३० वर्षीष उच्चशिक्षित गर्भवती विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद शहरात गारखेडा परिसरात घडली आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापिकेची नोकरी करणाऱ्या महिलेने गळफास घेत आपल्या आयुष्याची अखेर केली. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली. वर्षा दीपक नागलोत (वय ३० वर्ष, रा. प्लॉट नं ७८-७८, गजानन कॉलनी, कन्या शाळेच्या बाजूला, गारखेडा परीसर) असे मयत […]
ताज्याघडामोडी
नाना पटोलेंनी १० तास माझ्या माणसाला बसवून ठेवलं आणि चुकीचे एबी फॉर्म पाठवले: सत्यजीत तांबे
बाळासाहेब थोरात यांना अडचणीत आणण्यासाठी आणि तांबे घराण्याला काँग्रेस पक्षाच्या बाहेर काढण्यासाठी प्रदेश काँग्रेसमधील काही नेत्यांनी षडयंत्र रचून मला नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळून दिली नाही, असा आरोप सत्यजीत तांबे यांनी केला. या सगळ्या कारस्थानाची स्क्रिप्ट अगोदरच लिहण्यात आली होती. पदवीधर निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी एबी फॉर्म हवा होता, म्हणून मी नागपूरला नाना पटोले […]
10 हजार कमावणाऱ्या सुरक्षा रक्षकाला आयकर विभागाने पाठवली 1 कोटींची नोटीस
आयकर भरणाऱ्या व्यक्तीला त्याच्या उत्पन्नानुसार आयकर भरावा लागतो. मात्र, कल्याणमधून एक विचित्र बातमी समोर आली आहे.येथे, हाऊस किपिंग आणि सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीला आयकर विभागाने चक्क 1 कोटी 14 लाख रुपयांचा आयकर भरण्याची नोटीस पाठवली आहे.चंद्रकांत वरक (56 वय) असे त्यांचे नाव आहे. कल्याणमधील ठाणकरपाडा भागातील जैन चाळीत ५६ वर्षीय चंद्रकांत वरक […]
भाऊ विहिरीत पडला म्हणून वाचवायला गेला पण, एकाच दिवशी कुटुंबावर दोन पोरांच्या अंत्यविधीची वेळ
विहिरीत पाणी काढण्यासाठी उतरलेला भावाला बुडताना पाहून काठावर असलेल्या भावाने मदतीसाठी हात दिला अन् दोघांचाही घात झाला. या दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना देवणी तालुक्यातील हंचनाळ शिवारात घडली. नरसिंग युवराज चव्हाण (वय २०) आणि संगमेश्वर संजय चव्हाण (वय २२) अशी मृत तरुणांची नावे आहेत. हंचनाळ शिवारातील रसिका महाविद्यालयाच्या पाठीमागील रमेश बिरादार यांचं शेत […]
EPFO गुंतवणूकदारांसाठी गुड न्यूज! नोकरदारांना अडचणीच्या काळात मिळणार दिलासा
नोकरदारांच्या पगाराचा काही भाग पीएफ फंडामध्ये बचत म्हणून जमा केला जातो. फंडातील जमा रकमेवर सरकारकडून ठराविक व्याज दिले जाते, ज्याचा फायदा कर्मचारी वर्गाला सेवानिवृत्तीनंतर होतो. नवीन आर्थिक वर्षासाठी देखील सरकारने पीएफमध्ये जमा केलेल्या रकमेवर व्याज निश्चित केलं आहे. मात्र, बँक खात्याप्रमाणे तुम्ही पीएफ खात्यातून पैसे काढू शकत नाही. मात्र, EPFO काही अटींसह पीएफ खात्यातून पैसे […]
तुमचे आमदार फुटणार, उद्धव ठाकरेंना आधीच कल्पना दिली; अजित पवारांचा गौप्यस्फोट
आमदार फुटणार दोन ते तीन वेळा कानावर आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगितले होते. शरद पवार, जयंत पाटील यांनीही ही माहिती त्यांना दिली होती. मात्र, आपले सहकारी इतकी टोकाची भूमिका घेतील, असे त्यांना वाटले नव्हते,’ अशी माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे. पुण्यात एका कार्यक्रमानंतर पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ठाकरे […]
अजित पवारांनी सत्यजीत तांबेंना दिला सल्ला; म्हणाले, “मला वाटतं त्यानं.”
गेल्या महिन्याभरापासून काँग्रेसमध्ये नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सुरु असलेल्या वादावर पडदा पडला आहे. काँग्रेसने सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली होती. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. दुसरीकडे महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र दुप्पट मते मिळवत सत्यजीत ताबे यांनी शुभांगी पाटील यांचा पराभव […]
सैन्य भरतीच्या अमिषाने फसवणूक; तरूणाने स्टेटस ठेवून केली आत्महत्या, चुलत भावावर गुन्हा दाखल
सातारा : जिल्ह्यातील कराड तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. सैन्य दलात भरती करण्याच्या अमिषाने फसवणूक केल्याचा वॉटस्अप स्टेटस ठेऊन तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कराड तालुक्यातील कोळे गावात घडली असून दयानंद बाबुराव काळे, असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सैन्य दलात जवान असलेला त्याचा […]
मराठा उमेदवारांना पुन्हा झटका; EWS मध्ये आरक्षण देण्याचा निर्णय बेकायदा
सरकारी नोकर भरतीची वाट पाहणाऱ्या मराठा उमेदवारांना झटका देणारा निर्णय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण अर्थात ने दिला आहे. राज्य सरकारने मराठा उमेदवारांना ईडब्लूएसमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय बेकायदा असल्याचे मॅटने म्हटले आहे. यामुळे सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी पुन्हा वाढणार आहेत. मराठा उमेदवारांना ईडब्लूएसमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. काही खात्यांमधील सरकारी […]
मी पूर्ण जबाबदारीने सांगतेय… अदानी प्रकरणावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची पहिली प्रतिक्रिया
अदानी समूहाबाबतच्या कथित गैरव्यवहारांबाबतचा अहवाल अमेरिकास्थित हिंडेनबर्ग संस्थेने प्रसिद्ध केल्याने गेल्या काही दिवसांपासून एकच खळबळ उडाली आहे. Hindenburg Research नं अदानी उद्योग समूहावर बाजारातील व्यवहारांमध्ये गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवला आहे. हिंडेनबर्गचा अहवाल आल्यापासून अदानी उद्योग समूहाला एकूण 120 अब्ज डॉलर्सचा फटका बसला आहे. याचे पडसाद देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशतानही उमटले आहेत. संसदेत अदानी प्रकरणावरून मोठा गदारोळ […]











