ताज्याघडामोडी

गावभर बायकोचे पोस्टर लावणाऱ्या विकृत पतीविरोधात गुन्हा दाखल 

संताप आणि विकृती माणसाला किती खालच्या पातळीवर नेऊ शकते, याचे धक्कादायक उदाहरण चिखली तालुक्यातील अंचरवाडी येथे घडलं आहे. पत्नी घटस्फोट देत नसल्याने एका विकृत नवऱ्याने सार्वजनिक ठिकाणी तिचे पोस्टर्स लावल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. बुलडाण्यातील चिखली तालुक्यात ही घटना घडली आहे. समाधान निकाळजे असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे.

गेल्यावर्षी 30 जूनला समाधान याचा विवाह अंचरवाडी येथील एका मुलीशी विवाह झाला. पण तो त्याच्या पत्नीवर सतत संशय घेत होता. त्यावरुन तो बायकोला सतत शाररिक आणि मानसिक त्रास देत होता. त्यामुळे त्याची पत्नी दिवाळीच्या दरम्यान माहेरी निघून गेली. त्यानंतर समाधान निकाळजेने घटस्फोट मिळावा, यासाठी स्वतःच्या बायकोचे फोटोचे पोस्टर बनवून सार्वजनिक ठिकाणी लावले.

या पोस्टर्सवर ‘गरज पडल्यास संपर्क साधा’ असं लिहिले आहे. त्यावर काही मोबाईल नंबरही दिले आहेत. याबद्दल विवाहितेच्या भावाने त्याला जाब विचारला. जोपर्यंत घटस्फोट मिळत नाही तोपर्यंत एसटी, बस ,रेल्वे स्टेशन, सगळीकडे फोटो लावून बदनामी करेन, अशी धमकी दिली आहे.

विशेष म्हणजे या विकृत व्यक्तीने जर घटस्फोट दिला नाही, तर पत्नीच्या बहिणीचे आणि सासूचे ही पोस्टर्स लावून त्यांची बदनामी करेन, अशी धमकी त्याने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *