर यांनी काल भाजपच्या वतीने करण्यात आलेल्या टाळे ठोको आंदोलनात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह टीका केल्याचा शिवसेना पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे.त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी शिरीष कटेकर यांना काळं फासलं आणि साडी नेसवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत पुढील प्रकार टाळला. या घटनेमुळे पंढरपूर शहरात काही काळ तणावाचं वातावरण […]
NAVY अधिकाऱ्याचं अपहरण करून जिवंत जाळले
पालघर, 6 फेब्रुवारी : नेव्ही अधिकाऱ्याचं अपहरण करून त्याला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. चेन्नई विमानतळावरून या अधिकाऱ्याचं अपहरण करण्यात आलं आणि तलासरी तालुक्यातील वेवजी गावच्या पश्चिम घाटातील जंगलात नेऊन त्याला जिवंत जाळण्यात आलं. सुरजकुमार मिथिलेश दुबे(वय-27, रा. झारखंड, रांची) असं खून झालेल्या नेव्ही अधिकाऱ्याचं नाव आहे. 5 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. सुरजकुमार […]
‘माघी’यात्रेवर संचारबंदीचं सावट, भाविकांना रोखण्यासाठी पंढरपुरात त्रिस्तरीय नाकाबंदी
पंढरपूर : आषाढी व कार्तिकी यात्रेप्रमाणेच नवीन वर्षातील वारकरी संप्रदायाची माघी यात्राही भाविकांविनाच साजरी करावी लागणार आहे. याकाळात सोलापूर जिल्ह्यात त्रिस्तरीय नाकाबंदी उभारली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले. कोरोनाच्या संकटामुळे गेल्यावर्षी वारकरी संप्रदायाच्या चैत्री , आषाढी व कार्तिकी या मोठ्या यात्रा होऊ शकल्या नव्हत्या. अजूनही कोरोनाचे संकट संपले नसल्याने राज्य सरकारने कोरोनाचे […]
सुरेश (भाऊसाहेब) अंबुरे (सर) यांची भाजपच्या जिल्हाउपाध्यक्ष पदी निवड
पंढरपूर: बार्डी-करकंब येथील धनश्री उद्योग समूहाचे अध्यक्ष सुरेश (भाऊसाहेब) अंबुरे (सर) यांची भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाउपाध्यक्ष पदी निवड झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगोला येथे झालेल्या बैठकीत निवड केल्याचे जाहीर केले. सुरेश अंबुरे यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत भाजपचे प्रभावीपणे कार्य केले आहे.पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या चांगल्या पद्धतीने पार पाडल्या आहेत. त्यांच्या […]
वाहन चालविताना वेगाबरोबरच मन आणि भावनांना मुरड घालावी -सपोनि प्रवीण संपागे स्वेरीत ३२ व्या ‘रस्ते सुरक्षा अभियान २०२१’ बाबत मार्गदर्शन
पंढरपूर (संतोष हलकुडे) – ‘वाहतुकीचे नियम पाळताना सर्व नियम पाळणे आवश्यक आहे. वाहन चालवताना सीट बेल्ट लावणे अत्यंत गरजेचे आहे. याचा तोटा होणार नाही परंतु फायदा मात्र नक्कीच होतो. ट्राफिक हवालदार दिसल्यानंतर ट्रिपल सीट दुचाकी चालविताना पाठीमागे बसलेला मित्र वाहन थांबविण्यापुर्वीच उडी मारतो. हे देखील एक अपघाताचे कारण आहे. वाहन चालकांनी हे लक्षात ठेवा की […]











