गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

प्रेम प्रकरणाचा वाद विकोपाला, मुलीच्या कुटुबियांनी थेट मुलाला जिवंत जाळलं

प्रेम प्रकरणातून एका तरुणाला मारहाण करत जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या देवळा तालुक्यातील लोहोणेर गावात घडलीय. ब्रेकअपनंतर प्रियकर प्रियसीच्या लग्नाला अडथळे आणत असल्याच्या रागातून ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेतील सदर युवक 50 टक्के भाजला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. नाशिकच्या देवळा तालुक्यातील लोहोणेर गावात राहणाऱ्या गोरख काशिनाथ बच्छाव या […]

ताज्याघडामोडी

मास्क मुक्त महाराष्ट्राबाबत राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती

राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. अशातच जनतेतून मास्कमुक्त महाराष्ट्र होणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत महत्वाची माहिती दिली आहे. कोल्हापुरात बोलताना राजेश टोपे यांनी म्हटले की, पाश्चिमात्य देशांनी मास्कची सक्ती काढून टाकली आहे. हे का केले आहे याचा अभ्यास करण्याची गरज आहे. केंद्राच्या […]

ताज्याघडामोडी

कर्जबाजारी झाल्यानं नवरा-बायको दोघांनीही विष घेतलं!, उपचारादरम्यान नवरा दगावला, पण पत्नी वाचली

जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील पिंपळगाव येथील शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळला. शेवटी त्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात पतीचा उपचारदरम्यान एक महिन्याने मृत्यू झाला. तर पत्नीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. पतीचा मृत्यू झाल्याने परिवार उघड्यावर आलंय. त्यामुळं आर्थिक मदतीची मागणी केली जातं आहे. अर्चना राजेंद्र चरडे यांनी आणि यांचे पती राजेंद्र चरडे यांनी 9 जानेवारीला […]

ताज्याघडामोडी

उत्तम स्वास्थ्यासाठी सूर्यनमस्कार जीवनात आवश्यक – डाॅ. स्वानंद कुलकर्णी

माणसाच्या सर्व इंद्रियांना व्यायाम केल्याने सर्वञ रक्ताचा पुरवठा होतो. सूर्यनमस्कार केल्याने थोड्या वेळात पुरेसा शरीराला व्यायाम मिळतो. दैनंदिन जीवनात आरोग्य चांगले राहण्यासाठी सूर्यनमस्कार करणे आवश्यक आहे. सूर्यनमस्कार मुळे सर्वांगसुंदर व्यायाम होऊन आत्मिक, मानसिक व शारीरिक सामर्थ्य प्राप्त होते. स्वतःच्या उत्तम स्वास्थ्यासाठी सूर्यनमस्कार जीवनात आवश्यक असल्याचे मत पंढरपूर सिंहगड महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी “आझादी […]

ताज्याघडामोडी

पत्नी आणि सासरच्या जाचाला कंटाळून 24 वर्षीय जवानाची आत्महत्या, धक्कादायक घटना

पत्नी आणि सासरच्या जाचाला कंटाळून या जवानाने आपल्या आयुष्याचा शेवट केला असल्याचं वृत्त आहे. पुण्यात या जवानाने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोरख नानाभाऊ शेलार असे या जवानाचे नाव आहे. गोरख शेलार यांनी 6 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री गळफास घेत आत्महत्या केली आहे. गोरख हे सैन्य दलामध्ये […]

ताज्याघडामोडी

कर्नाटकातील शाळेत विद्यार्थिनींना हिजाब बंदी प्रकरण

शाळा, कॉलेजमध्ये केवळ शिक्षणावर लक्ष द्यायला हवे, इतर वादांवर नाही, अशा शब्दात राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी हिजाब वादावर प्रतिक्रिया दिली आहे. शाळांमध्ये गणवेश ठरलेला असतो. या गणवेशाच्या नियमांचे पालन व्हावे. शाळा या शैक्षणिक केंद्र आहे. त्या ठिकाणी शिक्षणावरच लक्ष दिले गेले पाहिजे. धार्मीक किंवा इतर कोणतेही राजकीय नेते शाळा महाविद्यालयांमध्ये येता कामा नयेत, अशी […]

ताज्याघडामोडी

वीजपुरवठा बंद,गोठ्यातील जनावरांसाठी पाणी आणण्यासाठी पतिपत्नी शेततळ्यावर गेले

वीज नव्हती म्हणून जनावरांसाठी पिण्याचे पाणी आणण्यासाठी शेततळ्यावर गेलेल्या तरुण जोडप्याचा तळ्यात बुडून मृत्यू झाला आहे. कोपरगाव तालुक्यातील आंचलगावमध्ये ही दुर्दैवी घटना घडली. पूजा निलेश शिंदे (वय २२) आणि नीलेश रावसाहेब शिंदे (वय २७) अशी त्यांची नावे आहेत. वर्षभरापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. यासंबंधी माहिती अशी, मंगळवारी सायंकाळी आचलगाव परिसरात वीज नव्हती. त्यामुळे पंप सुरू […]

ताज्याघडामोडी

मुकेश अंबानीनी एक दिवसात पुन्हा मिळविले आशियातील श्रीमंत स्थान

ब्लूमबर्ग बिलीनेअर इंडेक्स मध्ये ८ फेब्रुवारी रोजी रिलायंस उद्योगसमूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना मागे टाकून आशियातील सर्वाधिक श्रीमंत बनलेले अडानी ग्रुपचे गौतम अडानी यांना हे स्थान एका दिवसातच गमवावे लागले असून मुकेश अंबानी पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. मंगळवारी रिलायंसच्या शेअर मध्ये तेजी आली तर दुसरीकडे अडानी ग्रुपच्या सात लिस्टेड कंपन्यांचे शेअर […]

ताज्याघडामोडी

कर्मयोगी इंजीनियरिंग मध्ये ‘ISO 9001’ विषयावर कार्यशाळा संपन्न

श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचलित, कर्मयोगी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये वेबिनार शृंखला चे सातत्य कायम ठेवत महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागाने ‘आय एस ओ 9001’ या विषयावर वेबीनार आयोजित केला होता. या वेबिनारसाठी पुणे येथील लीड ऑडिटर मिस्टर उदय नायकवडी यांनी ‘आय एस ओ 9001’ या विषयावर व्याख्यान दिले. श्री नायकवडी सर यांना केएसबी पंप मध्ये दहा वर्ष व […]

ताज्याघडामोडी

वारकऱ्याला वाचविताना फॉर्च्युनर उलटून दाम्पत्य ठार, वारकऱ्यासह अन्य पाचजण गंभीर जखमी

नातेवाईकाच्या रक्षाविसर्जनासाठी जात असताना कवठेमहांकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडीनजीक पंढरीला पायी निघालेल्या एका वारकऱ्याला वाचविण्याचा प्रयत्न करताना भरधाव फॉर्च्युनर उलटून झालेल्या भीषण अपघातात कसबे डिग्रज (ता.मिरज) येथील दाम्पत्य ठार झाले, तर अन्य पाचजण गंभीर जखमी झाले. पृथ्वीराज दौलतराव चव्हाण (वय 55), प्रियांका पृथ्वीराज चव्हाण (वय 50) अशी मृत्यू झालेल्या दाम्पत्याची नावे आहेत. विलास महादेव माने (वय 50), […]