ताज्याघडामोडी

EPFO गुंतवणूकदारांसाठी गुड न्यूज! नोकरदारांना अडचणीच्या काळात मिळणार दिलासा

नोकरदारांच्या पगाराचा काही भाग पीएफ फंडामध्ये बचत म्हणून जमा केला जातो. फंडातील जमा रकमेवर सरकारकडून ठराविक व्याज दिले जाते, ज्याचा फायदा कर्मचारी वर्गाला सेवानिवृत्तीनंतर होतो. नवीन आर्थिक वर्षासाठी देखील सरकारने पीएफमध्ये जमा केलेल्या रकमेवर व्याज निश्चित केलं आहे. मात्र, बँक खात्याप्रमाणे तुम्ही पीएफ खात्यातून पैसे काढू शकत नाही. मात्र, EPFO काही अटींसह पीएफ खात्यातून पैसे काढण्याची संधी देते. विशेष म्हणजे अवघ्या ७२ तासात घरबसल्या पैसे तुमच्या खात्यातून काढू शकतात.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफओ) आपल्या कर्मचार्‍यांना एक मोठी सुविधा देते, ज्या अंतर्गत ते नोकरीत असतानाही आपल्या पीएफ खात्यातून पैसे काढू शकतात. याला आगाऊ (ॲडव्हान्स) पीएफ काढणे म्हणतात. त्याची पद्धत अगदी सोपी आहे. हे काम तुम्ही घरी बसून करू शकता, त्यासाठी तुम्हाला ईपीएफओ सदस्य पोर्टलवर जावे लागेल.

ईपीएफओने कोविड काळात नोकरदारांना पीएफ खात्यातून ॲडव्हान्स पैसे काढण्याची सुविधा दिली होती. यामध्ये ७२ तासांच्या आत तुम्ही पैसे काढू शकतात. चला तर मग त्याची प्रक्रिया सविस्तर जाणून घेऊया. अडचणीच्या परिस्थिती तुम्हालाही पैशाची गरज भासली तर तुम्ही पीएफ खात्यातून आगाऊ पैसा काढू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *