राज्य सरकारने नववर्षाच्या सुरुवातीला आपल्या कर्मचा-यांना एक मोठे गिफ्ट दिले आहे. राज्य सरकारने सरकारी कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ केली आहे. राज्य सरकारने ही मोठी घोषणा नववर्षाचा पहिला सण मकर संक्रांतीच्या निमित्ताने केली आहे. या गोड बातमीने वर्षाची सुरुवात झाल्याने यंदाचे वर्ष सरकारी कर्मचा-यांसाठी आनंद घेऊन आल्याचे या निमित्ताने दिसत आहे. महाभाई भत्त्यात राज्य सरकारने […]
ताज्याघडामोडी
कोविड लसीकरणासाठी प्रशासन सज्ज-प्रांताधिकारी-सचिन ढोले
पहिल्या टप्प्यातील लसीकरण दिनांक 16 जानेवारी 2021 रोजी उपजिल्हा रुग्णालय येथील संसर्गजन्य रुग्णालय येथे करण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनाने व आरोग्य विभागाने जय्यत तयारी केली असून, कोविड लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली. पहिल्या टप्प्यात 1610 डोज उपलब्ध झाले असून, तालुक्यातील डॉक्टर्स व आरोग्य सेवा देणाऱ्या संबंधित […]
मोठी बातमी । राज्यात 5 ते 8 वीच्या शाळा या तारखेपासून सुरु होणार
मुंबई : कोरोनाच्या (Covid-19) प्रादुर्भावामुळे गेल्या दहामहिन्यांपासून बंद आहेत. या शाळांबाबत (School) महत्वाची बातमी. राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा (School) या 27 जानेवारीपासून सुरु होणार आहेत. दरम्यान, मुंबई एमएमआरडी विभागातील शाळा या बंद राहणार आहेत. या शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत 27 जानेवारीपासून सुरू होतील अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज मुख्यमंत्री उद्धव […]
आजपासून मोबाईल नंबरवर कॉल करण्याच्या नियमात होतोय मोठा बदल
देशात कोणत्याही लँडलाइन फोनवरुन मोबाईल नंबरवर फोन करण्याच्या नियमात महत्त्वाचा बदल होत आहे. ‘ट्राय’च्या (Telecom Regulatory Authority of India – TRAI) आदेशानुसार लँडलाइनवरुन मोबाईलवर कॉल करण्यासाठी मोबाईल नंबरआधी शून्य (0) डायल करावा लागेल. ‘ट्राय’चा हा नवा आदेश आजपासून लागू होत आहे. ट्रायने 29 मे 2020 रोजी याबाबत दूरसंचार विभागाला शिफारस केली होती. त्यानंतर गेल्या वर्षी […]
सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांना गिरणा गौरव पुरस्कार जाहीर
नाशिक येथील गिरणा गौरव प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणारा अत्यंत मानाचा गिरणा पुरस्कार सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना आज जाहीर झाला आहे. नाशिक येथील गिरणा गौरव प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणाऱ्या पुरस्काराची घोषणा दरवर्षी १४ जानेवारी रोजी जाहीर केली जाते व ५ एप्रिल ला पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केले जातात.या कार्यक्रमाचे २३ वे वर्ष […]
आता फेब्रुवारीपासून बुकिंग केल्यानंतर फक्त 30 मिनिटात गॅस सिलेंडर तुमच्या दारात!
नवी दिल्ली – सर्व साधारणपणे आपण गॅस सिलेंडर बुक केल्यानंतर त्याची आपल्याला दोन ते तीन दिवसांनंतर डिलिव्हरी होते. कधी कधी तर बुकिंग केल्यानंतर आठवडाभर सिलेंडर येत नाही. त्यातच ज्यांच्याकडे फक्त एकच सिलेंडर आहे त्यांचे तर जास्तच हाल होतात. यामुळे आपली चीडचीड होते आणि मनस्तापही सहन करावा लागतो, पण ही वेळ आता ग्राहकांवर येणार नाही. कारण […]
ग्रामपंचायत निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज तहसिलदार – विवेक सांळुखे
पंढरपूर, दि. 14:- राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये माहे एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. पंढरपूर तालुक्यातील 71 ग्रामपंचायतीसाठी 331 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीसाठी दि.15 जानेवारीला सार्वत्रिक मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी 1 हजार 736 अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, निवडणुक अधिकारी, कर्मचारी संबंधित मतदान […]
ना.धनंजय मुंडे राजीनामा देण्याच्या तयारीत ?
मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे राजीनामा देण्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी देखील मुंडे यांच्यावरील आरोर हे गंभीर स्वरुपाचे असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे राजीनामा देण्याची शक्यता वाढली आहे. सर्व सदस्यांची मते जाणून घेतल्यानंतर याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊ. पक्ष आणि पक्षप्रमुख म्हणून निर्णय घेणार. कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. असं शरद […]
अखेर जिल्ह्यातील भाजपचा तो बडा नेता निलंबित
सोलपूर : उपायुक्तांना शिवीगाळ आणि खंडणी मागितल्याप्रकरणी सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना गेल्या आठवड्यात अटक करण्यात आलेली. त्यानंतर राजेश काळे यांची आज (13 जानेवारी) भाजपातून हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजपचे शहर सरचिटणीस शशी थोरात यांनी याबाबत घोषणा केली. राजेश काळे यांच्यावर महापालिका उपायुक्त धनराज पांडे यांना र्वाच्य भाषेत शिवीगाळ करून खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात […]
कोरोनाबाधितांना ग्रामपंचायतीसाठी करता येणार मतदान
मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आता कोरोनाबाधिताला आता मतदान करता येणार आहे. निवडणूक आयोगाने ही परवानगी दिली आहे. कोविड बाधित मतदारांना मतदान समाप्तीच्या अर्धा तास आधी मतदानाची सुविधा दिली आहे. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी ही माहिती दिली. बाधित आणि विलगीकरण कक्षातल्या व्यक्ती, तसेच दोनदा तपासणीनंतरही शरीराचे तापमान विहित निकषांपेक्षा जास्त असलेल्या मतदारांना मतदानाची […]