ताज्याघडामोडी

पंढरपूर कॉग्रेस कार्यकर्त्याला कोणीच वाली राहिला नाही का ? निवेदने बघितल्यानंतरच येत आहे का जाग नेत्याना ?

पंढरपूर : स्व.आमदार भारत नाना भालके यांच्या अकस्मित निधनानंतर पंढरपूर मंगळवेढ्या मध्ये पोटनिवडणुक जाहीर झाली. परंतु जेव्हा कै.भारत नाना भालके यांचे दुर्देवी निधन झाले. त्याच वेळेच ही पोटनिवडणूक लगणार हे सत्य सर्व नेते मंडळी तसेच नागरीकाना समजलेले. या नंतर सर्व पक्ष म्हणजे बिजेपी,शिवसेना राष्ट्रवादी हे पोटनिवडणूकीच्या तयारी ला अत्यंत जोमाने लागले. अनेक ठिकाणी ज्या त्या वार्ड मध्ये निरनिराळ्या कार्यकर्त्याकडून व नेत्याकडून विविध मिटींग घेऊन मतदारराजा ला भाळण्याचा प्रयत्न गेले कितेक दिवस चालु आहे. पण या सर्व हलचाली मध्ये राष्ट्रिय पक्ष असणारा क्रॉग्रेस हा कोठेच दिसत नव्हता कोणत्याही क्रॉग्रेस च्या नेत्याची कार्यकत्याबरोबर ची उघड मिटींग कोढेच दिसली किंवा ऐकीव नाही. ज्या वेळेस द.बडवे यांनी पक्ष श्रेष्टी शी केलेल्या पत्र व्यवहार केला तसेच मिडीयाशि संपर्क साधुन क्रॉग्रेस च नेमके काय चालु आहे आशी विचारणा जानेवरी महिन्यात केली त्या वेळेस काही नेत्याना चक्क मार्च महिन्यात जाग आली व थोड्या फार प्रमाणा मध्ये मिंटीग दिसावयास लागल्या
      तसेच या येत्या पोटनिवडणुकी मध्ये जागा कोण घेणार यासाठी घमासान छेडले गेले आहे. राष्ट्रवादी पक्षा मध्ये जागा कुणाला द्यावयाची या बद्दल खुप मोठा सभ्रम निमार्र्ण झाला आहे. जागा एक आहे तर इच्छुक उमेदवारांची अक्षरशा रांग लागली आहे. अशा वेळेस राष्ट्रवादी मध्ये फुट नको म्हणुन जागा ही क्रॉग्रेस पक्षाला सोडावी अशी मागणी जेव्हा द.बडवे यांनी लावुन धरली त्या वेळेस मात्र नेत्याना जाग आली असे वाटते मग तेथुन महिला नेत्या व जिल्हा युवक क्रॉग्रेस अध्यक्ष, माजी दोन जिल्हा अध्यक्ष तिकीट मागणीस सुरवात केली. या नंतर मात्र ज्यानी तिकीटा साठी मागणी केली आहे आशे नेते कार्यकत्याबरोबर मिटींग घेऊ लागले. पण प्रदेश क्रॉग्रेस किंवा जिल्हा क्रॉग्रेस असो किंवा तालुका क्रॉग्रेस यांनी कोणतीही मिंटीग घेतली नाही किंवा तशी काही वाच्यता ही केली नाही.
आता तरी सर्व क्रॉग्रेस कार्यकर्ते ची जिल्हा किंवा तालुका स्तरावर मिंटीग घ्यावी व त्याचा सभ्रम व त्याचे प्रश्‍न यांची उत्तरे क्रॉग्रेस पक्षानी द्यावी ही विनंती मा.श्री.द.बडवे यांनी केली.
      क्रॉग्रेस सारखा राष्ट्रीय पक्ष एक एक आमदाराचे महत्व जाननारा पक्ष आहे. मग अशा वेळेस पोटनिवडणुक लढवून आपल्या हातात पंढरपूर चे सिटघ्यावे असे का नाही वाटले ? मग क्रॉग्रेस नेत्याना फक्त निवेदने बघितले की जाग येती का… स्वत: हुन आपल्या पक्षासाठी काही तरी करावे असे वाटणारे नेते क्रॉग्रेस मध्ये राहिले नाहीत का काय ? क्रॉग्रेस चा खरा कार्यकर्त्याला आज कोणी वाली नाही का ? असे अनेक प्रश्‍न आज माझ्या मनात येतात असे द.बडवे यांनी पत्रकारांना बोलताना सांगीतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *