Uncategorized

सरकोली परिसरातून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर तालुका पोलीस ठाण्याची १६ महिन्यात ४० वेळा कारवाई

महसूल प्रशासन मात्र अलिप्त ? 

पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथील भीमा नदीच्या काठावरुन होणारा अवैध वाळू ुउपसा हा सातत्याने चर्चेचा विषय ठरला असून येथून होणार्‍या अवैध वाळू उपशाबाबत राजकीय पातळीवरही आरोप प्रत्यारोप होताना दिसून आले आहेत.गेल्या 16 महिन्याच्या कालावधीत पंढरपूर तालुका पोलीसांनी जवळपास 40 वेळा सरकोली व आसपासच्या  परिसरातून होणार्‍या अवैध वाळू उपशावर कारवाई केल्याचे दिसून येते.मात्र शुक्रवार दिनांक 24 रोजी तालुका पोलीसांनी केलेल्या कारवाई नंतर सोमनाथ भालेराव या तरुणाने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी सोमनाथचा मृतदेह थेट तालुका पोलीस ठाण्याच्या आवरात आणत पोलीसांवरच हप्ते देवूनही कारवाई केल्याचा आरोप केला.या आरोपामुळे पंढरपूर तालुक्यात खळबळ उडाली,उलट सुलट चर्चा झाली.या प्रकरणी आरोप करण्यात आलेल्या पोलीस कर्मचार्‍यांची चौकशी करण्याचे आदेशही आता अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांनी दिले असल्याची चर्चा आहे.मयत सोमनाथचा भाऊ आबासाहेब भालेराव यानी तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात केलेले आरोप हे भावनाविवश होऊन केले होते कि या बाबत त्यांच्याकडे सोमनाथ आणि संबंधित पोलीस कर्मचारी यांच्यातील आर्थिक देवाण घेवाणी बाबत काही पुरावे आहेत हे आता या चौकशीतूनच पुढे येणार आहे.
मात्र सरकोली परिसरात पंढरपूर तालुका पोलीसांनी केलेल्या कारवाया बाबत माहीती जाणून घेतली असता गेल्या 16 महिन्याच्या काळात सरकोली हद्दतील भीमा नदीच्या परिसरातून होणार्‍या अवैध वाळू उपशासवर जवळपास 40 कारवाया केल्या असून जेव्हा जेव्हा माहीतीगाराकडून माहीती मिळेल अथवा या बीटवर नियुक्तीसाठी असलेले पोलीस कर्मचारी येथे पाहणी साठी दाखल होतील तेव्हा या कारवाया झाल्याचे दाखल फिर्यादींमध्ये नमूद करण्यात आले आहे.
मागील 13 माहीने राज्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्यात ही पोलीसांवर कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर लॉकडाऊन सह जिल्हाधिकार्‍यांनी लागू केलेल्या आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या अंमलबाजवणीची जबाबदारी आहे.असे असतानाही या काळातही पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचार्‍यांनी अवैध वाळू उपशावर मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या आहेत आणि यात सर्वाधिक कारवाया या सरकोली आणि परिसरातील भीमा नदीच्या काठावरुन होणार्‍या अवैध वाळू उपशावर करण्यात आल्या आहेत.
मात्र याचवेळी सरकोली परिसरातून होणार्‍या अवैध वाळू उपशावर महसूल प्रशासनाने स्वत:हून कारवाई केल्याच्या एकदोन घटना उदाहरण म्हणून बातमी स्वरुपात प्रकाशित झाल्याचे दिसून येते.
वास्तविक पाहता वाळू अथवा गौण खनिजाच्या परिरक्षणाची जबाबदारी महसूल प्रशासनाची आहे.गेल्या तीन वर्षापासून जिल्हा प्रशासनाकडून वाळू साठ्यांच्या लिलाव प्रकीयेत अडथळे आल्याने लिलाव झाले नाहीत.तर नुकतेच जिल्हाधिकार्‍यानी काढलेल्या वाळू साठ्यांच्या लिलाव प्रक्रीयेस ठेकेदरांचा प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीकाठच्या विविध गावांच्या हद्दती जिल्हा महसूल प्रशासनाच्या अहवालानुसार लाखो ब्रास वाळू पडून आहे.आणि त्याच्यावर देखरेखीची जबाबदारी ही गावचा पोलीस पाटील,तलाठी,मंडल अधिकारी यांची आहे.जर कुठे अवैध वाळू उपसा होत असेल तर त्याची खबर तात्काळ महसूल विभागाील वरिष्ठांना व सबंधीत हद्दीच्या पोलीस ठाण्यास देवून कारवाई करण्यासाठी तलाठी,मंडल अधिकारी यांनी पुढाकार घेणे अपेक्षित असते.मात्र या बाबत महसूल खाते आणि पोलीस प्रशासन यांच्या समन्वय नसल्याचेच वेळोवेळी झालेल्या कारवायातून दिसून येते.पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी गेल्या काही वर्षात केलेल्या कारवाया बाबत माहीती घेतली असता बहुतांश कारवाया या पोलीसांना मिळालेल्या माहीतीनुसारच करण्यात आल्या आहेत.
सरकोली येथील विष प्राशन करुन आत्महत्या केलेला सोमनाथ भालेराव हा अवै ध वाळू उपसा करत होता याची कबुली पोलीसांवर आरोप करणार्‍या आबासाहेब भालेराव यानी दिली आहे.मात्र ही कबुली देत असतानाच ज्या पोलीस कर्मचार्‍यांनी कारवाई केली त्याच कर्मचार्‍यांवर हप्ता घेत होते असा आरोप केला आहे.मयत सोमनाथचा मृतदेह पोलीस ठाण्यात आणण्यात आल्याने या प्रकरणाने तालुक्यात खळबळ उडवून दिली.
आता संबधीत पोलीस कर्मचारी आणि मयत सोमनाथ यांच्यातील देवाण घेवाण व संपर्क या बाबत चौकशी केली जाणार आहे.मात्र सरकोली परिसरातून सातत्याने होत असलेल्या अवैध वाळू उपशाबाबत महसूल प्रशासनाचे बोटचेपे धोरण आहे का ? मयत सोमनाथ हा अवैध वाळू उपसा करत होता याची माहीती सरकोलीचे पोलीस पाटील, निवासी पद असलेले तलाठी व मंडल अधिकारी यांना नव्हती का? याचीही चर्चा आता होताना दिसून येत आहे.
गेल्या 16 महिन्यात सरकोली व परिसरातील भीमा नदीच्या काठावरुन होणार्‍या अवैध वाळू उपशावर जवळपास 40 वेळा कारवाया करणार्‍या तालुका पोलीस ठाण्यातील कारवाई करणार्‍या कर्मचार्‍यांचीच आता चौकशी होणार आहे.
या प्रकरणी सरकोली येथील तलाठी श्री काळॅेल यांच्याशी संपर्क केला असता मी सुट्टी असल्यामुळे गावाकडे आलोय अशी माहीती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *