ताज्याघडामोडी

ईडीने राजमल लखीचंद ज्वेलर्सवर छापा टाकला, पण १३०० किलोपैकी फक्त ४० किलोच सोनं हाती लागलं

जळगावातील राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीच्या पथकाकडून छापेमारी करण्यात आली होती. या कारवाईदरम्यान ईडीने तब्बल १ कोटी रुपयांची रोकड आणि ३९ किलोंची सोने आणि हिऱ्यांचे दागिने जप्त केले होते. या दागिन्यांची किंमत तब्बल २५ कोटी रुपयांच्या घरात आहे. राजमल लखीचंद ज्वेलर्सचे मालक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्यावरील ईडी कारवाईपाठी राजकीय दबाव असल्याची चर्चा […]

ताज्याघडामोडी

काँग्रेसच्या वर्किंग कमिटीतून बाळासाहेब थोरातांना वगळलं; ‘या’ कारणामुळे पक्षाकडून पत्ता कट?

काँग्रेसच्या नव्या वर्किंग कमिटीची नुकतीच घोषणा करण्यात आली असून या कमिटीमध्ये महाराष्ट्रातील आठ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र पूर्वीच्या समितीत असलेले ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना आता वगळण्यात आलं आहे. तसंच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाचा समावेश नव्या वर्किंग कमिटीत नसल्याचं दिसत आहे. मागील विधानसभा निवडणुकीच्यावेळी काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी प्रचारासाठी थेट […]

ताज्याघडामोडी

धक्कादायक! कॉफी शॉपमध्ये सुरू होते गैरकृत्य; पोलिसांना मिळाली गुप्त माहिती, टाकली धाड अन्…

नवीन जालना भागातील आझाद मैदान येथे थिंकिंग कॅफे छोटेखानी दुकानात कॉपी सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवले जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना खबऱ्याने दिली होती. आझाद मैदान संकुलनातील थिंकिंग कॅफे या कॉफी शॉपमध्ये महाविद्यालयीन मुला-मुलीकडून कॉफी शॉपच्या नावाखाली ५०० रुपयाच्या मोबदल्यात छोट्या खोल्या उपलब्ध करून दिल्या जातात. त्या जागेमध्ये मुला मुलींना हॉटेलच्या बेडरुमसारखा वापर करू दिला […]

ताज्याघडामोडी

राज्यात आजही मुसळधार पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. राज्याच्या जवळपास सर्व भागांमध्ये पावसाने दडी मारली आहे. परंतु राज्यात पुन्हा पावसाचे आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. मात्र आता पुन्हा एकदा पावसाने राज्यात हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. काल (शनिवारी) मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला होता. […]

ताज्याघडामोडी

स्वेरीची शैक्षणिक वाटचाल अभिमानास्पद -आमदार राम सातपुते

स्वेरीच्या रौप्य महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ थाटात संपन्न पंढरपूर- ‘ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण मिळावे या उदात्त हेतूने अत्यंत हालअपेष्टा सहन करत आणि स्वतःला चंदनाप्रमाणे झिजवून अनेक अडचणींतून मार्ग काढत डॉ. बी.पी. रोंगे सरांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांसाठी  तंत्रशिक्षणाचे द्वार खुले केले. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल करिअरच्या दृष्टीने संस्थेच्या स्थापनेपासूनच अनेक नवनवीन उपक्रम राबवले जात आहेत. त्यामुळे स्वेरीला विविध […]

ताज्याघडामोडी

पंढरपुरातील अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या अनेक रस्त्यांचे भाग्य उजळणार 

आमदार आवताडेंचा पाठपुरावा,वैशिष्ट्यपूर्ण योजना अंतर्गत न.पालिकेस ५ कोटी मंजूर महाराष्ट्र राज्य सरकार अन्वये मूलभूत तथा वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत विशेष अनुदान म्हणून पंढरपूर व मंगळवेढा नगरपरिषदांसाठी विविध विकास कामांना १०कोटी निधी मंजूर झाला असल्याची माहिती पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे दिली आहे. मंजूर झालेल्या या निधीमध्ये मंगळवेढा नगरपरिषदसाठी ५ कोटी व पंढरपूर […]

ताज्याघडामोडी

बैल विहिरीत पडला, वाचवण्यासाठी ९ जण विहिरीत; तितक्यात आक्रित घडलं, ६ जणांचा करुण अंत

बैलाला वाचवण्याच्या प्रयत्नात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. झारखंडची राजधानी रांचीपासून ७० किलोमीटर अंतरावर असलेल्या सिल्ली मुरी ओपी परिसरातील पिस्का गावात ही घटना घडली. मृत्यूमुखी पडलेले सगळे जण एकाच गावातील आहेत. एकाचवेळी सहा जणांचा मृत्यू झाल्यानं गावावर शोककळा पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून गावात पाऊस सुरू होता. त्यामुळे विहिरीजवळील माती ओलसर झाली होती. मातीवरुन घसरुन […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

हॉटेलमध्ये तरुणीशी मैत्री, पण नंतर अभिषेकसोबत भयंकर घटना; तरुणीच्या घरी नेमकं काय घडलं?

बेपत्ता तरुणाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची घटना समोर आली आहे. मात्र, या प्रकरणी तरुणाच्या नातेवाईकांनी प्रेयसीच्या नातेवाईकांवर खुनाचा आरोप केला आहे. सीताबर्डी पोलिसांनी बेवारस सापडलेल्या तरुणाचा मृतदेहही पुरला. पोलिसांच्या या भूमिकेने तरुणाच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. २४ वर्षीय अभिषेक सुरेश मिश्रा असे मृताचे नाव आहे. अभिषेक हा मूळचा उत्तर प्रदेशातील एटा येथील रहिवासी होता. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

तुझ्या बायकोला ‘त्यांनी’ संपवलं, घाईघाईत अंत्यविधीही केले! मित्राच्या फोननंतर पती हादरला

पती त्याच्या बहिणीकडे गेला असल्यानं पत्नी घरी एकटी होती. त्यावेळी तिचे आई, वडील आणि भाऊ घरी आले. आईनं तिचे हात धरले. भावानं पाय पकडले आणि वडिलांनी तिचा गळा आवळला. यानंतर तरुणीचा मृतदेह कारमध्ये ठेवून त्यांनी गाव गाठलं. तिथे जंगलात अंत्यविधी केले. पतीला याबद्दल कोणतीच माहिती नव्हती. गावातील एका मित्रानं त्याला फोन करुन घटनाक्रम सांगितला. तुझ्या […]

ताज्याघडामोडी

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस प्रशासकीय मंजूरी व निधी मंजूर करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात- आ.समाधान आवताडे यांची माहिती

प्रतिनिधी – पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील जनतेच्या दृष्टिकोनातून अतिशय संवेदनशील आणि जिव्हाळापूरक असणाऱ्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस प्रशासकीय मंजूरी देऊन स्वतंत्र निधी उपलब्ध करुन देणेकामी शासन दरबारी असणारी कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे. या मंजूऱ्यांच्या संदर्भात येत्या ५ सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र जी फडणवीस साहेब […]