गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

आणखी एक लाचखोर भाऊसाहेब रंगेहाथ सापडला

  राज्यात सर्वाधिक लाचखोरी प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या सर्वाधिक कारवायात वरचा क्रमांक लागतो तो भाऊसाहेब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाचखोर तलाठी आणि मंडळ अधिकारी यांची संख्या मोठी आहे.दस्त नोंदणीच्या मार्गाने मुद्रांक शुल्कापोटी राज्य शासनास सर्वाधिक महसूल प्राप्त होतो.मालमत्ता खरेदी अथवा विक्रीचा दस्त नोंदविल्यानंतर त्या मालमत्ताच्या ७/१२ अथवा सर्व्हे क्रमांक असलेल्या खाते उताऱ्यावर नावाची नोंद होणे आवश्यक […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पत्नी, सासु-सासऱ्यासह मेव्हण्याच्या त्रासाला कंटाळून जावयाची आत्महत्या

  कुटुंबातुन वेगळे राहण्याचा अट्टाहास करणाऱ्या पत्नीसह तिच्या आई-वडील व भावाकडून झालेल्या मारहाणीमुळे आणि सातत्याने होणाऱ्या मानसिक छळास कंटाळून जावयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी धनकवडीत घडली. शरद नरेंद्र भोसले (वय 30, रा.दौलतनगर सोसायटी, धनकवडी) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी प्रियांका भोसले, सासु रोहिणी शंकर भोसले (वय 50), सासरा शंकर शिंदे (वय […]

ताज्याघडामोडी

एसटी कामगारांना मोठा दिलासा! महामंडळाला तातडीने 500 कोटी

  एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर आवश्‍यक बाबींसाठी 500 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. हा निधी तातडीने वितरीत करण्यात आला आहे.चालू आर्थिक वर्षासाठी 1450 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतूदीपैकी 838 कोटी रुपयांचा निधी एसटीला आधीच वितरीत केला असून उर्वरीत 612 कोटींपैकी 500 कोटी रुपये तातडीने एसटी महामंडळाला देण्यात यावेत, […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर तालुक्यात बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल तालुका आरोग्य अधिकारी डॉ.बोधले यांची माहिती

पंढरपूर तालुक्यात बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल तालुका आरोग्य अधिकारी डॉ.बोधले यांची माहिती पंढरपूर दि. 02 :- कोणतीही पदवी अथवा वैद्यकीय शिक्षण न घेता  वैद्यकीय व्यवसाय चालवणाऱ्या  पंढरपूर तालुक्यातील तुंगत या गावामध्ये  वैद्यकीय व्यवसाय चालवणाऱ्या बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले यांनी दिली आहे. जिल्ह्यात अधिकृत वैद्यकीय  परवान्याशिवाय उपचार करुन रुग्णांच्या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

कीर्तनकार शिवानंद हैबतपुरे यांना गाडी अडवून बेदम मारहाण

  कीर्तनकार शिवानंद हैबतपुरे हे भक्तीस्थळावरील कीर्तनाचा कार्यक्रम आटोपून उदगीरकडे निघाले होते. महादेव वाडीजवळ याच दरम्यान त्यांच्या गाडीचा काही लोकांनी पाठलाग केला आणि महादेव वाडीजवळ त्यांना अडविण्यात आले. आरोपींनी कीर्तनकार शिवानंद यांना भक्तीस्थळावर पाऊल ठेवल्यास खून करू असे म्हणत त्यांना कपडे फाटेपर्यंत मारहाण केली. तसेच त्यांच्याकडील तीन तोळे सोन्याचे लॉकेट,मोबाईल काढून घेण्यात आले व गाडीच्या […]

ताज्याघडामोडी

अनिल देशमुखांच्या वकील आनंद डागा यांना सीबीआयकडून अटक

  महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा यांना सीबीआयने मुंबईत अटक केली. पुढील चौकशीसाठी त्यांना दिल्लीला आणले जाईल. अनिल देशमुख यांच्याविरोधात सुरु असलेला तपास पोलीस उपनिरीक्षकाच्या माध्यमातून परिणाम करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली डागा यांना अटक करण्यात आली आहे. सीबीआयचे उपनिरीक्षक अभिषेक तिवारी यांनाही काल रात्री अटक करण्यात आली होती. सीबीआयने दिल्ली आणि […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

गरीब विद्यार्थाना नामवंत शाळेत आरटीई खाली प्रवेश देण्यासाठी ५० हजार लाचेची मागणी

गरीब घरातील मुलांना परिसरातील नामवंत खाजगी शाळेत प्रवेश घेता यावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने आरटीई कायदा २०१२ मध्ये आणला खरा पण अनेक वेळा अशा बड्या संस्थाचालकांच्या नामवंत शाळेत प्रवेश घेण्यासाठी आरटीई अंतर्गत पात्र ठरणाऱ्या गरीब कुटूंबातील विद्यार्थाना प्रवेश नाकारण्यासाठी मोठ्या हिकमती अनेक संस्थाचालक वापरताना दिसून येतात.सध्या हि भरती प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली असली तरी अनेक […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

सोलापूर अन्न प्रशासनाकडून २२३० किलो चहा पावडर जप्त

दिनांक ३१/०८/२०२१ रोजी सोलापूर जिल्ह्यातील राहुती (कोंडी), ता. उत्तर सोलापूर येथे अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) श्री. प्रदिपकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी श्री. प्रशांत कुचेकर यांनी मे. के. जी. टी कंपनी, गट क्र. १५५, स. नं. ५५/२, प्लॉट क्र. ६, मु. राहुती, पो. कोंडी, ता. उत्तर सोलापूर, जि. […]

ताज्याघडामोडी

सर्वपक्षीय प्रतिनिधींच्या शिष्टमंडळासह संभाजीराजे घेणार राष्ट्रपतींची भेट

मराठा आरक्षणाचा प्रश्न गेले अनेक महिने राज्यात गाजत आहे. याच प्रश्नावरून राज्यातील खासदार गुरूवार २ सप्टेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली ही भेट होणार आहे.या भेटीसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रपतींकडे वेळ मागितली होती. तसंच महाराष्ट्रातील चारही प्रमुख पक्षांना त्यांचे प्रतिनिधी पाठवण्याचं आवाहन केलं होतं. […]

ताज्याघडामोडी

अनाथ विद्यार्थ्यांना देणार मोफत शिक्षण व शिष्यवृत्ती राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

अनाथ विद्यार्थ्यांना देणार मोफत शिक्षण व शिष्यवृत्ती राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम.., पंढरपूर प्रतिनिधी दि.01-  कोरोना काळात पंढरपूर तालुक्यातील अनेक कुटुंबातील सदस्यांना प्राण गमवावे लागले तर काही मुलांचे मातृ-पितृ छत्र हरवले अशा अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांना पालकत्व स्विकारण्यासाठी वसंतराव काळे शैक्षणिक संकुल पुढे सरसावले आहे.             राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब व खासदार सुप्रियाताई सुळे […]