ताज्याघडामोडी

पंढरपूरात मराठी भाषा दिवस उत्साहात साजरा  

पंढरपूरात मराठी भाषा दिवस उत्साहात साजरा

 

  पंढरपूर, दि. 27 :- वि.वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा कदण्यात येतो. पंढरपूर येथील बसस्थानकावर आगारा मार्फत मराठी भाषा दिवस साजरा करण्यात आला.

             यावेळी परिवहन महामंडळाचे आगार व्यव्स्थापक सुधीर सुतार, स्थापत्य अभियंता स्वामी, सह. व्यवस्थापक श्री.घोलप, ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष दिनेश खंडेलवाल यांच्यासह बसस्थानकातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.   

विद्यार्थ्यामध्ये व समाजाच्या इतर घटकांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांना प्रेरणा मिळवी व वाचनाचे महत्व जाणून घ्यावे या हेतून मराठी भाषा दिन साजरा करण्यात येतो.मराठी भाषा जगवायची असेल तर प्रत्येकाने व्यवहारात मराठी भाषेचा वापर केला पाहिजे. मराठी भाषेचे जतन, संवर्धन, प्रचार  व गौरव करणे ही आपली जबाबदारी असल्याचे ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष दिनेश खंडेलवाल सांगितले.

          भाषा ही केवळ महाराष्ट्र आणि मराठी भाषिकांपुरती मर्यादित नसून इतर राज्यातही अनेक ठिकाणी मराठी भाषेचा प्रसार झालेला आहे.  मराठी भाषा संवादाची भाषा असून, एसटी महामंडळाच्या माध्यमातून हजारो प्रवाश्यांपर्यंत मराठी भाषेतील संवाद साधून, महामंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यामार्फत मराठी भाषेचा मोठ्या प्रमाणात  प्रसार केला जात असल्याचे आगार व्यवस्थापक सुधीर सुतार यांनी सांगितले.

          यावेळी बस स्थानकातील उपस्थित प्रवाश्यांचाचे गुलाब पुष्प देवून  यावेळी स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वाहुतक नियत्रंक मोहन शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.घोलप यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *