ताज्याघडामोडी

उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे विद्यार्थी पु.अहिल्या होळकर सोलापूर विद्यापीठाच्या गुणवत्त्ता यादीत

उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे विद्यार्थी पु.अहिल्या होळकर सोलापूर विद्यापीठाच्या गुणवत्त्ता यादीत

उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थींनी याही वर्षी बी. एड. एप्रिल २०२० या शैक्षणिक वर्षात दैदिप्यमान यश मिळवित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या गुणवत्ता यादीत अनुक्रमे व्दितीय व चतुर्थ श्रेणीत आपले स्थान मिळवले आहे. उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील कु.क्रतुज्या इंगवले हया विद्यार्थीनीने सोलापूर विद्यापीठ, सोलापूर बी. एड. अभ्यासक्रम विभागात व्दितीय येण्याचा बहुमान मिळवला व तसेच कु.अबोली देशपांडे हिने चतुर्थ येण्याचा बहुमान मिळविला आहे. सदर बहुमान मिळणाऱ्या विद्याथींनीचा सत्कार संस्थेचे कार्यवाह प्राचार्य डॉ. मिलिंद परिचारक यांनी केला.
त्यांनी मिळवलेल्या उज्वल यशाबद्दल संस्थेचे मार्गदर्शक मा.आमदार प्रशांत परिचारक,
उमा संकुलाचे कार्यवाह प्राचार्य डॉ. मिलिंद परिचारक, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विद्युलता पांढरे,
जनसंपर्क अधिकारी सुर्यकांत पारखे, यांनी अभिनंदन केले. व तसेच या प्रसंगी प्रा. डॉ. विलास बंडगर,
प्रा.जाकीर बागवान, प्रा. सविता दुधभाते, प्रा.सोनाली नाईक, श्री विजय वाघमारे, श्री त्रिगुण लोखंडे, श्री
दत्तात्रय घाडगे, श्री अख्तर पटवेकरी, श्री सागर येडगे, श्री शंकर रोंगे हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *