Uncategorized

शेतकऱ्यांनी सावकारी कर्ज काढून महावितरणचा खजिना भरायचा का ?

शेतकऱ्यांची आणि घरगुती वीज तोडणी त्वरित थांबवावी तोडलेली वीज कनेक्शन ताबडतोब जोडावी . यासाठी आज करकंब येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीपबापू धोत्रे यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

मार्च महिनाच्या निमित्ताने सध्या महावितरणकडून मोठ्या प्रमाणावर सामान्य नागरिकांची वीज तोडणी होत आहे. एकीकडे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा तोंडावर येत असताना. दुसरीकडे वीज नसेल तर ई-लर्निंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करायचा ? असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांना भेडसावत आहे. तसेच अनेक कारखान्यांनी उसाच्या बिलाच्या रकमाही शेतकरी सभासदांना अद्याप दिल्या नाहीत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी सावकारी कर्ज काढून महावितरणचा खजिना भरायचा का ? असा सवाल यानिमित्ताने मनसेचे धोत्रे यांनी उपस्थित करत. वीज तोडणीच्या निमित्ताने राज्य सरकारवर हल्लाबोल चढवला.

राज्यातील सरकार मोठ्या प्रमाणावर वसुलीच्या गैरव्यवहारात अडकल्याचे आरोप होत आहेत. असे असताना विज बिलापोटीचा पैसा महवितरण जमा करुन घेत आहेत. आणि वरिष्ठ अधिकारी वसुलीत अडकले आहेत. त्यामुळे वसुली सरकारने शेतकऱ्यांची वीज तोडणी तात्काळ थांबून वीज बिले माफ करावीत. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिलीप धोत्रे यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *