खून खटल्यातून मुक्तता झाल्यानंतर समर्थकांसह जंगी मिरवणूक काढणाऱ्या कुख्यात गुंड गजानन मारणे याला आणखी एका आरोपाखाली पुणे पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे.सकाळी हत्या प्रकरणातून जामीन मिळाल्याने मारणे हा तुरूंगातून बाहेर आला होता.त्यावेळी त्याचा त्याच्या सर्मथकांनी अक्षरश त्याची मिरवणूक काढली होती.
पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणात 2014 मध्ये गजानन मारणे व त्याच्या समर्थकांवर मोक्का अंतर्गत कारवाई झाली होती. तेव्हापासून मारणे हा तुरुंगात होता. त्याला सुरुवातीला येरवडा कारागृहात ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्याला कोल्हापूरला हलवण्यात आले. सध्या तळोजा कारागृहात ठेवण्यात आले होते.