ताज्याघडामोडी

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणाऱ्या महिलेचा मृत्यू; प्राचार्यांनी धमकावल्याचा होता आरोप

जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणाऱ्या एका महिलेचा मृत्यू झाला आहे. कस्तुरबा बळवंत गायकवाड असे या महिलेचं नाव असून त्या मागच्या चाळीस दिवसांपासून आमरण उपोषणाला बसल्या होत्या. औरंगाबाद रोडवरील सर्वे नंबर 49/38 या जमिनीचा वाद न्यायालयात सुरु आहे. त्याचबरोबर या जागेवर आयटीआय काॅलेजचे प्राचार्य यांना जाण्यास कोर्टानं सक्त मनाई केली होती. 

मात्र, त्यानंतर आयटीआय काॅलेचचे प्राचार्य दोन शिक्षकासह तिथे आले होते. त्यांनी गायकवाड यांच्या सुनेसह नातीस छेडछाड करून शिविगाळ केली होती. त्यामुळं त्यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी कस्तुरबा बळवंत गायकवाड या मागच्या चाळीस दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर गर्दी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *