Uncategorized

फॅबटेक अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजिन्स अँड डेटा सायन्स या नवीन शाखेस मान्यता

सध्याच्या जमान्यात व बदलत्या काळानुसार उद्योग क्षेत्रातील पुणे, मुंबई, नागपुर, बेंगलोर व नवी दिल्ली इ. सारख्या शहरात विद्यार्थ्यांनी  नवकल्पना आत्मसात केल्यास नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. या अद्यावत  क्षेत्राचा अभियांत्रिकीमध्येच समावेश  करणे ही स्पर्धात्मक क्षेत्राची निकड ओळखून फॅबटेक अभियांत्रिकी महाविद्यालय, सांगोला येथे बी.टेक. डिग्रीसाठी आर्टिफिशिअल इंटेलिजिन्स अँड डेटा  सायन्स शाखेस अखिल भारतीय तंत्रक्षण परिषद , नवी दिल्ली व डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल  युनिव्हर्सिटी, लोणेरे यांनी या शैक्षणिक वर्षापासून६० विद्यार्थ्यांच्या प्रवेश क्षमतेस ग्रामीण भागात प्रथमतच मान्यता दिल्याची माहिती, संस्थेचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर श्री. भाऊसाहेब रूपनर व प्राचार्य डॉ. रवींद्र शेंडगे  यांनी दिली आहे.     एआय असलेल्या स्मार्ट मशीन  मानवाप्रमाणे विचार करून निर्णय घेण्याची क्षमता असते. कृत्रिम बुध्दिमत्ता प्रणाली मशीन  लर्निगचा वापर मशीनला डेटामधून स्वयंचलितपणे कार्य करण्याची परवानगी देते. डेटा सायन्स हे माहिती तंत्रज्ञान व अप्लाइड सायन्स यांचा एकत्रित परिणाम म्हणता येईल, ज्यामुळे उद्योगांच्या दृष्टीकोनातून डेटा छाननी करणे त्याचे प्रारूप ठरवणे, विश्लेषण करणे आणि तो सादर करणे सुलभ होते.          आर्टिफिशिअल  इंटेलिजन्स अँड  डेटा सायन्स चा वापर दैनंदिन जीवनात:- उद्योग क्षेत्र:- रोबोटिक्स प्रोसेस ऑटोमशीन सारख्या अत्यंत पुनरावृत्तीय कार्य विचारात घेऊन एआय  प्रणाली वेगवान आणि सहजतेने कामगिरी करते व वेळ, ऊर्जा, श्रम यांची बचत होते. कृषी  क्षेत्र:- एआय  युक्त यंत्रे  वनस्पतीच्या पानांमधील किरकोळ बदलही टिपून शेतकऱ्यांना  पिकावर कोणता परिणाम होईल हे सांगू शकतात. शेतकऱ्यांनी कधी पेरणी करावी आणि कधी खत घालावे याची प्रक्रिया करणे डीप लर्निगच्या वापरामुळे मिळते. विमान वाहतूक:- जगभरातील विमानांची वाहतूक कॉम्प्युटरवर अवलंबून आहे. कोणते विमान कधी व कोणत्या मार्गाने जाईल हे माणूस ठरवू शकत नाही, हे सर्व यंत्रेच सांगतात.प्रवाशांचे  साहित्य विमानातून बाहेर आणण्यापर्यंतचे सर्व निर्देष अशा  आर्टिफिशिअल इंटेलिजन्स असलेल्या यंत्रांच्या सहाय्यानेच दिले जात असतात.  आरोग्य क्षेत्र:- आरोग्य विभागात मशीन लर्निग ही प्रणाली रूग्णांच्या वेगवान, स्वस्त आणि अचूक निदान करण्यासाठी परिणामक ठरत आहे. एक्सरे, टेम्परेचर व ऑक्सिजन  पाहून हे अँप  सामान्य न्यूमोनिया आणि कोव्हिड-19 मधील फरक सांगते, महाराष्ट्र   सरकारने याचा वापरही केला आहे. तसेच कोरोना काळात आंध्रप्रदेश आणि तेलंगणाच्या दुर्गम परिसरांमध्ये ड्रोनच्या सहाय्याने औषधे पोहोचवण्यात येत आहेत.            या उदाहरणांमधून कृत्रिम बुध्दिमत्ता अँड  विज्ञान हे कॉम्प्युटर सायन्सचे सर्वात आकर्षक  व काळाची गरज आणि वेगाने वाढणारे क्षेत्र असल्याचे दिसेल. फॅबटेक अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स अँड  इंजिनिअरिंग, इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग व मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शाखा पूर्वीपासूनच आहेत.   एआय अँड डेटा सायन्स ही अभियांत्रिकीची शाखा  पुणे, मुंबई, औरंगाबाद व बारामती इ. शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये मागील वर्षापासून सुरू आहे. परंतु आता या शाखेस सोलापूर जिल्हयामध्ये प्रथमतः फॅबटेक अभियांत्रिकी महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून परवानगी मिळाली आहे. याशाखेचा अभ्यासक्रम पुर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वच क्षेत्रात आता सद्यस्थितीत व भविष्यात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. या शाखेच्या अधिक माहितीसाठी व प्रवेशासाठी या शाखेचे विभागप्रमुख प्रा. डॉ. तानाजी धायगुडे यांच्याशी संपर्क साधावा.  (मो.नं. 9975497130, 9422321512) वेबसाईट –www.fabtecheducation.com

Uncategorized

सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना पहिला मोठा दिलासा

जुलै महिन्यात झालेली अतिवृष्टी आणि महापुरामुळे सांगली जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सध्या महसूल विभागाकडून सुरू आहे. जिल्ह्यात महापुरामुळे बाधित झालेल्या ११३ गावांमधील १६ हजार ८७९ कुटुंबांचे पंचनामे आतापर्यंत पूर्ण झाले आहेत. त्याचबरोबर, तातडीची मदत म्हणून लवकरच पूरग्रस्त कुटुंबांच्या बँक खात्यात दहा हजार रुपयांची रक्कम जमा करण्यास सुरुवात होणार आहे.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी […]

Uncategorized

डीव्हीपी ग्रुपचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध विधायक उपक्रमांचे आयोजन

पंढरपुरातील प्रसिद्ध डीव्हीपी उद्योग समूहाचे चेअरमन,धाराशिव साखर कारखाना युनिट १,२,३ चे चेअरमन अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर शहर व तालुक्यात ठिकठिकाणी भव्य रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबीर, अन्नदान, गरजू लोकांना किराणा कीट वाटप, वृक्षारोपण, कोवीड योद्धाचा सन्मान आदी अनेक विधायक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.तर सांगली,कोल्हापूर भागात पूरग्रस्त नागिरकांसाठी जीवनावश्यक मदत पाठविण्यात येणार आहे.        […]

Uncategorized

पंढरपूर तालुक्यात शिवसंपर्क अभियानाचा भोसे येथून शुभारंभ

शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून तसेच सोलापूर जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख आ.तानाजी सावंत,जिल्हा समन्वयक प्रा.शिवाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पंढरपुर विभागात शिवसंपर्क अभियान राबिवण्यास सुरुवात झाली पंढरपूर तालुक्यात आज भोसे येथील यशवंत सभागृह येथे करण्यात आला.               यावेळी या जिल्हा […]

Uncategorized

भोसे माणिक मळा येथील शेतकऱ्याने केली द्राक्षाच्या बागेत गांजाची लागवड

शेतकरी हा साऱ्या जगाचा पोशिंदा समजला जातो.कोरोनाच्या संकटात भारतीय अर्थव्यवस्थेला बळ दिले ते केवळ शेतकऱ्यांनी.शेती हा निर्सगाच्या लहरीवर विसंबून असलेला रोजगार.आणि रोजगार हा शब्द प्रयोग करण्याचे प्रयोजन म्हणजे त्याने पिकवलेल्या मालाचा दरच तो ठरवू शकत नाही.पण तरीही काही शेतकरी शेतात राब राब राबून विक्रमी उत्पादन घेतात,बाजार पेठेच्या अभ्यास करून माल विक्रीस नेतात आणि मोठा आर्थिक […]

Uncategorized

पंढरपूर तालुका कृषी सहायक संघटनेचे अध्यक्ष पदी गोपाळ कृष्णा घाडगे यांची बिनविरोध निवड

पंढरपूर तालुका कृषी सहायक संघटनेचे अध्यक्ष पदी गोपाळ कृष्णा घाडगे व सचिव पदी धनराज खोत तर कार्याध्यक्षपदी श्री किरण चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली या निवडीवेळी नूतन अध्यक्ष गोपाळ घाडगे यांनी आपण कृषी सहायकांच्या अडीअडचणी त्यांच्या निगडित असणारे प्रश्न तसेच संघटना बळकटीकरण करण्याचे काम करणार असल्याचे अध्यक्ष गोपाळ घाडगे यांनी यावेळी सांगितले महाराष्ट्र राज्य कृषी […]

Uncategorized

पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे, शेतकऱ्यांनी नुकसानीची सूचना विमा कंपन्यांना द्यावी

यंदा जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. खरीप हंगाम 2021 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी पावसामुळे किंवा अन्य बाबींमुळे होणाऱ्या पीक नुकसानीची माहिती 72 तासामध्ये विमा कंपन्यांना द्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्ती (Localized Calamities) या जोखमीच्या बाबीअंतर्गत गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र […]

Uncategorized

उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ

श्री पांडुरंग शिक्षण प्रसारक मंडळ पंढरपूर संचलित उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालय पंढरपूर येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या एम ए. शिक्षणशास्त्र आणि शालेय व्यवस्थापन पदविका ( डी. एस. एम)  या अभ्यासक्रमाची 2021 ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. सदर अभ्यासक्रम दुरुस्थ शिक्षण प्रक्रियेच्या माध्यमातून राबविले जातात त्यासाठी ऑनलाईन प्रवेशासाठी https://ycmou.digitaluniversity.ac/   ही वेबसाईट उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. […]

Uncategorized

निर्बीजीकरणासाठी नगर पालिकेची १० लाख खर्च करण्याची तयारी

पंढरपूर शहरातील रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी वावरताना जागोजागी मोकाट गाईगुरांचे कळप आणि भटक्या कुत्र्यांचे टोळके हि नित्याची बाब ठरली आहे.पंढरपूर शहरातील अनेक गर्दीचे प्रमुख रस्ते,चौक आदी ठिकाणी जसे गुरांचे कळप हक्काने ठिय्या मांडून बसलेले दिसतात तसेच भटक्या  कुत्र्यांचे कळपही हिंडताना दिसून येतात.याचा नागिरकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याने नगर पालिकेकडून वेळोवेळी मोकाट जनावरे पकडण्यासाठी […]

Uncategorized

आषाढी एकादशी सोहळ्यात विठ्ठल मंदिरात प्रवेश करण्यास परवानगी नाहीच !

महाराष्ट्र शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढपुरातील आषाढी यात्रा सोहळ्यावर अनेक निर्बंध लादले आहेत.देहू आळंदी आदी ठिकाणाहून पंढपुरकडे एकादशी सोहळ्यासाठी प्रस्थान करणाऱ्या मनाच्या प्रमुख १० दिंडी सोहळ्यांना ४० भाविकांसह पंढरपूरकडे पायी दिंडी नेण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात येत होती.या मागणीसाठी प्रशासन आणि दिंडी चालक यांच्यात अनेकवेळा बैठक झाली पण प्रशासन माघार घेण्यास तयार नव्हते.तर वारकरी संप्रदायाचे अर्ध्वयू हभप […]