Uncategorized

ईश्वर वठार येथे अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो घेतला पोलिसांनी ताब्यात 

पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार येथून अवैध वाळू वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या कारवाईत 10,00,000/- किमतीचा एक लाल पिवळ्या रंगाचे रंगाचा 407 Ex BS-4 असा लिहलेला टाटा कंपनीचा बिगर नंबरचा टेम्पो वाळूसह पोलिसांनी ताब्यात घेतला असून या प्रकरणी टँम्पो चालक व मालक व इतर दोन अनोळखी इसमांविरूद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       या बाबत पो.कॉ.हनुमंत भराटे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे  स.पो.फौ.जाधव,पो.हे.काँशिंदे ,पो. काँ. माळी ,पो.कॉ.भराटे हे ईश्वर वठार येथे कारवाईसाठी गेले असता गावाच्या पूढे कच्या रसत्याने लोंढे वस्ती जवळील ओढ्यात टँम्पो मध्ये वाळू भरत असल्याचे दिसले. सदर टँम्पो चालकास वाळु वाहतुक परवाना बाबत विचारणा केली असता कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. सदर टँम्पो चालकास नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव विकास ज्ञानेश्वर माने वय 33 वर्षे रा. इश्वर वठार , धंदा. ड्रायव्हर ता. पंढरपुर असे असल्याचे सांगितले. तसेच सदर वाहन मालकाबाबत विचारणा केली सदर मालकाचे नाव माहगित नसल्याचे सांगितले. टँम्पो चालक व मालक व इतर दोन अनोळखी इसमांविरूद्ध भा.दं.वि.कलम379,34सह गौण खनिज कायदा1978 चे कलम 4(1),4(क)(1) व 21 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *