ताज्याघडामोडी

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्त्यांच्या दर्जोन्नतीसाठी ५६ कोटींचा निधी मंजूर – आ समाधान आवताडे

मंगळवेढा (प्रतिनिधी)- पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील खराब रस्त्यांसाठीच्या कामासाठी एकूण ५६ कोटी रुपये एवढ्या निधीला मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातून प्रशासकीय मान्यता मिळाली असून हे खराब झालेले रस्ते दर्जोन्नती होऊन दळणवळणास अधिक चांगले रस्ते उपलब्ध होणार असल्याची माहिती मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे.

मंजूर झालेले रस्ते आणि मिळालेला निधी पुढीलप्रमाणे – मंगळवेढा ते दामाजी कारखाना या आठ किलोमीटर रस्त्यासाठी १३ कोटी ८१ लाख रुपये, अरळी ते नंदूर या पाच किलोमीटर रस्त्यासाठी ९ कोटी ८० लाख रुपये, भोसे ते वाघमोडेवाडी या तीन किलोमीटर रस्त्यासाठी ५ कोटी ६३ लाख रुपये, भाळवणी ते जित्ती या सहा किलोमीटर रस्त्यासाठी ८ कोटी ६६ लाख रुपये, महमदाबाद (शे) ते आंधळगाव या सात रस्त्यासाठी किलोमीटर १० कोटी ६५ लाख रुपये तसेच पंढरपूर तालुक्यातील कासेगाव ते तावशी या पाच किलोमीटर रस्त्यासाठी ७ कोटी ७१ लाख रुपये अशा एकूण ६ रस्त्यांसाठी ५६ कोटी रुपये एवढ्या निधीसाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

मतदारसंघातील अनेक रस्त्यांच्या दुरावस्थेच्या पार्श्वभूमीवर ते रस्ते दुरुस्त करण्यासाठी आमदार समाधान आवताडे हे सतत प्रयत्नशील असून यापूर्वीही त्यांनी तालुक्यातील रस्ते विकास व दुरुस्तीच्या कामासाठी केंद्र सरकार व महाराष्ट्र राज्य शासनाकडून विविध योजनेअंतर्गत कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून घेतला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून महायुतीचे सरकार आल्यापासून रस्ते व इतर विकास कामांसाठी आमदार आवताडे यांच्या माध्यमातून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास निधी उपलब्ध झालेला आहे. सदर निधीच्या तरतुदीमुळे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण रस्ते हे सिमेंट काँक्रीटचे बनणार असून यामुळे ग्रामीण भागातील दैनंदिन दळणवळण सुविधा आणखी गतिमान आणि व सुलभ होण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

सदरील कामे मंजूर करण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, पालकमंत्री ना.चंद्रकांत दादा पाटील, ग्रामविकास मंत्री ना.गिरीष महाजन व इतर संबंधित विभागाशी सतत पत्रव्यवहार करून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. वरील सर्व नियोजित रस्ते विकास कामांसाठी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये निधी मंजूर झाल्याने आमदार आवताडे यांनी राज्य सरकारचे मतदारसंघाच्या वतीने व नागरिकांच्या वतीने जाहीर आभार व्यक्त केले आहेत.

कोट– खराब झालेल्या रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांचे प्रयत्नांतून ग्रामीण भागातील जनतेच्या दळणवळण सुविधेचा विचार करून पायाभूत सुविधांमध्ये वाढ होण्यासाठी हा निधी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. या निधीतून नियोजित असणाऱ्या रस्ते विकास कामांमुळे सतत या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मतदारसंघातील अनेक विकासात्मक बाबींवर भरीव निधी खेचून आणणारे आ आवताडे यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रस्ते आता चकाचक होतील – रमेश भांजे- माजी उपसभापती पं.स,मंगळवेढा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *