ताज्याघडामोडी

स्वेरीच्या ८२ विद्यार्थ्यांची ‘इन्फोसीस’ या कंपनीत निवड

प्लेसमेंट मध्ये स्वेरीची गरुडझेप 

पंढरपूरः‘इन्फोसीस’ या बहुराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील तब्बल ८२ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे’, अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.

‘इन्फोसीस’ या बहुराष्ट्रीय कंपनीच्या निवड समितीने गोपाळपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून श्रद्धा अण्णाराव सुरवसे, सत्यम महादेव शिंदे, हर्षवर्धन नितीन जाधव, अजय ज्ञानदेव सावंत, दीपक प्रमोद घोळवे, श्रेयश अमोल गोसावी, गणेश बाळासाहेब बागल, ईशा सलीम बागवान, नाझनीन कय्युम मुलाणी, महेश दत्तात्रय साळुंखे, अक्षय जगन्नाथ शिंदे, गौरव प्रवीण टंक, शैलेश धर्मराज जाधव, रेहान इरफान इनामदार, प्रशांत विजय माळी, ज्ञानेश्वर अण्णासाहेब गोयकर, ऐश्वर्या दिलीप पोतदार, अभिषेक श्रीमंत बनगर, चैतन्य वैभव भोसले, मुक्ताई राजेंद्र नागणे, अक्षदा मिलिंद देशपांडे, प्रिती ज्ञानेश्वर चव्हाण, शिवानी शरद आवताडे, चंद्रोदय विठ्ठल कलशेट्टी, अखिलेश उत्तम कुटे, शिवानी राजेश आवताडे, ऋषिकेश राजेंद्र पांढरे, आशुतोष अतुल डोळे, मुकुंद सुभाष खपाले, जयदीप प्रदिप जाधव, गौरव राजेंद्र वाघमारे, गीता श्रीनिवास कौलवार, स्वप्नील रमाकांत मुकरे, ऋतुजा मोहन बेणारे, साक्षी मनोज कोटलवार, योगेश भास्कर डोंगरे, प्रशांत महादेव खुर्द, आकांशा धनंजय हजारे, मोनाली हनुमंत शिंदे, राधिका अंबादास असापुरे, प्रतिक सुनील माळी, अजिंक्य प्रमोद लोखंडे, प्रतीक्षा सिद्धेश्वर माळी, शिवम सुनील साळुंखे, स्वप्नील रामदास गुंड, आयेशा शफिक तांबोळी, नितीन तानाजी गुजरे, पल्लवी रघुनाथ रितुंड, क्षिप्रा विद्याधर कुरणावळ, प्रदिप लालासाहेब कांबळे, प्रतिक अनिल वाळूजकर, भक्ती पुरुषोत्तम दुदगीकर, गिरीधर गुणापाल शेट्टीगार, प्राजक्ता दत्तात्रय कुलकर्णी, कौशिक रवींद्र कुलकर्णी, सुजय पुरुषोत्तम गाटे, गोपाळ गोविंद कांबळे, समिक्षा कैलास कोरके, अंकिता बाबासाहेब साठे, पायल नवनाथ गेंड, ऋतूजा राजेश जाधव, गौरी संतोष गोरे, क्षितीजा तानाजी कांबळे, श्वेता शिवाजी मगर, अविनाश दादासाहेब पवार, ऐश्वर्या उमेश नलवडे, हर्षदा केदारी नरवडे, ऋतिक रमेश गोडसे, इरफान रशीद मुलाणी, दीपज्योती दत्तात्रय साठे, श्रेयश राजाराम चव्हाण, युवराज विनोद शेलार, निखिल दिलीप मुंढे, श्रद्धा दत्तात्रय गजाकोश, ओंकार संतोष पवार, सौरभ बंडू कडसरे, अविनाश बसवराज धबडे, प्रणय प्रदिप डिसले, विश्वजित अशोक शिंदे, सोहेल हुमायून शिकलगार, अथर्व मकरंद कुलकर्णी व काशिलिंग कालिदास सरक या ८२ विद्यार्थ्यांची निवड केली. या विद्यार्थ्यांना प्रत्येकी वार्षिक रु.३.६ लाखांचे पॅकेज मिळाले आहे.

१९९८ साली स्थापन झालेल्या स्वेरी अभियांत्रिकीमधून प्लेसमेंटच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. स्वेरीचे विद्यार्थी आज विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यात आपले उत्तम करिअर घडवीत आहेत. ‘स्वेरी’ मधून विविध कंपन्यात प्लेस होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे सध्याच्या आकडेवारीवरून दिसून येते. विद्यार्थ्यांना ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागामार्फत स्वतंत्रपणे कुशल प्रशिक्षकांद्वारे एप्टीट्युड, कम्युनिकेशन स्कील, टेक्निकल स्कील, विविध सॉफ्टवेअर्स, मॉक इंटरव्युव्ह यांचे प्रशिक्षण दिले जाते. स्वेरीमध्ये वार्षिक परीक्षांचे उत्कृष्ट निकाल, संशोधने, मानांकने, इन्फ्रास्ट्रक्चर याबरोबरच विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून करिअरच्या दृष्टीने सर्वात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या प्लेसमेंटकडे देखील अधिक लक्ष दिले जाते व मोठमोठ्या कंपन्यांना हवे तसे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी घडविण्यासाठी प्रशिक्षित तज्ञांकडून उत्कृष्ट मार्गदर्शन केले जाते. मागील वर्षी कोरोनाचा प्रभाव असताना देखील कॅम्पस प्लेसमेंटद्वारे तब्बल ६०० पेक्षा अधिक नोकरीच्या संधी प्राप्त करून देण्यात आल्या. या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्यामुळे विशेषतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. एकीकडे स्वेरीने प्रवेश प्रक्रियेत व वार्षिक परीक्षेच्या निकालात मारलेली गरुड झेप दिसून येते तर दुसरीकडे स्वेरी अभियांत्रिकीला देशातील शैक्षणिक क्षेत्रात महत्वपूर्ण असलेले ‘नॅक’ अर्थात ‘नॅशनल असेसमेंट अँड अॅक्रिडिटेशन कौन्सिल’चे ४ पैकी ३.४६ सीजीपीए सह ‘ए प्लस’ हे मानांकन मिळाले आहे. ए.आय.सी.टी.ई (ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन) व यु.जी.सी.(युनिव्हर्सिटी ग्रँटस कमिशन) यांच्याशी संलग्नित असणारे व ४ पैकी ३.४६ सीजीपीए सह नॅकचे ‘ए प्लस’ मानांकन मिळविणारे स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे सोलापूर विद्यापीठातील पहिले व एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालय ठरले आहे. सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट व संबंधित विभागातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य,अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी ‘इन्फोसीस’ या कंपनीमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूमधून निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *