ताज्याघडामोडी

कर्मयोगी इंजीनियरिंग मध्ये ‘ISO 9001’ विषयावर कार्यशाळा संपन्न

श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचलित, कर्मयोगी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये वेबिनार शृंखला चे सातत्य कायम ठेवत महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागाने ‘आय एस ओ 9001’ या विषयावर वेबीनार आयोजित केला होता.

या वेबिनारसाठी पुणे येथील लीड ऑडिटर मिस्टर उदय नायकवडी यांनी ‘आय एस ओ 9001’ या विषयावर व्याख्यान दिले. श्री नायकवडी सर यांना केएसबी पंप मध्ये दहा वर्ष व ग्लोरिया इंजिनिअरिंग कंपनी मध्ये पंधरा वर्ष असा प्रदीर्घ अनुभवाचा फायदा कर्मयोगीच्या विद्यार्थी व प्राध्यापकांना झाला. वेबीनार चे उद्घाटन कॉलेजचे प्राचार्य डॉ एस पी पाटील सर यांनी केले .

वेबिनार सीरिजमध्ये सातत्य ठेवून कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये वारंवार उपक्रम आयोजित केले जातात आणि व भविष्यातही अशा कार्यशाळा चे आयोजन करण्यास येईल असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस पी पाटील यांनी सांगितले. पाहुण्यांची ओळख प्रा उदय कार्वेकर तसेच कॉलेजची व वेबिनारची माहिती व प्रास्ताविक मेकॅनिकल विभागाचे विभाग प्रमुख प्रा. आर जे पांचाळ यांनी केले.

श्री उदय नायकवडी यांनी ‘आय एस ओ 9001’ ची का आवश्यकता आहे तसेच ते कोण कोणत्या क्षेत्रांमध्ये वापरले जाते याची माहिती सांगितली. त्यामध्ये एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट सिस्टीम, हेल्थ अँड सेफ्टी मॅनेजमेंट ,इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह टास्क फोर्स क्षेत्रात कोणते स्टॅंडर्ड वापरले जाते हेही सांगितले. ‘आयएसओ 9001 ‘चे विविध प्रिंसिपल याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली. वेबिनार चे आयोजन ऑनलाइन पद्धतीने केले होते त्यासाठी आयटी विभागाचे विभाग प्रमुख प्रा. दीपक भोसले यांनी तंत्रज्ञ म्हणून योगदान दिले.

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे नायकवडी सर यांनी समाधानकारक पणे देऊन विद्यार्थ्यांचे समाधान केले.श्री.पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन श्री रोहन परिचारक यांनी कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या. सदर कार्यशाळेस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस पी पाटील, रजिस्टार श्री गणेश वाळके, उपप्राचार्य जगदीश मुडेगावकर, संशोधन अधिष्ठाता डॉक्टर अभय उत्पात सर्व विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. व्ही एल जगताप यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यशाळेची सांगता केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *