शेतकरी एकदा आपल्या शेतामध्ये काम करायला लागला की तो तहानभूक विसरुन काम करतो. आपल्या शेतात उगवलेल्या पीकाची लवकरात लवकर कापणी करुन ते बाजारात कसं नेता येईल, यासाठी बळीराजाची कायमच धावपळ सुरु असते. त्यासाठी सर्व गोष्टी विसरुन, भान हरपून शेतकरी शेतात काम करत असतात. मात्र, या नादात अनावधनाने घडलेली एखादी चूक अनर्थ घडवण्यास आणि जीव घेण्यास […]
ताज्याघडामोडी
वडिलांना संपवायला मुलानं मोजले १ कोटी; ‘त्या’ गिफ्टमुळे जीव गेला
कर्नाटकची राजधानी बंगळुरूत संपत्तीसाठी मुलानं वडिलांची हत्या केली. वडिलांच्या खुनासाठी मुलानं १ कोटी रुपयांची सुपारी दिली होती. वडिलांची हत्या करणारा ३२ वर्षीय मुलगा बेरोजगार असून काही दिवसांपूर्वीच तो तुरुंगातून सुटला होता. तुरुंगात असतानाच त्याचा काही गुन्हेगारांशी संपर्क साधला. त्याच गुन्हेगारांना आरोपीनं वडिलांच्या हत्येची सुपारी दिली. आरोपी मुलाचे वडील त्यांच्या पत्नी आणि सुनेसह एका फ्लॅटमध्ये राहतात. […]
पत्नीने दिला धोका; बदला घेण्यासाठी ज्याच्यासोबत पळाली त्याच्या बायकोला…
प्रेमप्रकरणातून अनेकदा विवाहित महिला किंवा पुरुष आपल्या जोडीदाराला सोडण्याचा निर्णय घेतात. पण, बिहारच्या खगरिया जिल्ह्यातील प्रेमप्रकरणाची जी घटना समोर आली आहे ती वाचून तुम्ही हैराण व्हाल. येथे पत्नीने आपल्या पतीला धोका दिला म्हणून पतीने बदला घेण्यासाठी त्या व्यक्तीच्या पत्नीशी लग्न केले ज्याच्यासोबत त्याच्या पत्नीचे अनैतिक संबंध होते. खगरियाच्या चौथम ब्लॉकमधील हरदिया गावातील रहिवासी असलेल्या नीरजचे […]
पुतण्याचं लग्न ठरणार इतक्यात काकांना हार्टअटॅक, गप्पा मारता मारता पलंगावरुन खाली कोसळले
जालना: जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील गोकुळ गावात काल धक्कादायक घटना घडली. हसत्या खेळत्या पालोदे कुटुंबासह गोकुळ गावावर शोककळा पसरली.पुतण्याला पाहण्यासाठी आलेल्या मुलीकडाच्या पाहुण्यांसमोरच मुलाच्या काकाचे हृदयविकाराच्या तीव्र झटकयाने निधन झाले.शेणफड पालोदे (वय ६२) असे त्यांचे नाव आहे. ही घटना सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील गोकुळ येथे घडली. जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील गोकुळ येथील उत्तम पालोदे […]
जिममध्ये घाम गाळून बॉडी बनवली, पण ‘त्या’ एका कारणाने स्वत:ला पेटवून घेतलं, तरुणाच्या आत्महत्यने खळबळ
एका बॉडिबिल्डरच्या आत्महत्येची घटना समोर आली आहे. तरुण वयात मुलगा गेल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. कुटुंबियांनी केलेल्या दाव्यानुसार एका लोन प्रकरणात बँक आणि पोलिसांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केली. दिल्लीतल्या गोकुलपूरी परिसरातील ही घटना आहे. इथं राहणाऱ्या 34 वर्षांच्या कपिल राज या तरुणाने 2019 मध्ये एयू स्मॉल फायनान्स बँकेतून 18 लाख 50 हजार रुपयांचं […]
रविंद्र धंगेकरांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर मोठा आरोप
कसबा पोटनिवडणुकीतील राजकीय वातावरण अद्यापही तापलेले आहे.भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप करत काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी कसबा गणपतीसमोर उपोषण सुरु केलं होतं. यावरुन आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी रविंद्र धंगेकरांवर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर रविंद्र धंगेकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्र्यांनी पुण्यात पैसे वाटले […]
आईशी भांडण, रागा रागात अल्पवयीन मुलीनं घर सोडलं अन् पुढे तिच्यासोबत घडत गेलं ते भयंकरच
रागा रागात घर सोडून गेलेल्या अल्पवयीन मुलीवर महिनाभरात वेळोवळी एकापेक्षा जास्त जणांनी अत्याचार केला. पीडित अल्पवयीन मुलीने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून ही माहिती समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. शहरातील एका भागात ही १६ वर्षीय पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबासह रहाते. ७ जानेवारीला अल्पवयीन […]
शाळेत नुकतंच ॲडमिशन घेतलं, मास्तरच जीवावर उठला; पुण्यात दिव्यांग मुलाला पाईपने मारहाण
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. जुन्नर तालुक्यातील धामणखेल या गावात एका दिव्यांग आणि गतिमंद असलेल्या मुलाला शाळेतील शिक्षकाने आणि कर्मचाऱ्याने बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या मारहाणीत मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी जुन्नर पोलिसांनी शिक्षक आणि कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा […]
गौतमी पाटीलचा तो व्हिडीओ व्हायरल, रुपाली चाकणकर सरसावल्या, पोलिसांना रोखठोक आदेश
आपल्या अदाकारीने आणि नृत्याने तरुणाईला भुरळ पाडणारी प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिचा आक्षेपार्ह व्हिडिओ काही विकृतांनी सोशल मीडियावर व्हायरल केला. पुण्यातील एका शोदरम्यान गौतमी कपडे बदलत असताना तिचा व्हिडीओ शूट करुन विकृतांनी तो व्हिडीओ फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर व्हायरल केला. त्यानंतर गौतमीने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर त्याची दखल राज्य महिला आयोगाने देखील घेतली आहे. राज्य महिला […]
ट्युशनसाठी म्हणून घरातून बाहेर पडली, दोघांनी पाठलाग केला, अन्…
ट्युशनसाठी निघालेल्या मुलीला रस्त्यात अडवून सोनसाखळी चोरणाऱ्या दोघांना पोलिसांना अवघ्या २४ तासांत अटक केली आहे. जनेंद्र नगरसिंगराव कोया आणि ऋषिकेश दळवी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून दोघंही सराईत गुन्हेगार आहेत. २२ फेब्रुवारीरोजी तरुणी ट्युशनसाठी जात असताना तिच्यामागून दोन तरुण चालत होते. त्याचवेळी त्यांनी तिचं ल७ नसल्याचे पाहून गळ्यातील आठ ग्रॅम वजनाची चेन खेचली,. भांबावलेल्या […]











