ताज्याघडामोडी

फॅबटेक इंजिनिअरींग कॉलेजच्या तब्बल ८० विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपनीत निवड

सांगोला: फॅबटेक इंजिनिअरिंग कॉलेजच्या शै. वर्ष २०२१-२२ मध्ये तब्बल ८० विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपनीत निवड झाल्याची माहिती संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर श्री संजय अदाटे यांनी दिली.

 सोलापूर जिल्हामध्ये जास्त प्लेसमेंट देणारे अभियांत्रिकी महाविद्यालय म्हणून आज परिचित आहे. शै. वर्ष २०२१-२२ मध्ये विद्यार्थ्यांना इम्फोसिस, टीसीएस, विप्रो, कॅपजेमिनी, टोयोटा,केपीआयटी,व्हॅारूक, सीनटेल इ. प्रमुख बहुराष्ट्रीय कंपन्यामध्ये स्थान मिळाले आहे. तसेच विद्यार्थ्यांना रॅडीएंट इंडस्ट्री, बजाज, मरेली, मदरसन,जीकेएन फोकर्स या मुख्य कंपनीमध्ये स्थान मिळाले आहे.हे प्लेसमेंट्स सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या शैक्षणिक

अभ्यासक्रमा दरम्यान त्यांच्या विषयाच्या ज्ञानाबरोबरच घेतलेल्या कठोर प्रशिक्षणामुळे मिळाले असल्याची माहिती इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.आर.बी शेंडगे यांनी दिली. फॅबटेक टेक्निकल कॅम्पस नेहमीच विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या कलागुणांना चालना देण्यासठी समर्पित आहे.तसेच तांत्रिक क्षेत्रातील त्यांच्या करिअरला आकार देण्यासाठी विविध उदयोग क्षेत्रातील व्यक्तीसोबत पहिल्या वर्षापासून शेवटच्या वर्षापर्यंत सॉफ्ट स्किल, तांत्रिक कौशल्य प्रदान करून उच्च पॅकेजस मिळवुन देत आहोत अशी माहिती पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. शरद पवार यांनी दिली.

या सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्याचे संस्थेचे चेअरमन श्री.भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर श्री अमित रुपनर, कार्यकारी संचालक श्री दिनेश रुपनर, यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख डॉ.साहेबगौडा संगनगौडर, सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक यांनीही निवड झालेल्या विद्यार्थ्याचे अभिनंदन करून पुढील कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *