ताज्याघडामोडी

मित्रांसाठी कर्ज घेतलं, पण त्यांनीच धोका दिला, सावकारानेही छळलं, नको ते करुन बसला…

अवैध सावकारी करणाऱ्यांनी वसुलीसाठी तगादा लावल्याने एका २४ वर्षीय तरूणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज बुधवारी सकाळी उघडकीस आली. अंकुश नंदकिशोर राऊत (वय २४, राहणार लक्ष्मी नगर, मोठी उमरी, अकोला) असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तर अकोल्यातील दुसऱ्या घटनेत २८ वर्षीय तरुणाने बहिणीच्या साक्षगंधाच्या दिवशीच आत्महत्या केली. निलेश भगवान बोबटे असं या तरुणाचं नाव […]

ताज्याघडामोडी

हिंडेनबर्गचा जोर ‘ओसरला’; अदानीचं जबरदस्त पुनरागमन, शेअर्समध्ये बंपर तेजी

अमेरिकन शॉर्ट सेलर कंपनी हिडेनबर्ग रिसर्चने २४ जानेवारी २०२३ रोजी भारतातील प्रतिष्टीत समूहापैकी एक अदानी समूहावर फेरफार आणि फसवणुकीचे आरोप करत धक्कादायक अहवाल प्रकाशित केला. हिंडेनबर्गचा रिपोर्ट समोर आल्यापासून भारतीय शेअर बाजार आणि अदानी समूहातील समभागात खळबळ उडाली. याच्या परिणामी गौतम अदानी जगातील श्रीमंतांच्या यादीत झरझर खाली पडले. पण आ बाजारातील १० सत्रानंतर अदानींच्या स्टॉक्सवरील […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर एम.आय.डी.सी.च्या कामास गती द्या,उद्योगमंत्री उदय सामंत यांचे निर्देश

आ.आवताडेंच्या उपस्थितीत पार पडली अधिकाऱ्यांची बैठक    पंढरपूर शहर व तालुक्याच्या दृष्टीने भौतिक, व्यावसायिक आणि अर्थिक पातळ्यांवर अतिशय महत्वपूर्ण असणारा पंढरपूर एम. आय. डी. सी. प्रश्न गेली अनेक वर्षे भिजत घोंगडे अशा अवस्थेत सापडला होता. सदर एम. आय. डी. सी. साकार झाल्यानंतर पंढरपूर तालुक्यातील निरनिराळ्या विकासात्मक बाबींचा विकास कसा होऊ शकतो यावर फक्त कागदी घोडे नाचवून […]

ताज्याघडामोडी

महागड्या कर्जातून सर्वसामान्यांना दिलासा नाहीच; रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) पतधोरण समितीची बैठक नुकतीच पार पडली. देशातील केंद्रीय बँकेची पतधोरण बैठक सोमवार ६ फेब्रुवारी रोजी सुरु झाली असून नुकतेच बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी नवीन वर्षातील बँकेचे पहिले पतधोरण जाहीर केले. तीन दिवस चाललेल्या बैठकीतील निर्णयानुसार रिझर्व्ह बँकेने व्याजदरात (रेपो रेट) ०.२५ बेस पॉईंटने वाढ जाहीर केली असून यासह केंद्रीय बँकेचा […]

ताज्याघडामोडी

स्वत:ला बाजीप्रभू देशपांडे म्हणवून घेणारे खिंड सोडून पळाले; विखे-पाटलांचा बाळासाहेब थोरातांना सणसणीत टोला

२०१९ साली काँग्रेस वाचविण्यासाठी मी बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका बजावणार, असे सांगणारे आणि एकाकी खिंड लढवणार म्हणवून मिरवून घेणारे आता हतबल का झाले ? खिंड लढवायची सोडून त्यांनी पळ काढण्यात समाधान मानले आहे, अशी उपरोधिक आणि घणाघाती टीका करीत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी थोरातांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या राजीनामा […]

ताज्याघडामोडी

आदर्श शिक्षक पुस्कार प्राप्त निवृत्त शिक्षक अभय शेटे यांच्या कडून सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयास १०,००० रुपये किंमतीची पुस्तके भेट

सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर महाविद्यालयास शरदचंद्रजी पवार शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, विलासराव देशमुख हायस्कूल उपरी (ता.पंढरपूर) येथील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त शिक्षक अभय विश्वनाथ शेटे व शिक्षिका अमिता अभय शेटे यांनी १०,००० हजार रूपये किंमतीची पुस्तके महाविद्यालयास भेट दिली आहेत. ज्ञान ही अशी एकमेव गोष्ट आहे […]

ताज्याघडामोडी

आता हेच तुझे बाबा, नवऱ्याला सोडून प्रियकरासोबत राहिली, पण एका इच्छेमुळे मायलेकाचा जीव गेला

नर्स आणि तिच्या १२ वर्षीय मुलाची हत्या झाल्याचा प्रकार रविवारी उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये उघडकीस आला होता. मात्र महिलेची हत्या तिच्या प्रियकरानेच केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हत्येबाबत आरोपीने सर्वात आधी निवृत्त पोलीस अधिकारी काकाला सांगितलं होतं. तेव्हा काकाने दोघांचे मृत्यू हे आत्महत्या असल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी काही तासांतच तपासाची चक्र फिरवत आरोपी […]

ताज्याघडामोडी

तास उलटून गेला, एकजण माडावर हालचाल न करता बसलाय; पादचाऱ्याचा पोलिसांना फोन अन् मग…

कर्नाटकमधील म्हैसूरमध्ये सोमवारी एकाचा झाडावर मृत्यू झाला. ६० वर्षांचा वृद्ध म्हैसूर रोड परिसरातील विजयश्री लेआऊटमधील माडाच्या झाडावर चढला होता. ५० फुटांच्या झाडावर चढल्यानंतर वृद्धानं नारळ काढण्यास सुरुवात केली. माडाच्या झाडावर बसला असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला. सकाळी ११ च्या सुमारास एक पादचारी माडाजवळून जात होता. त्यानं केनगेरी पोलिसांना फोन केला. ‘एक व्यक्ती तास उलटून गेला […]

ताज्याघडामोडी

रात्री जेवण करून बाहेर पडला अन् सकाळी मृतदेहच सापडला; तरुणासोबत नेमकं काय घडलं…

जळगावमध्ये काळजाचा ठोका चुकावणारी एक घटना समोर आली आहे. इथे जेवण करून घराबाहेर पडलेल्या मुलाची सकाळी थेट मृत्यूची माहिती आल्याने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. रमेश भास्कर नाडे (वय ३०) रा. राजीव गांधी नगर असे मयत तरुणाचे नाव आहे. सोमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली […]

ताज्याघडामोडी

आईनेच पोटच्या दोन मुलांचा जीव घेतला, धक्कादायक घटना; मुलं झोपेत असताना…

औरंगाबाद शहरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईनेच आपल्या पोटच्या दोन मुलांची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आईने मुलांची हत्या का केली? याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. आपल्या दोन अल्पवयीन मुलांचा ते झोपेत असताना आईनेच त्यांचा जीव घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात […]