ताज्याघडामोडी

भाजपाच्या 24 नेत्यांना केंद्र सरकारकडून VIP सुरक्षा; ‘या’ नेत्यांचा समावेश

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाच राज्यांमध्ये कडोकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच, निवडणुकीतील धोका लक्षात घेता केंद्र सरकारने जवळपास 24 भाजपा नेत्यांना व्हीआयपी सुरक्षा पुरवली आहे.

हे नेते पंजाब आणि उत्तर प्रदेशातील आहेत. आता त्यांच्या सुरक्षेत सीआरपीएफ (CRPF) आणि सीआयएसएफचे (CISF) जवान तैनात करण्यात आले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या नेत्यांना निवडणुकीपर्यंत ही सुरक्षा देण्यात आली आहे. निवडणुकीनंतर त्यांच्या सुरक्षेचा पुन्हा आढावा घेतला जाईल. सुखविंदर सिंग बिंद्रा, परमिंदर सिंग धिंडसा, अवतार सिंग झिरा, निमिषा टी मेहता, सरदार दीदार सिंग भाटी, सरदार कंवर वीर सिंग तोहरा, सरदार गुरप्रीत सिंग भाटी आणि सरदार हरियत कमल हे व्हीआयपी सुरक्षा मिळालेल्या नेत्यांमध्ये प्रमुख आहेत.

दरम्यान, गोवा, मणिपुर, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये आगामी काळात विधानसभा निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाच राज्यांमध्ये कडोकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच, काही नेत्यांना व्हीआयपी सुरक्षा पुरवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *