Uncategorized

उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ

श्री पांडुरंग शिक्षण प्रसारक मंडळ पंढरपूर संचलित उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालय पंढरपूर येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या एम ए. शिक्षणशास्त्र आणि शालेय व्यवस्थापन पदविका ( डी. एस. एम)  या अभ्यासक्रमाची 2021 ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. सदर अभ्यासक्रम दुरुस्थ शिक्षण प्रक्रियेच्या माध्यमातून राबविले जातात त्यासाठी ऑनलाईन प्रवेशासाठी https://ycmou.digitaluniversity.ac/   ही वेबसाईट उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
     सदर अभ्यासक्रमातील एम ए. शिक्षण शास्त्र अभ्यासक्रम एम. एड. या अभ्यासक्रमासाठी समकक्ष असून वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी ग्राह्य धरला जातो आणि शालेय व्यवस्थापन पदविका हा अभ्यासक्रम मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक यांच्यासाठी अनिवार्य करण्यात आलेला आहे यासाठी उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या वतीने या अभ्यासक्रमाच्या संदर्भात आवश्यक ती सर्व सविस्तर माहिती व मार्गदर्शन महाविद्यालयात उपलब्ध करून दिले जात आहे. एम ए. शिक्षणशास्त्र आणि शालेय व्यवस्थापन पदविका या अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत  31 जुलै 2021 आहे. आपला प्रवेश गुणवत्तापूर्ण व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या महाविद्यालयात करण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, पर्यवेक्षक आणि मुख्याध्यापकांनी तात्काळ महाविद्यालयाशी संपर्क साधावा असे आव्हान उमा शिक्षण संकुलाचे कार्यवाह, प्राचार्य डॉ. मिलिंद परिचारक सर, संकुलाचे जनसंपर्क अधिकारी श्री.  सूर्यकांत पारखे सर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विद्युलता पांढरे व प्रवेश समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *