मुंबई – १ मेपासून महाराष्ट्रासह देशभरात १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. त्यानुसार काही राज्यांनी लसींच्या उपलब्धतेनुसार हे लसीकरण सुरू केले. काही मोजक्या केंद्रांवर महाराष्ट्रात देखील त्याची सुरुवात करण्यात आली. पण, लसींचा तुटवडा आणि त्यातून लसीकरण केंद्रांवर होणारा गोंधळ लक्षात घेता, आता १८ ते ४४ या वयोगटासाठी राज्य सरकार […]
ताज्याघडामोडी
लॉकडाऊनमध्ये पालक घरात तर मुलं बाहेर; खेळता खेळता कारमध्ये श्वास गुदमरल्याने 4 चिमुरड्यांचा मृत्यू
लखनऊ, 7 मे : उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये शुक्रवारी धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे चांदीनगर भागात सिगौली तगा गावात एका कारमध्ये श्नास गुदमरून 4 मुलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून एकाची प्रकृती गंभीर आहे.या सर्व मुलांचे वय 4 ते 8 वर्षे इतकी होती. मृत झालेल्यांंमध्ये 4 वर्षांची वंदना, अक्षय, 7 वर्षांचा कृष्णा आणि 8 वर्षांच्या […]
मराठा आरक्षण : गरज पडल्यास एकदिवसीय अधिवेशन बोलावणार – अजित पवार
पुणे – सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने बुधवारी मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा महाराष्ट्र सरकारचा ‘सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग कायदा २०१८’ रद्दबातल ठरवला. मराठा समाजाला ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून आरक्षण देण्याच्या निर्णयाचे समर्थन करणारी कोणतीही असामान्य परिस्थिती दिसत नसल्यामुळे हे आरक्षण घटनाबाह्य असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात सर्वोच्च न्यायालयाचा […]
मोठी बातमी…! भारतात स्पुटनिक लाईट लसीच्या वापराला मंजुरी
देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार उडाला आहे. भविष्यातील हानी टाळायची असेल तर जलद लसीकरण हा एकच पर्याय सध्या आपल्यासमोर आहे. या संदर्भात आता एक सकारात्मक बातमी आली आहे. भारतात स्पुटनिक लाईट लसीच्या वापराला मंजुरी मिळाली आहे. वेगाने लसीकरण करण्यासाठी स्पुटनिक लाईट ही भारतासाठी संजीवनी ठरणार आहे. आता केंद्र सरकारनं या लसीला वापरासाठी मान्यता दिली […]
तुटवड्यादरम्यान कॅनॉलमध्ये आढळले हजारो Remdesivir इंजेक्शन
चंदीगढ 07 मे : देशात सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ नोंदवली जात आहे. या परिस्थितीमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी प्रचंड वाढली असून त्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. अशात आता समोर आलेल्या एका घटनेनं सर्वांनाच विचारात पाडलं आहे. कारण, प्रचंड मागणी असणारे रेमडेसिवीर इंजेक्शन कॅनॉलमध्ये आढळून आले आहेत. यात रेमडेसिवीर आणि चेस्ट इन्फेक्शनच्या इंजेक्शनचा समावेश आहे. […]
गर्दी का केली? असा सवाल विचारणाऱ्या पोलिसांनाच मारहाण
सध्या राज्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. काही जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोरोना संकटाच्या काळात डॉक्टर, प्रशासन, पोलीस आपले कर्तव्य उत्तम प्रकारे पार पाडत आहेत. लोकांच्या संरक्षणासाठी आणि सरकारने लागू केलेल्या नियमांचे पालन व्हावे म्हणून पोलीस दिवस रात्र एक करून त्यांची ड्युटी निभावत आहे. मात्र काही ठिकाणी अशा घटना घडत आहे तिकडे […]
धक्कादायक! मृतदेहांची अदलाबदल, चूक लक्षात आल्यानंतर पुरलेला मृतदेह काढला बाहेर
लातूर, 07 मे: वैद्यकीय महाविद्यालयातील गलथान कारभार लातुरमध्ये समोर आला आहे. मृतदेहांची अदलाबदल झाल्यानंतर शेळगाव (ता.चाकूर) येथे अंत्यविधी करण्यात आलेला मृतदेह जमिनीतून उकरून काढण्यात आला आणि त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चाकूर तालुक्यातील शेळगाव येथील धोंडीराम तोंडारे (वय 65) यांना मागील आठवड्यात कोरोना झाल्यामुळे त्यांच्यावर उदगीर येथे उपचार करून लातूर येथील […]
कोरोना पॉझिटिव्ह माजी ग्रामपंचायत सदस्याची जंगी वाढदिवस पार्टी; रक्तदान शिबीराचंदेखील आयोजन
कोरोना पॉझिटिव्ह असताना रक्तदान शिबीर घेऊन जंगी वाढदिवस साजरा करणाऱ्या विजयनगर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य राकेश श्रीपाल कुरणे याच्यावर मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत म्हैसाळ तलाठी सुधाकर कृष्णा कुणके यांनी फिर्यादी दिली आहे.राकेश कुरणे हा काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्याला आशा वर्कर आणि आरोग्य सेवकांनी घरी क्वारंटाईन होण्याच्या […]
पुढील पाच दिवसात १८ ते ४४ वयोगटासाठी फक्त कासेगाव आरोग्य केंद्रावर होणार लसीकरण
राज्य शासनाने महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने राज्यात १८ ते ४४ वयोगटातील नागिरकांसाठी लसीकरण मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला खरा पण केंद्र सरकारकडून व लस उत्पादक कंपनीकडून होणारा लसीचा अपुरा पुरवठा आणि दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असलेले ४५ वयोगटावरील जेष्ठ नागिरक यामुळे राज्य सरकार देखील अडचणीत आले आहे.१८ ते ४४ वयोगटासाठी कोवीन ऍप द्वारे नोंदणी करण्यास २८ एप्रिल […]
देशातील पहिलीच घटना : खून करणा-या अल्पवयीन आरोपीस बारा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
सांगली | मिरज तालुक्यातल्या तुंग येथे झालेल्या अल्पवयीन मुलीच्या बलात्कार आणि खून प्रकरणी नराधम अल्पवयीन 17 वर्षीय मुलास न्यायालयाने दोषी धरून भारतीय दंड संहिता कलम ३०२, ३६३, ३७६, ३७६ (अ), ३७६ (अ,ब), ३७७ (अ) तसेच पोक्सो कायदयांतर्गत कलम ४ व ६ खाली दोषी धरून प्रत्येक कलमांसाठी वेगवेगळी बारा वर्षे व प्रत्येक कलमान्वये १ हजार रुपये दंड […]











