ताज्याघडामोडी

आदर्श शिक्षक पुस्कार प्राप्त निवृत्त शिक्षक अभय शेटे यांच्या कडून सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयास १०,००० रुपये किंमतीची पुस्तके भेट

सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर महाविद्यालयास शरदचंद्रजी पवार शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, विलासराव देशमुख हायस्कूल उपरी (ता.पंढरपूर) येथील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त शिक्षक अभय विश्वनाथ शेटे व शिक्षिका अमिता अभय शेटे यांनी १०,००० हजार रूपये किंमतीची पुस्तके महाविद्यालयास भेट दिली आहेत. ज्ञान ही अशी एकमेव गोष्ट आहे की जी दिल्याने कमी होत नाही तर ती वाढतच राहते या उक्ती प्रमाणे आपल्या निवृत्ती नंतर ही आपल्या कडे उपलब्ध असणाऱ्या ज्ञान भांडाराचा फायदा येणाऱ्या नवीन पिढीला व्हावा या उदात्त हेतूने शेटे यांनी शिक्षकी पेशातून निवृती घेतल्यानंतर ही आपली शिक्षणाबद्दलची आस्था सोडली नाही. सरांनी महाविद्यालयास दिलेल्या पुस्तकांचा उपयोग सिंहगड कॉलेज मधील विद्यार्थी नक्कीच होईल याशिवाय विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रकाशाचा किरण फुलवण्यासाठी वापर करतील, असे मत प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी यादरम्यान व्यक्त केले

    मंगळवार दिनांक ७ फेब्रुवारी २०२३ रोजी सिंहगड कॉलेज मध्ये अभय शेटे हे सपत्नीक महाविद्यालयाला पुस्तक भेट देण्यासाठी आले होते. त्यांनी सोबत १०,००० किंमतीची ३५ हून अधिक पुस्तके आणली होती. ती पुस्तके महाविद्यालयाला भेट दिली. सिंहगड इंजिनिअरींग कॉलेज गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात आपले ज्ञानदानाचे भरीव योगदान देत आहे. या पवित्र अशा ज्ञानदानाला मदत म्हणून मुलीच्या शिक्षणासाठी १०,००० रूपये किंमतीची खरेदी केलेली पुस्तके प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांचे कडे सुपूर्द केली. या उपक्रमाचे विद्यार्थी, शिक्षक व पालक वर्गातून कौतुक होत आहे. 

 शैक्षणिक वर्ष २०१८-१९ या वर्षी कुमारी अमृता अभय शेटे ही त्यांची कन्या एस. के. एन. सिहंगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातून काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातून पास होऊन पुढील शिक्षणासाठी बाहेर गावी गेल्या. सरांनी आपल्या कन्येच्या इंजिनिअरींगच्या शिक्षणासाठी विकत घेतलेली सर्व पुस्तके महाविद्यालयात आणून भेट दिली. यातुन त्यांच्या दानशूर व्यक्तिमत्त्वाचा महाविद्यालयाकडून पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

   यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डाॅ. स्वानंद कुलकर्णी, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. सुभाष पिंगळे, प्रा. नामदेव सावंत, प्रा. समाधान माळी, प्रा. सोमनाथ झांबरे आदी उपस्थित होते. दरम्यान महाविद्यालयातील विद्यार्थी, पालक, सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांकडून श्री. अभय विश्वनाथ शेटे यांचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *