

राज्यात पुन्हा कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने राज्य शासन अलर्ट झाले असून आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनावर मोठी जबाबदारी आली आहे.सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काल शनिवार आणि रविवार हे दोन दिवस अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.तर सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी सात ते सायंकाळी सात पर्यंतच दुकाने उघडे ठेवता येणार आहेत.हॉटेल ,बार परमिटरूम चालकांनी पन्नास टक्के क्षमेतनेच ग्राहकांना प्रवेश दयावा असे आदेश दिले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाची अमलबजावणी होते कि नाही याची तपासणी करण्यासाठी पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी सहारा बार परमिटरूम येथे गेले असता तेथे लोकांची गर्दी दिसली तसेच तापमापक मशिनचा वापर करीत नसल्याचे दिसुन आले.या प्रकरणी बार मालक लक्ष्मण संभाजी बागल वय-55वर्षे,रा-गादेगाव,ता-पंढरपूर यांच्या विरोधात भादवि क.188,269 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.