लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काशीपीठाचे जगद्गुरु श्री श्री श्री १००८ डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. याप्रसंगी महास्वामीजींनी भारतीय जनता पक्षाच्या विजयासाठी आशीर्वाद दिले. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी […]
ताज्याघडामोडी
काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता देण्यासाठी महायुतीच्या पाठीशी राहण्याचे केले आवाहन काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात जनतेची फसवणूक केली. कायम जातीपातीचे राजकारण केले. त्यामुळेच २०१४ मध्ये जनतेने त्यांना सत्तेच्या बाहेर फेकले. त्यानंतर आलेल्या मोदी सरकारने अनेक विकासकामे केली. लोकांना विश्वासात घेऊन विविध योजना राबवल्या. या काळातील लोकांना […]
पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट
सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली मागील काही महिन्यात राज्यात भाजप ४५ प्लस चा नारा देत असल्याचे दिसून येत होते.यातूनच भाजप आणि महायुतीच्या घटक पक्षाचे नेते यांचा आत्मविश्वास देखील कमालीचा वाढला असल्याचे दिसून आले होते.मात्र आता राज्यात लोकसभा निवणुकीचा पहिला टप्पा पार पडत असतानाच सर्वसामान्य लोकात भाजप बाबत निर्माण झालेली नाराजी दूर करता करता […]
भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे
‘*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा’ भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही. जेव्हा जेव्हा यंत्रमाग कामगार अडचणीत येतात. तेव्हा त्यांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष ठामपणे उभा राहिला आहे. मागील १५ वर्षे पद्मशाली समाजाने विधानसभेसाठी पाठिंबा दिला आहे. यंदा लोकसभेच्या मोठ्या रणागंणातही आशीर्वाद असे आवाहन सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती […]
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैशाचा पाऊस! रोज १०० कोटी रुपये; आतापर्यंत ४,६५० कोटी रुपये जप्त
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १ मार्चपासून दररोज १०० कोटी रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती भारतीय निवडणूक आयोगाने दिली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यापासून आतापर्यंत अधिकाऱ्यांनी ४ हजार ६५० कोटी रुपये जप्त केले आहेत. यापूर्वी, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या एकूण जप्त रकमेपेक्षा ही अधिक रक्कम आहे, असेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे. ‘सार्वत्रिक निवडणुका २०२४ […]
भाजपच्या दोन्ही खासदारांनी सोलापुरला 25 वर्षे मागे नेले
मी सोलापूरची लेक या नात्याने संसदेत सोलापूरचा आवाज उठवणार-प्रणिती शिंदे सोलापुरच्या मागील दोन्ही भाजप खासदारांनी विकासकामे केली नाहीत. भाजप मुळे सोलापूर २५ वर्षे मागे गेले आहे तसेच सोलापूरच्या जनतेने पाठबळ दिल्यास मी सोलापूरची लेक या नात्याने संसदेत सोलापूरचा आवाज उठवणार. , अशी भूमिका सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आज सोलापूर लोकसभा मतदारसंघातून […]
सोलापूर करांसाठी पुण्यात काम करणाऱ्या सेवा संघाचा आ.राम सातपुते यांना पाठींबा
आ.राम सातपुते यांनी तरुणाईच्या प्रश्नासाठी केलेल्या कार्याची प्रशंसा सोलापुरातून पुण्यात गेलेल्या तरुणांना नोकरी व राहण्यासाठीची मदत करणाऱ्या सोलापूर जिल्हा सेवा संघाने गुरूवारी आमदार राम सातपुते यांना बिनशर्त पाठिंबा जाहिर केला. याबाबतचे पत्र अक्कलकोट दौऱ्यावर असलेल्या आमदार राम सातपुते यांना आळगे येथे देण्यात आले. यावेळी महेश बारसावडे यांनी पाठींबा जाहीर केला. याप्रसंगी अक्कलकोट विधानसभेचे आमदार सचिन […]
सोलापूर जिल्हा सेवा संघाचा आमदार राम सातपुते यांना बिनशर्त पाठिंबा
भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना वाढतोय पाठींबा सोलापूर : प्रतिनिधी सोलापुरातून पुण्यात गेलेल्या तरुणांना नोकरी व राहण्यासाठीची मदत करणाऱ्या सोलापूर जिल्हा सेवा संघाने गुरूवारी आमदार राम सातपुते यांना बिनशर्त पाठिंबा जाहिर केला. याबाबतचे पत्र अक्कलकोट दौऱ्यावर असलेल्या आमदार राम सातपुते यांना आळगे येथे देण्यात आले. यावेळी महेश बारसावडे यांनी पाठींबा जाहीर केला. […]
थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त आ. प्रणितीताई शिंदेंचे अभिवादन
सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने स्त्री शिक्षणाचे जनक थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे यांनी सोलापुरातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या की, महात्मा फुले हे एक लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते, थोर विचारवंत, समाजसुधारक […]
हिंदूंना आतंकवादी म्हणत केलेला अपमान हिंदू समाज विसरणार नाही
आमदार राम सातपुते यांची सुशीलकुमार शिंदे यांच्यावर सडकून टीका सोलापूर : प्रतिनिधी हिंदूंना आतंकवादी म्हणून हिंदू समाजाचा अपमान माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. हा अपमान हिंदू समाज विसरणार नाही, अशी सडकून टीका भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर केली. आमदार राम सातपुते यांनी गांधीनगरजवळील […]