ताज्याघडामोडी

भविष्यात मानवी जीवनाच्या उत्कर्षात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन टेक्नोलॉजी महत्वाची भूमिका बजावेल  -जिओचे उपाध्यक्ष डॉ. मुनीर सय्यद

पंढरपूर- आजच्या स्पर्धेच्या युगात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून उपकरणांची निर्मिती करणे हा आता जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. अलीकडच्या काळात आणि भविष्यात मानवी जीवनाच्या उत्कर्षात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन टेक्नोलॉजी महत्वाची भूमिका बजावणार असून इलेक्ट्रॉनिक्सवर पुढील काळ अवलंबून असणार आहे.’ असे प्रतिपादन जिओचे उपाध्यक्ष डॉ. मुनीर सय्यद यांनी केले.

  गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागाकडून आयोजिलेल्या पाच दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रिलायन्स जिओचे उपाध्यक्ष डॉ. मुनीर सय्यद हे उपस्थित होते व त्यांनी संशोधक व प्राध्यापकांना व्हीअरेबल डीवायसेस अँड इट्स टेक्नोलॉजी’ या विषयावर मार्गदर्शन केले. आयआयटी दिल्लीचे प्रा. डॉ. महेश आबेगावकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. व्हीअरेबल डीवायसेस अँड इट्स टेक्नोलॉजी’ हे तंत्रज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून ही अटल (एआयसीटीईट्रेनींग अँड लर्नींग अॅकेड्मी) प्रायोजित कार्यशाळा स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाकडून ऑनलाइन आयोजित करण्यात आला आहे. स्वेरी विविध बौद्धिक उपक्रमांसाठी नेहमीच प्रोत्साहन देत असते आणि त्या दृष्टीने स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. अनुप विभूते यांच्या नेतृत्वाखाली फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे आयोजन केले गेले असून  पाचही दिवस महत्वाच्या विषयावर तज्ञ मंडळी बौद्धिक मेजवानी देणार आहेत. त्याचे आज ऑनलाइन उदघाटन झाले. प्रास्तविकात कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. महेश मठपती  यांनी या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’ ची सविस्तर माहिती दिली.  विशेष अतिथी आयआयटी दिल्लीचे प्रा. डॉ. महेश आबेगावकर यांनी अँटेना कसा तयार करायचा आणि त्यात काय काय बदल करावा लागेल याची माहिती दिली. पुढे बोलताना डॉ. मुनीर सय्यद यांनी सांगितले की सध्याच्या प्रतिकूल परिस्थतीत तंत्रज्ञानांचा वापर मानवी जीवनाच्या उत्कर्षासाठी कसा केला जातो.’ हे स्पष्ट करून त्यात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तंत्रज्ञानाचा वापर कसा होतोहे देखील सोदाहरण सांगितले. या कार्यशाळेसाठी अॅकॅडमिया लॅब सोलुशन पुण्याचे अनिरुद्ध कुलकर्णीएमआयटी पुण्याचे डॉ. आर. एस. भडादेएनआयटी जमशेदपूरचे डॉ. बसुदेव बेहराग्वाल्हेर (मध्य प्रदेश)च्या आयआयटीएमचे डॉ. पिंकू रंजनबिदर (कर्नाटक) च्या जी.एन.डी.सी कॉलेजचे डॉ. वीरेंद्र डाकुळगी हे प्रमुख वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. सदर कार्यशाळा ऑनलाईन असून प्रत्येक दिवशी गुगल मीट या अॅपद्वारे एआयसीटीईच्या सर्व मार्गदर्शक सुचनानुसार करण्यात येत आहे. या कार्यशाळेमध्ये प्रामुख्याने व्हीअरेबल डीवायसेस अँड इट्स टेक्नोलॉजी’ या विषयावर सविस्तर चर्चा व अभ्यास करण्यात येणार आहे. ही ऑनलाइन कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *