भाजपचे माजी उपजिल्हाध्यक्ष शिरीष कटेकर यांनी काल भाजपच्या वतीने करण्यात आलेल्या टाळे ठोको आंदोलनात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह टीका केल्याचा शिवसेना पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे.त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी शिरीष कटेकर यांना काळं फासलं आणि साडी नेसवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत पुढील प्रकार टाळला. या घटनेमुळे पंढरपूर शहरात काही काळ तणावाचं वातावरण […]
Tag: #BJP
पंढरपूर शहर तालुक्यात भाजपाला येणार ”अधिकृत अच्छे दिन”
पंढरपूर तालुक्याच्या राजकरणात भाजपाच्या वाटचालीचा इतिहास उलगडुन पाहिला तर भाजपचे अस्तित्व हे निवडणुकीच्या राजकरणात जरी गेल्या तीस वर्षाच्या वाटचालीत नगण्य ठरले असले तरी पंढरपूर शहराच्या राजकरणात भाजपा आणि त्याचे पदाधिकारी हे कायम आक्रमक राहिल्याने या पक्षाचा दबदबा होता असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकरणात जरी देशव्यापी व राज्यव्यापी विविध पक्ष कार्यरत असले […]
भाजपच्या प्रदेश प्रवक्त्यावर जीवघेणा हल्ला!
मुंगेर, 27 जानेवारी: शेतकरी आंदोलनामुळे कालपासून देश पेटलेला असताना, अशातच भारतीय जनता पक्षाच्या एका बड्या नेत्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. ही घटना मुंगेरच्या इव्हनिंग कॉलेजजवळ घडली आहे. मारेकऱ्यांनी भाजपचा अल्पसंख्याकाचा चेहरा आणि प्रदेश प्रवक्ता असणाऱ्या अजफर शमशी यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात अजफर शमशी गंभीर जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात […]
अखेर जिल्ह्यातील भाजपचा तो बडा नेता निलंबित
सोलपूर : उपायुक्तांना शिवीगाळ आणि खंडणी मागितल्याप्रकरणी सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना गेल्या आठवड्यात अटक करण्यात आलेली. त्यानंतर राजेश काळे यांची आज (13 जानेवारी) भाजपातून हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजपचे शहर सरचिटणीस शशी थोरात यांनी याबाबत घोषणा केली. राजेश काळे यांच्यावर महापालिका उपायुक्त धनराज पांडे यांना र्वाच्य भाषेत शिवीगाळ करून खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात […]
शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन घडवला चमत्कार
भिवंडी तालुक्यातील 56 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असताना वळ, अलिमघर आणि निवळी या तीन ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली असून आश्चर्यकारक बाब म्हणजे यासाठी शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे. सध्या राज्यात शिवसेना आणि भाजपा कट्टर वैरी झाले असून रोजच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू असतात. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते विरोधात असतानाही वळ आणि अलिमघर गावात शिवसेना आणि भाजपाच्या […]
पंढरपूर शहरासह उपनगरातील छोट्या व्यावसायिकांचे नुकसान करणाऱ्या मुख्याधिकारी यांची खातेनिहाय चौकशी करण्याची भाजपाची मागणी
पंढरपूर – पंढरपूर शहरातील नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर साहेब यांनी पंढरपूर शहर व उपनगरातील अनेक छोट्या व्यावसायिकांना कोणत्याही प्रकारची पुर्वसूचना न देता अचानकपणे जेसीबीच्या सहाय्याने अनेकांच्या व्यावसायाचे प्रचंड प्रमाणात नुकसान केले असून त्यामुळे त्यांच्या कारवाईबद्दल अनेकांतून नाराजीचा सूर ऐकावयास मिळत आहे. मुख्याधिकारी मानोरकर यांनी केवळ उसने आवसान आणून हातावरचे पोट असणाऱ्यांना उघड्यावर आणलेले आहे. आपलं […]