Uncategorized

पंढरपूरावर लादलेल्या ”अशा” कोट्यावधीच्या ”विकासाला” विरोध झाला पाहिजे !

          भूवैकुंठ गणल्या गेलेल्या,गोरगरीब भक्तांच्या लाडक्या विठुरायाच्या नगरीचा सर्वतोपरी विकास झाला पाहिजे यासाठी शासनकर्ते कुणीही असोत कधी हात आखडता घेतला गेला नाही.या शहराच्या विकासासाठी अक्षरशः अब्जावधी रुपयांचे विकास आराखडे तयार करण्यात आले आणि त्या प्रमाणात निधीही उपलब्ध होत गेला.           या निधीतून शहराचा चेहरा मोहरा बदलला जावा […]

Uncategorized

समस्त महादेव कोळी समाजाच्या वतीने नूतन न.पा.सभापती व बिनविरोध विजयी ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार 

                समस्त महादेव कोळी समाजाच्या वतीने दिनदयाळ मंदिर येथील कार्यालयात पंढरपूर नगरपालिकेच्या बिनविरोध निवडलेले बांधकाम समिती सभापती श्री सुरेश नेहतराव, व आरोग्य समिती सभापती विक्रम शिरसट तसेच पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत बिनविरोध सदस्य झालेल्या संजयआप्पा अभंगराव(वाखरी) किरण साळुंखे, सौ रंजना शिंदे (अरण), सौ वैजयंती अधटराव व सौ कविता […]

Uncategorized

पंढरपूर न.पा.समिती सभापतींच्या निवडी जाहीर 

पंढरपूर नगर परिषदेच्या विविध समितीच्या मुदत संपल्याने आज नगरपालिकेच्या सभागृहांमध्ये पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्या अधिपत्याखाली विविध समितीच्या सभापतींची निवड व समिती सदस्यांची निवड करण्यात आली.        यावेळी भाजप,पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडी गटनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर व तीर्थक्षेत्र विकास आघाडी व काँग्रेस चे गटनेते सुधीर धोत्रे,सुरेश नेहतराव यांनी समितीच्या […]

Uncategorized

ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेची वाखरीतून बिनविरोधी सलामी

          राज्याबरोबरबच पंढरपूर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मोठी चुरस पहावयास मिळत असतानाच पंढरपूर तालुक्यात गावपातळीवरील आघाडीच्या माध्यमातून निवडणूका लढल्या जात आहेत.यात शिवसेनेचे अनेक उमेदवार मैदानात उतरवले असून समविचारी आघाडीसोबत हे उमेदवार निवडणूक लढवीत आहेत अशी माहिती शिवसेनेचे तालुका प्रमुख महावीर देशमुख यांनी दिली.वाखरी येथे शिवसेनेचे संजय अभंगराव व सर्जेराव पांढरे हे दोन […]

Uncategorized

मेंबर थोडं थांबा, वर्षासाठी नको,वर्षभर थांबून पाच वर्षासाठी मेंबर व्हा !

छोटया वार्ड रचनेच्या शक्यतेने स्वीकृतसाठी यंदा रस्सीखेच कमीच                  २०११ मध्ये झालेल्या पंढरपूर नगर पालिका निवडणुकीचा अपवाद वगळता गेल्या वीस वर्षांपासून पंढरपूर नगरपालिकेवर परिचारक गटाची हुकुमी बहुमताने सत्ता राहिली आहे.पंढरपूर शहरात परिचारक गटाचे मोठे प्राबल्य असल्याने नगरसेवक म्हणून नगर पालिकेत प्रवेश करण्यासाठी परिचारकांचा वरदहस्त लाभावा,परिचारक गटाकडून उमेदवारी मिळावी यासाठी कायम […]

Uncategorized

अभिजित पाटील यांच्या लाखाच्या बक्षिसाची जैनवाडी ठरली मानकरी 

            पंढरपूर तालुक्यातील जैनवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक आज निवडणूक अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर बिनविरोध झाल्याने धाराशिव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी जाहीर केलेले ज १ लाखाचे बक्षिस पटकाविले आहे.जैनवाडी ग्रामपंचायत बिनविरोध नऊ नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा अभिजित पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला असून जैनवाडी गावाच्या एकोप्यासाठी निवडणूक बिनविरोध […]

Uncategorized

पुण्याचे नाव बदलून संभाजीनगर करा -ऍड. प्रकाश आंबेडकर 

             पुणे जिल्ह्याचं नामकरण संभाजीनगर करण्याची मागणी आंबेडकर यांनी केली आहे.संभाजी महाराज आणि पुण्याचं नातं आहे.औरंगाबाद आणि संभाजी महाराज यांचा थेट असा फारसा संबंध नाही.पुणे जिल्ह्यात संभाजी महाराजांवर अंत्यसंस्कार झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील वडूज गावात त्यांची समाधी आहे. त्यामुळे संभाजी महाराजांचं स्मरण राहावं, असं वाटत असेल तर पुण्याचे नाव बदलून […]

Uncategorized

धाराशिव साखर कारखाना युनिट१ उस्मानाबादच्या २ लाख ११ हजार १११ व्या साखर पोत्याचे पुजन  

धाराशिव साखर साखर कारखाना लि. युनिट१ चोराखळी, उस्मानाबादच्या कारखान्याच्या ८व्या गळीत हंगामातील २ लाख ११ हजार १११ व्या साखर पोत्याचे पूजन शेतकऱ्यांच्या मुलांच्या हस्ते व सर्व संचालकांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. ऊस कारखान्यास आल्यास गव्हाणीपासून ते साखर निर्मिती पर्यंत सगळी प्रकिया शेतकऱ्यांच्या मुलांना दाखवली. जो शेतकरी तळहाताच्या फोडाप्रमाणे आपला ऊस जपून कारखाना जगवतो, त्या शेतकऱ्यांच्या […]

Uncategorized

देशासाठी आनंदाची बातमी

           पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया उत्पादित करत असलेल्या अणि ऑक्‍सफर्ड विद्यापीठ-ऍस्ट्राझेन्का यांनी विकसित केलेल्या लसीच्या आपत्कालीन वापराला औषध नियामकांच्या विषय तज्ज्ञ समितीने शुक्रवारी मान्यता दिली. त्यामुळे या लसीकरणाच्या देशव्यापी मोहीमेला लवकरच सुरवात होण्याची आशा आहे.            सीरमने दिलेल्या महितीनुसार कोविशिल्डचे पाच कोटी डोसचा साठा सध्या तयार […]

Uncategorized

पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवरील कारवाईमुळे हद्दीतील अनेक गावात अघोषित ”ड्राय डे” 

            ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्री करणाऱ्यांबरोबरच दारू पिऊन वाहन चालिवणाऱ्यावर देखील अनेक ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे.या कारवाई मुळे काल ३१ डिसेंबर रोजी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याअंर्गत असलेल्या अनेक गावात अघोषित ”ड्राय डे” असल्याचे चित्र पहावयास मिळाले.तर अनेक ठिकाणी दारू पिऊन वाहन चालिवण्याऱ्यावर […]