सांगोला: फॅबटेक इंजिनिअरिंग कॉलेजच्या शै. वर्ष २०२१-२२ मध्ये तब्बल ८० विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपनीत निवड झाल्याची माहिती संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर श्री संजय अदाटे यांनी दिली. सोलापूर जिल्हामध्ये जास्त प्लेसमेंट देणारे अभियांत्रिकी महाविद्यालय म्हणून आज परिचित आहे. शै. वर्ष २०२१-२२ मध्ये विद्यार्थ्यांना इम्फोसिस, टीसीएस, विप्रो, कॅपजेमिनी, टोयोटा,केपीआयटी,व्हॅारूक, सीनटेल इ. प्रमुख बहुराष्ट्रीय कंपन्यामध्ये स्थान मिळाले आहे. तसेच […]
ताज्याघडामोडी
राज्यातून पावसाची एक्झिट कधी? आता दिवाळी पण पाण्यात जाणार का? हवामान खात्याने सांगितली तारीख
ऑक्टोबर महिन्या मध्यावर आला पण अजूनही पावसाने आपला मुक्काम हलवलेला नाही. मागील तीन दिवसांपासून राज्यभरात पावसाने धुमशान घातले आहे. राज्यातून 20 ऑक्टोबरपर्यंत पाऊस पूर्णपणे माघार घेऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रातून पावसाचा परतीचा प्रवास शुक्रवारपासून सुरू झाला असल्याची माहिती हवामान विभागानं दिली. या काळामध्ये गडगडाटासह महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. राज्याच्या […]
स्वेरीच्या ८२ विद्यार्थ्यांची ‘इन्फोसीस’ या कंपनीत निवड
प्लेसमेंट मध्ये स्वेरीची गरुडझेप पंढरपूरः‘इन्फोसीस’ या बहुराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील तब्बल ८२ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे’, अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली. ‘इन्फोसीस’ या बहुराष्ट्रीय कंपनीच्या निवड समितीने गोपाळपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी या […]
पंढरपूर सिंहगडच्या ४४ विद्यार्थ्यांची “इन्फोसिस” कंपनीत कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड
पंढरपूर सिंहगड ठरले सर्वाधिक प्लेसमेंट देणारे महाविद्यालय पंढरपूर: प्रतिनिधी इन्फोसिस टेक्नॉलॉजीज लिमिटेड हि एन. आर. नारायण मुर्ती आणि त्यांच्या सहा सहकाऱ्यांनी पुण्यात १९८१ मध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सेवा देण्यासाठी इन्फोसिस कंपनी स्थापन केली. १९८३ साली कंपनीचे मुख्यालय बंगळूर येथे नेले. भारतात इन्फोसिसचे नऊ साॅफ्टवेअर विकासकेंद्रे असुन जगभरात ३० ठिकाणी कार्यालय आहेत. या कंपनीत ८८, ६०१ […]
‘खर्च करूनही मुलांना नोकरी मिळणार नाही’, चिठ्ठीत मराठा आरक्षणाचा उल्लेख करत शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल
शेतकरी आत्महत्येच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. कर्जबाजारीपणा, सततची नापिकी, दुष्काळ, अशा विविध कारणांमुळे अनेक शेतकरी त्रस्त असतात. अनेकजण या संकटातून स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. तर बरेच शेतकरी सततच्या त्रासाला कंटाळून टोकाचं पाऊल उचलतात. हे वास्तव अतिशय धक्कादायक आहे. आता बीडमधून नुकतीच एक अतिशय हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बीडमधील या घटनेत […]
हायप्रोफाइल सेक्स रॅकेटवर छापा: चक्क कंपनीच्या ऑफिसमध्येच सुरू होता प्रकार
जळगाव शहरातील मध्यवर्ती भागात असणाऱ्या नवीपेठ येथील महावीर बँकेच्या पाठीमागे एका कंपनीच्या नावे असणाऱ्या ऑफिसमध्ये हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या सेक्स रॅकेटवर जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने आज दुपारी ४ वाजता छापा टाकला. यावेळी पोलिसांनी कारवाई करत २ पुरुष ग्राहक आणि ६ तरुणींना ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी शहर […]
लघुशंकेसाठी घराबाहेर आलेल्या वृद्ध महिलेवर बलात्कार; साताऱ्यातील खळबळजनक घटना
लघुशंकेसाठी घराबाहेर आलेल्या एका पाचष्ट वर्षीय महिलेला मारहाण करत तिच्यावरती बलात्कार केल्याची संतापजनक आणि धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात घडली आहे.या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माण तालुक्यात एक पासष्ट वर्षीय महिला लघुशंकेसाठी घराबाहेर आली होती. त्याचवेळी एका व्यक्तीने तिला पाठीमागून येऊन मिठी मारली, ती ओरडेल म्हणून तिचे तोंड दाबले आणि […]
अंधश्रद्धेतून जोडप्याने घेतले 2 महिलांचे बळी; मग मांस कापून खाल्लं
दोन महिलांचा नरबळी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एर्नाकुलम जिल्ह्यात ही घटना समोर आली आहे. येथील एका जोडप्यानं झटपट श्रीमंत बनण्याच्या हव्यासापोटी महिलांचा नरबळी दिला आहे. त्यानंतर मृतदेहाचे तुकडेही या जोडप्यानं खाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या प्रकरणी जादूटोणा आणि नरबळी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपी जोडपे आणि त्यांच्या साथीदाराला अटक केली आहे. […]
प्रथम वर्ष डिप्लोमा मधील विद्यार्थ्यांचे फॅबटेक मध्ये उत्साहात स्वागत
सांगोला : ज्ञान प्राप्तीला कौशल्याची जोड दिल्याने अभियंते सन्मानास पात्र होतील असे प्रतिपादन सेवा निवृत्त शिक्षक श्री महादेव घोंगडे यांनी केले . सांगोला येथील फॅबटेक पॉलीटेक्नीक कॉलेजने आयोजित केलेल्या प्रथम वर्ष डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते . या वेळी व्यासपीठावर एक्सिक्युटीव्ह डायरेक्टर दिनेश रुपनर , कॅम्पस डायरेक्टर संजय अदाटे, […]
धगधगती मशाल विरुद्ध ढाल-तलवार, अखेर शिंदे गटाला मिळालं नवं चिन्ह
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. काल निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरे गटाला नवं नाव आणि नवं चिन्ह दिल्यानंतर आता शिंदे गटालाही नवं चिन्ह मिळालं आहे. निवडणूक आयोगाकडून याबाबत घोषणा करण्यात आली आहे. शिंदे गटाच्या पक्षाचं नाव बाळासाहेबांची शिवसेना असून ढाल-तलवारीचं चिन्ह देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या […]











