ताज्याघडामोडी

महिला सरपंचासह कुटुंबियांचा आत्मदहनाचा प्रयत्न

एरंडोल तहसील कार्यालयाबाहेर उत्रान येथील महिला सरपंच व त्यांच्या कुटुंबीयांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. आत्मदहन करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेताना पोलिसांसोबत झटापट झाली. नजीक असलेल्या गिरणा नदी मधून अवैध वाळू वाहतूक विरोधात सरपंच शारदा भागवत पाटील यांनी आपले पती व कुटुंबीयांसमवेत केला आत्मदहनाचा प्रयत्न केला.

सदर प्रकारामुळे तहसील कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. एकीकडे राज्यभरात ग्रामपंचायतचे निकाल सुरू असताना एरंडोलमध्ये मात्र सरपंचावर आत्मदहनाची वेळ आली. वारंवार तक्रार करूनही प्रशासन दखल घेत नसल्याने अखेर ग्रामस्थांसह व आपल्या कुटुबियांसमवेत सरपंच शारदा पाटील यांनी तहसील कार्यालयात दाखल होत केला आत्मदहनाचा प्रयत्न.

कारवाई केली जाणार 

जळगाव जिल्ह्यातील उत्राण येथील महिला सरपंच शारदा पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी अवैध वाळू वाहतूक विरोधात एरंडोल तहसील कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला असून यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांमध्ये झटापट झाल्याने एरंडोल तहसील कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान माझी पालकमंत्री सतीश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत प्रांताधिकारी व तहसीलदारांची बातचीत करत पुढील पाच दिवसात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे आश्वासन दिले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *