ताज्याघडामोडी

सुसाइड नोटमध्ये भाजप नेत्यांची नावे लिहून एकाची आत्महत्या, दोघांवर FIR

सुसाइड नोटमध्ये भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांची नावे लिहून एकाने आत्महत्या केली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे आणि कामगार आघाडीचे पदाधिकारी विक्रम नागरे असे गुन्हा दाखल झालेल्या दोन पदाधिकाऱ्यांची नावे आहेत. या घटनेमुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एका गुन्ह्यात संशयित असलेल्या आरोपीने घोटी येथील भरवीरमध्ये आत्महत्या केली आहे. […]

Uncategorized ताज्याघडामोडी

नवनीत युवा मास्टर स्ट्रोक चित्रकला स्पर्धेत’ कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

येथील कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेच्या इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी नवनीत युवा मास्टर स्ट्रोक चित्रकला स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. त्याचा निकाल आज प्राप्त झाला असून ए ग्रुप मध्ये इयत्ता तिसरी 1)तक्ष तुकाराम राऊत 2)संध्या महादेव भोसले 3)अद्वय अमोल काळे  ग्रुप बी 1)विराट हनुमंत चव्हाण 2)यशश्री संतोष सलगर 3)भारती लहू शिंदे  इयत्ता पाचवी व सहावी.  तसेच ग्रुप सी मध्ये इयत्ता सातवीचे 1)मनोज संतोष घोडके […]

ताज्याघडामोडी

अंत्यसंस्कार झालेलाच निघाला आरोपी, प्रेयसीसाठी ‘जीवघेणा’ खेळ, ‘दहाव्या’नंतर पुण्यात अटक

पुण्यात गुन्हेगारीने मोठ्या प्रमाणावर डोके वर काढले असताना आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आळंदी परिसरात असणाऱ्या चऱ्होली भागात एका ६५ वर्षीय व्यक्तीने ४८ वर्षीय व्यक्तीचा खून केला. मृताचे डोके धडापासून वेगळे करून त्याला स्वतःचे कपडे घालून घटनास्थळावरून तो पसार झाला. हा आरोपी फरार होण्याच्या प्रयत्नात असताना दशक्रिया विधीनंतर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. […]

ताज्याघडामोडी

आधी उशीने तोंड दाबलं अन् शाहबादने कुसूमच्या शरीराची केली चाळण; आणखी एक भयाण घटना

छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात लव्ह ट्रँगलमधून हत्येची घटना समोर आली आहे. शनिवारी कोरबा येथील पंप हाऊस कॉलनीत स्क्रू ड्रायव्हरने वार करुन तरुणीची हत्या करण्यात आली. याप्रकरणी आता धक्कादायक खुलासा झाला आहे. शॉर्ट पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, तरुणीच्या मानेवर, छातीवर आणि शरीराच्या इतर भागात स्क्रू ड्रायव्हरसारख्या धारदार वस्तूने 26 वार करण्यात आले होते. तिचा प्रियकर शाहबाद खान याने तिची […]

ताज्याघडामोडी

रिसॉर्टमधील स्विमिंग पुलात बुडून नऊ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

चिल्हार बोईसर रस्त्यावरील गुंदले गावच्या हद्दीतील मामाचा गाव रिसॉर्ट मधील तरण तलावात बुडून नऊ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. बेशुद्धावस्थेत त्याला नागझरी नाक्यावरील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते, परंतु उपचाराआधीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. नाताळ सुट्या आणि नववर्ष साजरे करण्यासाठी मयत मुलाचे कुटुंबीय रिसॉर्ट मध्ये आले होते. सोमवारी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास घटना […]

ताज्याघडामोडी

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणाऱ्या महिलेचा मृत्यू; प्राचार्यांनी धमकावल्याचा होता आरोप

जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणाऱ्या एका महिलेचा मृत्यू झाला आहे. कस्तुरबा बळवंत गायकवाड असे या महिलेचं नाव असून त्या मागच्या चाळीस दिवसांपासून आमरण उपोषणाला बसल्या होत्या. औरंगाबाद रोडवरील सर्वे नंबर 49/38 या जमिनीचा वाद न्यायालयात सुरु आहे. त्याचबरोबर या जागेवर आयटीआय काॅलेजचे प्राचार्य यांना जाण्यास कोर्टानं सक्त मनाई केली होती.  मात्र, त्यानंतर आयटीआय काॅलेचचे प्राचार्य […]

ताज्याघडामोडी

घशात जेली चॉकलेट अडकल्याने दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

लहान मुलांचे चॉकलेट हे अतिशय प्रिय खाद्य. चॉकलेट मिळाले की, त्यांच्या आनंदाला पारावार उरत नाही. मात्र हेच चॉकलेट खाणे कुणाच्या मृत्यूचे कारण ठरु शकेल असा विचारही कुणीच कधी केला नसेल. आज अशीच एक घटना घडली आहे. घशात जेली चॉकलेट अडकल्याने दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना साताऱ्यातून समोर आली आहे. शर्वरी सुधीर जाधव (रा. […]

ताज्याघडामोडी

मंत्री दादा भुसेंनी पोलिसांसमोर युवकाला फटकावलं’, जितेंद्र आव्हाड यांच्याकडून VIDEO ट्विट

आमदार मंत्र्यांच्या वादग्रस्त वर्तनावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी खुद्द देवेंद्र फडणवीस यांना सुनावल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंत्री दादा भुसे पोलिसांसमोरच एका युवकाला मारहाण करत असल्याचा व्हिडीओ ट्विट केला आहे. माझा नग्न फोटो फेसबुकवर टाकणाऱ्याला आपण मांडीवर बसवलंत. माझी सीबीआय चौकशी लागावी, म्हणून सुप्रीम कोर्टात वकीलांची फौज उभी केली. माझ्यावर आरोप करणाऱ्या […]

ताज्याघडामोडी

पप्पा-मम्मी मला माफ करा, काँग्रेस आमदाराच्या बंगल्यावर विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं; कारण…

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील काँग्रेस आमदार ओंकार मरकाम यांच्या बंगल्यावर एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा विद्यार्थी कॅन्सरने त्रस्त असून त्याच्यावर अभ्यासासोबतच आमदार निवासात उपचार सुरू होते. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. मृतदेहाजवळून पोलिसांना सुसाइड नोट सापडली आहे. यामध्ये वडिलांना उद्देशून विद्यार्थ्याने लिहिले आहे […]

ताज्याघडामोडी

लेकीचं लग्न पाहायचंय, आयसीयूत झालं शुभमंगल सावधान, अन् काहीच तासात…

बिहारच्या गयामध्ये एका खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या महिलेने आयसीयुतच आपल्या मुलीचे लग्न लावून दिले. दुर्दैव म्हणजे या लग्नाच्या काही तासांनंतर त्या महिलेचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबीय, नातेवाईक तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचेही डोळे पाणावले. नेमकं प्रकरण काय? गया जिल्ह्यातील गुरुरु ब्लॉकमधील बाली गावातील रहिवासी लालन कुमार यांची पत्नी पूनम कुमारी वर्मा यांना हृदयविकाराचा त्रास होता. आशा […]