ताज्याघडामोडी

शहरी भागातही नवीन रास्त भाव धान्य दुकाने सुरू करता येणार; छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांना यश

राज्यातील कोरोना प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती तसेच जुलै व ऑगस्टमध्ये राज्यात झालेली अतिवृष्टी लक्षात घेता आता शहरी भागातही नवीन रास्त भाव धान्य दुकाने सुरू करण्यात येणार आहेत. हा निर्णय अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नाने घेण्यात आला आहे. राज्य शासनाकडून स्वस्त धान्य दुकानदारांच्या उत्पन्नात वाढ करण्याकरिता रास्त भाव दुकानांची पुनर्रचना करण्याबाबतची […]

ताज्याघडामोडी

6 दहशतवाद्यांच्या मास्टरमाईंड जान शेखला मुंबईच्या सायनमधून अटक, दाऊदच्या होता संपर्कात!

नवी दिल्लीत सहा दहशतवाद्यांना अटक केली आहे. या दहशतवादांच्या मोठ्या घातपाताचा कट होता. मुंबई आणि उत्तर प्रदेशमधील निवडणुका दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातून ज्या दहशतवाद्याला अटक करण्यात आली होती, तो मुंबईतील असल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ही कारवाई केली होती. गेल्या महिन्याभरापासून हे ऑपरेशन सुरू होतं. 6 दहशतवाद्यांपैकी […]

ताज्याघडामोडी

१८ वर्षीय तरुणीचा धक्कादायक मृत्यू, टूथपेस्ट ऐवजी चुकून विषारी औषधाने घासले दात

दात घासल्याशिवाय आपल्या कोणाच्याच दिवसाची सुरुवात होत नाही. पण याच दात घासण्यावरून मुंबईत काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे. टूथपेस्ट समजून उंदीर मारण्याच्या औषधाने दात घासल्याने एका १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. मुंबईतल्या धारावी परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर शहर व तालुक्यातील भीमा नदीकाठच्या सर्व गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पंढरपूर शहर व तालुक्यातील भीमा नदीकाठच्या सर्व गावांमधील नागरिकांना कळविण्यात येते की, वीर धरण व परिसरात संततधार पाऊस सुरू असल्याने धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी दि.14/09/2021 रोजी वीर धरणाच्या सांडव्यातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये वाढ करून पहाटे 4.00 वाजता 32459 Cusecs विसर्ग नीरा नदीमध्ये सुरू करण्यात आला आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो. यामुळे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

खेडभोसे येथील तरुणाचा विष पाजून खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप

लग्नास नकार देत असल्याच्या कारणाने खेडभोसे येथील एका तरुणाचा विष पाजून खुनाचा प्रयत्न केल्याचा असल्याच्या प्रकरणातील ९ आरोपींचा अटकपूर्व जामीन येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.बी.लंबे यांनी मंजूर केला आहे.  ११ जून २०२१ रोजी रात्री १० वाजता खेडभोसे येथील सोमनाथ रामचंद्र पवार या तरुणास जीवे मारण्याच्या उद्देशाने या प्रकरणातील आरोपी कालिदास साळूंखे,कांतीलाल साळूंखे,मधुकर चव्हाण,अंकुश पाटील,शिवाजी पवार,सिद्धेश्वर […]

ताज्याघडामोडी

धनगर समाजाचा आणखी एक बडा नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आता चांगलाच जोर लावायला सुरुवात केली आहे. त्यामुळे, येत्या सदर निवडणुकीच्या काळात महाविकासआघाडी होईल की, नाही याची शास्वती नसल्याने राष्ट्रवादी आपला पाया मजबूत करत असल्याचं पहायला मिळत आहे. त्यामुळे, मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाचा सपाटा लावला आहे. दरम्यान, आता मल्हार आर्मीचे प्रमुख आणि मराठवाड्यातील […]

ताज्याघडामोडी

केंद्राला वारंवार मागूनही इम्पेरिकल डेटा न दिल्याने OBC आरक्षण गेलं : विजय वडेट्टीवार

धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टीने 5 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. तसेच पालघर जिल्हा परिषदेच्या व त्यांतर्गतच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी देखील त्याच दिवशी मतदान होईल आणि सर्व ठिकाणी 6 ऑक्टोबर 2021 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त […]

ताज्याघडामोडी

सहकारी संस्थांची निवडणुक प्रक्रिया 20 सप्टेंबरपासून सुरु करण्याचे आदेश

सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार नाहीत असं राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने सांगितलं आहे. प्राधिकरणाने डिसेंबर 2020 पर्यंत निवडणुकीस पात्र असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका येत्या सहा महिन्यांच्या आत घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.तसेच येत्या 20 सप्टेंबरपासून या निवडणुकांची प्रक्रिया सुरु करण्याचे आदेशही दिले आहेत. निवडणुका घेण्यासाठी कार्यवाही सुरु करा कोरोना महामारीमुळे मागील अनेक महिन्यांपासून सहकारी संस्थांच्या निवडणुका […]

ताज्याघडामोडी

राज्यात 15 ऑक्टोबरपासून ऊसाचा गाळप हंगाम

राज्यात 2021-22 साठी ऊसाचा गाळप हंगाम 15 ऑक्टोबर 2021 पासून सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला.जे कारखाने 15 ऑक्टोबर 2021 पूर्वी उसाचे गाळप सुरु करतील त्यांच्या कार्यकारी संचालकांवर गुन्हे नोंदविण्यात यावेत, असा निर्णयही या बैठकीत सर्वसहमतीने घेण्यात आला. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल […]

ताज्याघडामोडी

भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी पैशांची दिली होती ऑफर” आमदाराचं खळबळजनक विधान

आमदार श्रीमंत पाटील यांनी  खळबळजनक दावा केला आहे. कर्नाटक विधानसभेच्या अधिवेशनाच्या तोंडावर भाजपचे माजी मंत्री आणि कागवडचे आमदार श्रीमंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता चांगलीच खळबळ माजली आहे. काँग्रेस सोडण्यासाठी भाजपने पैशांची ऑफर दिली होती, असं श्रीमंत बाळासाहेब पाटील यांनी म्हटलं आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे भाजपची चांगलीच गोची झाली आहे. कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार पाडण्यापूर्वी काँग्रेस सोडून […]