गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पैशांसाठी नगरसेविकेच्या मुलाला मारण्याची धमकी

पुणे -‘राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविकेच्या मुलाला जीवे मारण्यासाठी सहा लाखांची सुपारी मिळाली आहे. जर 40 हजार रुपये दिले नाहीत, तर तुला ठार मारू’ अशी धमकी देऊन खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या सराईताला पोलिसांनी कर्जतमध्ये जाऊन अटक केली. सचिन मारुती शिंदे (वय 32, रा. कर्जत, रायगड, मूळ-तरडगाव-फलटण) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

याप्रकरणी युवराज लोणकर यांनी तक्रार दिली आहे. तो नगरसेविका नंदा लोणकर यांचा मुलगा आहे. युवराज यांना काही दिवसांपूर्वी आरोपीने फोन केला. ‘पुण्यातील एका गुंडाने तुला मारण्यासाठी सुपारी दिली आहे. तू जर मला 40 हजार रुपये दिले नाही, तर मी तुला ठार मारेल, अशी धमकी युवराजला दिली होती.

पोलिसांनी केलेल्या तांत्रिक विश्‍लेषणानुसार आरोपी कर्जतमध्ये असल्याचे समजले. त्यानुसार पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांच्या पथकाने सापळा रचून आरोपी सचिनला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने पैशांची चणचण भासल्यामुळे युवराज लोणकर यांना फोन करून खंडणीची मागणी केल्याची कबुली दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *