ताज्याघडामोडी

तिसऱ्यावरुन चौथ्या मजल्यावर निघालो, लाईट गेली अन् धाडकन लिफ्ट आदळली, अजितदादांनी जीवघेणा अनुभव सांगितला!

तिसऱ्या मजल्यावरुन चौथ्या मजल्यावर जायला निघालो पण मध्येच वीज गेली अन् चौथ्या मजल्यावर पोहोचायच्या काही संकेद आधीच आमची लिफ्ट धाडकन खाली आदळली. परमेश्वराचे आणि तुम्हा सगळ्या लोकांचे आशीर्वाद म्हणून मी अपघातातून वाचलो नाहीतर आज श्रद्धांजली सभाच घ्यावी लागली असती, असा जीवघेणा अनुभव विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितला. ते बारामतीत बोलत होते. विरोधी पक्षनेते अजित […]

ताज्याघडामोडी

“ज्या माणसाची स्वतःच्या जिल्ह्यातून..” चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानावर शरद पवारांचा टोला

महाराष्ट्र केसरी विजेता शिवराज राक्षे याचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते पुण्यात झाला. त्यावेळी शरद पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना अनेक प्रश्नांवर भाष्य केले. पुणे जिल्ह्यातील दादागिरी आणि मक्तेदारी संपवली असल्याचे विधान भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. त्यावर शरद पवार म्हणाले की, ते फार शक्तिमान गृहस्थ आहेत. […]

ताज्याघडामोडी

घर बांधणाऱ्या गवंडीवरच जडला जीव अन् बाईने स्वतच्या संसाराची केली राखरांगोळी, मृतदेह सेप्टिक टँकमध्ये पुरला

ग्रेटर नोएडामध्ये एक धक्कादायक हत्याकांड उघडकीस आलं आहे.घर बांधणाऱ्या गवंडीसोबत अवैध संबंध असल्यामुळे एका महिलेने पतीची हत्या केली. पतीची हत्या केल्यानंतर तिने त्याचा मृतदेह शेजारच्या निर्माणाधीन घराच्या सेप्टिक टँकमध्ये पुरला. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गवंडीला अटक करून मृतदेह ताब्यात घेतला आणि पत्नी नीतू आणि तिला मदत करणाऱ्या आरोपी मजुराचा शोध सुरू […]

ताज्याघडामोडी

आठ महिन्याच्या गर्भवतीला बाईकला बांधून फरफटत नेलं

कंझावला प्रकरणानंतर देशाचं वातावरण ढवळून निघालेलं असताना उत्तर प्रदेशच्या पीलीभीत येथे असाच संतापजनक प्रकार घडला आहे. आपल्या आठ महिन्यांच्या गर्भवती पत्नीला बाईकसोबत बांधून नवऱ्याने गावातील गल्ल्यांमध्ये फरफटत नेल्याची घटना घडली आहे.  घटनेत महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेतील आरोपी नवऱ्याला अटक करण्यात आली आहे. ही घटना घुंघचाई गावातील आहे. पीडित […]

ताज्याघडामोडी

साधू बाबांनी चक्क डोक्यावर केली गव्हाची शेती; सेल्फीसाठी भाविकांची तुफान गर्दी

सोशल मीडियावर नेहमीच अनेक मनोरंजक गोष्टी व्हायरल होतं असतात. सध्या उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे माघ मेळा सुरू आहे. मेळ्यामध्ये नेहमीच अनेक चकीत करणाऱ्या गोष्टी पाहायला मिळतात. यात काही साधू बाबांच्या केसांच्या जटा अनेकांचे लक्ष वेधतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका साधू बाबाचा फोटो जोरदार व्हायरल झाला आहे. हे बाबा चक्क गव्हाची शेती घेऊन यात्रेमध्ये आले […]

ताज्याघडामोडी

बिस्किटाच्या पाकिटावरून गाडी गेल्याने झाला वाद, एकाला जागेवर संपवलं तर 8 जणांना केलं गंभीर जखमी

आंध्रप्रदेशमधील प्रकाशम जिल्ह्यातील कोकणमीतला भागात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रस्त्यावरून जात असताना बिस्किटचा पुडा खाली पडला आणि त्यावरून दोन चाकी वाहन गेले. वाहन गेल्यानंतर दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. भांडण इतके वाढले की, एका 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर 8 जण जखमी झाले आहेत. डेक्कन क्रॉनिकलच्या वृत्तानुसार, पोलिसांनी मृताची ओळख पटवली आहे. थलुरी […]

ताज्याघडामोडी

बँक खात्याचे नियम बदलले, RBI ने दिली माहिती समजून घ्या नाहीतर होईल नुकसान

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ग्राहकांना नेहमी आपलं खातं सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्ड बदलण्याच्या आणि योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना देत असते. आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वेळोवेळी बँकेशी संबंधित नियम आणि इतर गोष्टींमध्ये बदल करत असते. आरबीआयने बँक खात्यांशी संबंधित नियमांमध्ये अनेक बदल केले आहेत. सेव्हिंग अकाउंट असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. याचं […]

ताज्याघडामोडी

पुण्यात अख्ख्या कुटुंबाने एकत्र आयुष्य संपवलं

शेअर मार्केटमध्ये झालेला तोटा आणि आर्थिक नैराश्यातून एकाच कुटुंबातील चौघांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना मुंढवा परिसरात केशवनगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. रात्री उशिरापर्यंत माहिती गोळा करण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते. आत्महत्या केलेल्यामध्ये पती-पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. दीपक थोटे, इंदू थोटे, मुलगा ऋषिकेश थोटे, […]

ताज्याघडामोडी

रुग्णाचा संशयास्पद मृत्यू; नातेवाईकांनी केला थेट डॉक्टरांवर आरोप

जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे असणाऱ्या एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांकडून करण्यात येतोय. यावेळी नातेवाइकांनी डॉक्टरांना मारहाण केल्याचा प्रकार देखील घडला आहे. डॉक्टरांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह नेणार नाही, असा पवित्रा रुग्णाच्या नातेवाईकांनी घेतला आहे. ओतूर येथील श्री समर्थ रुग्णालयात हा सर्व प्रकार घडला आहे. […]

ताज्याघडामोडी

मेहुणीशी एकतर्फी प्रेम..पतीने दारुच्या नशेत केली पत्नीची हत्या!

झारखंडच्या धनबाद जिल्ह्यातील महावीर नगर येथे राहणारा अनिल डोम आपल्या मेहुणीवर एकतर्फी प्रेम करत असे. त्याला आपल्या मेहुणीला पत्नीसह एकाच घरात ठेवायचे होते. मात्र त्याच्या पत्नी आणि घरातील सदस्यांना या गोष्टी आवडत नव्हत्या. यासाठी घरचे लोक अनिलला अनेकदा मनाई करायचे. त्यामुळे मेव्हणीचे प्रेम मिळवण्यासाठी अनिल डोमने पत्नीला मार्गातून दूर करण्याचा निर्णय घेतला. 8 जानेवारीला त्याने […]